सामूहिक बलात्कारातील विद्यार्थिनीचा मृत्यू

पारोळा - पारोळा येथून २० वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर कासोदा येथे तिघांनी बलात्कार केल्याची तक्रार आहे. अत्याचारानंतर या मुलीला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. उपचारादरम्यान मंगळवारी या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या प्रकरणातील एका संशयित आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला असून यासंदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विद्यार्थिनीच्या मामाने पारोळा पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार नोंदवली. त्यानुसार, त्यांच्या बहिणीची मुलगी पारोळ्यातील  महाविद्यालयात शिकत होती. ३ नोव्हेंबर रोजी ती मामाकडे राहण्यास आली होती. शनिवारी सकाळी बाजारात गेलेले  मामा दुपारी तीन वाजता घरी परतले असता भाची घरात दिसली नाही. दुसऱ्या दिवशी भाची बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात नोंदवली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget