कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादी, शिवसेनेची स्वबळाची तयारी

कोल्हापूर - कोरोनामुळे अनेक महापालिकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाही. पण कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना आता अनेक ठिकाणी निवडणुका घेतल्या जात आहेत. कोरोना आटोक्यात येताच कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या हलचालींना देखील वेग आला आहे.शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मेळावा घेत पालिकेवर भगवा फडकवण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस देखील स्वबळावर लढणार असल्याचे चिन्ह आहेत.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याना तयारीला लागण्याच्या सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. महाविकासआघाडीतील तीन ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याची शक्यता आहे. पण निकालानंतर पुन्हा आघाडी होऊ शकते.असे देखील बोलले जात आहे. जानेवारी महिन्यात कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.राज्य सरकारमध्ये एकत्र असलेले पक्ष कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढणार असल्याने याचा पुढे राज्यातील सत्तेवर देखील काय परिणाम होतो. हे पाहावे लागेल. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget