मुंबईत बनावट नोटा सहित एकाला अटक

मुंबई - शहरात बनावट भारतीय चलनी नोटांचा व्यवहार करणाऱ्या आरोपीला दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबई युनिटने अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी या संदर्भात फैसल इद्रिस शेख या आरोपीला बनावट चलनी नोटासह अटक केली आहे. या आरोपीला नवी मुंबईतील कळंबोली येथून अटक करण्यात आलेली आहे.एटीएस पथकाच्या मुंबई युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीवरून कळंबोली परिसरामध्ये सापळा रचण्यात आला होता. यावेळेस अटक आरोपी हा नंबर प्लेट नसलेल्या मोटर सायकलवरून आला असता त्याच्या संशयास्पद हालचाली वरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, आरोपीकडून दोन हजार रुपये चलनाच्या १५ नोटा, ५०० रुपये चलनाच्या ३४६ नोटा व २०० रुपये चलनाच्या ८८ नोटा मिळून आल्या.अटक आरोपींची चौकशी केली असता या सर्व बनावट नोटा असल्याचे त्याने कबूल केले. हा आरोपी मीरा रोड परिसरातील राहणार असून तो स्वतः बनावट नोटा बनवत असल्याचीही कबुली त्याने दिली. पोलिसांनी आरोपीकडून नोटा तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले.

अटक करण्यात आलेला आरोपी फैसल इद्रिस शेख याला २०१८ मध्ये अशाच एका प्रकरणामध्ये अटक झालेली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. अटक आरोपी हा त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने लाखो रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा व्यवहारात आणण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून करत असल्याचे पोलीसांच्या तपासात समोर आलेले आहे. या आरोपीचे पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान येथे बनावट नोटांचा व्यवहार करणाऱ्या टोळींशी संबंध समोर आलेले आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget