मुख्यमंत्र्यांवर सोशल मीडियातून आक्षेपार्ह टीका करणारा आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

नागपूर - समाज माध्यमांवर राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी गुजरातच्या राजकोट येथून अटक केलेल्या समीत ठक्करची नागपूर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली. मात्र, या प्रकरणातील एक गुन्हा मुंबईत दाखल असल्याने मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार समीत ठक्कर याला 'ट्रान्झिट रिमांड'वर मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सोमवारी पोलिसांनी समीत ठक्करच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत समीत ठक्करला जामीन मंजूर केला. समीतच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. राजकीय नेत्यांविरोधात समाज माध्यमांवर बोलणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र सरकारने पोलिसांचा गैरवापर करत समीतला अटक केली. राज्य सरकार या प्रकरणात सूड बुद्धीने वागत असल्याचा आरोप समीतच्या वकिलांनी केला.समीतला जामीन मंजूर होताच मुंबई पोलिसांनी त्याच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने मुंबई पोलिसांचा अर्ज मंजूर करत त्याचा ताबा मुंबई पोलिसांनी दिला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक समीत ठक्करला घेऊन मुंबईला आले आहेत. ट्विटरवर आदित्य ठाकरे यांना बेबी पेंग्विन तर ठाकरे सरकारला औरंगजेब व पॉवरलेस सरकार, असे संबोधण्याचा आरोप समीत ठक्करवर आहे. या आरोपात २४ ऑक्टोबर रोजी नागपूर पोलिसांनी समीतला राजकोटमधून ताब्यात घेत नागपूरला आणले होते. त्यानंतर न्यायालयाने समीत ठक्करला पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्यावर समीत ठक्करला जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, मुंबई पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget