टीआरपी घोटाळा ; १३ लाखांहून अधिक रोखड जप्त,गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई - टीआरपी घोटाळा प्रकरणात गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. गुन्हे शाखेकडून मुंबई आणि ठाण्यात शनिवारी आणि रविवारी अनेक ठिकाणी तपासणी करण्यात आली.अटक केलेल्या आरोपी अभिषेक कोल्वड़े याच्या घरी आणि ऑफिसहून ११ लाख ७२ हजार रुपये जप्त करण्यात आले.तसेच आशीष चौधरीकडून अभिषेकचे २ लाख रुपये असे सर्व मिळून एकूण १३ लाख ७२ हजार रुपये जप्त करण्यात आले. हवालाच्या माध्यमातून अभिषेकला काही वाहिन्यांकडून पैसे मिळत होते.क्रिस्टल ठाणे येथून ३ हार्ड डिस्क, २ लैपटॉप, ५ पेन ड्राईव्ह पोलिसांना मिळाले आहेत. त्याचा तपास सुरू आहे. टीआरपी मनुपुलेशन करण्यासाठी रामजी वर्मा, दिनेश शर्मा, उमेश सोबत अनेकांना पैसे वाटले जात होते, असा आरोप आहे. या तिघांच्या घरी रेटिंग करणारे वरोमेटर लागले होते. अभिषेक याला १५ लाख रुपये दर महिन्याला मिळत होते. तसेच वर्षभरापासून हा सर्व प्रकार सुरू असल्याची माहिती आहे. काही संशयित चॅनलचे लोक पैसे देत होते, असा संशय पोलिसांना आहे. तसेच या तपासात आता फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे.या प्रकरणाचा तपास CIU, PROPERTY CELL, क्राइम युनिट ११ AND ९ आणि सायबर सेल करत आहे. आतापर्यंत टीआरपी घोटाळा प्रकरणांत आतापर्यंत ११ आरोपींना अचक करण्यात आली आहे.दरम्यान, टीआरपी घोटाळ्याच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला १६ ऑक्टोबरला अटक केली आहे. अंधेरी उपगनरामधून उमेश मिश्राला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे टीआरपी घोटाळ्यातील आरोपींची संख्या सहा झाली आहे. टीआरपीची आकडेवारी गोळा करण्यासाठी मीटर लावलेल्या घरांमध्ये ठरावीक वाहिन्या पाहण्यासाठी उमेश मिश्राने लोकांना लाच दिल्याचा आरोप आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलच्या हंस संशोधक गटाने मुंबईल पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर टीआरपीचा घोटाळा समोर आला आहे. जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी काही वाहिन्या टीआरपीच्या संख्येत छेडछाड करत असल्याचा दावाही हंस संशोधक गटाने केला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget