शिर्डीत साई दर्शनासाठी भारतीय पेहरावाची सक्ती

शिर्डी - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अनलॉकच्या टप्प्याअंतर्गत मंदिरं खुली करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाकडून घेण्यात आला. या निर्णयाअंतर्गत मंदिरं खुली झाली आणि भाविकांनी या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठीसुद्धा देश- विदेशातून भाविक येत असतात.मंदिरात येणाऱ्या भाविकांनी भारतीय पेहरावातच दर्शनास यावे असा आग्रह मंदिर प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाकडून या निर्णयाची तूर्तास सक्ती करण्यात आलेली नसली तरीही त्यासंबंधीचे फलक मात्र येथे लावण्यात आले आहेत. तीन भाषांमध्ये हे फलक लावण्यात आले असून, भारतीय संस्कृतीनुसार पेहराव करण्याची विनंतीपर मागणी या माध्यमातून भाविकांना करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांपैकी काहीजण हे तोकड्या कपड्यांमध्ये असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले किंबहुना यापैकी काही भाविकांना अडवत त्यांना भारतीय पेहरावासाठीची विनंतीही करण्यात आली. या निर्णयाचं काही भाविकांनी स्वागत केले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget