अभिनेत्री देवदत्त बॅनर्जीचा संशयास्पद मृत्यू

कोलकाता - ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी ऊर्फ आर्या हिचा संशयास्पद मृत्यू झाला. कोलकातामधील जोधपूर पार्क इथल्या तिच्या निवासस्थानी देवदत्त मृतावस्थेत आढळली. अनेकदा दार ठोठावूनही आतून काही उत्तर न आल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलावले. बऱ्याच वेळापासून घरात बंद असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी दार उघडताच देवदत्त तिच्या बेडरुममध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या नाकावर रक्ताचे काही डाग होते. पण त्याव्यतिरिक्त शरीरावर कुठलीही दुखापत झाली नव्हती. देवदत्तला एसएसकेएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.पोलिसांनी देवदत्तचे दोन मोबाइल फोनसुद्धा तपासासाठी जप्त केले आहेत.देवदत्त ही प्रसिद्ध सितारवादक दिवंगत पंडित निखिल बॅनर्जी यांची कन्या होती. कोलकातामध्ये जन्मलेल्या देवदत्तने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. शास्त्रीय संगीतामध्ये तिने पदव्युत्तर पदवी घेतली होती. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २०११ मध्ये तिने ‘द डर्टी पिक्चर’मध्येही काम केले होते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget