शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर मला आनंद होईल - शिंदे

मुंबई - राष्ट्रवादीचे शरद पवार आजही देशाचे नेतृत्व करत आहेत. ते यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. ५० वर्षांत पवार यांनी अनेक चढउतार पाहिले. त्यांना अनेकांनी त्रास दिला. मात्र त्यांनी सामाजिक समतोल बिघडू दिला नाही, असे शिंदे म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वांशी संबंध ठेवणारा नेता म्हणजे पवार. पवारांनीच मला राजकारणात आणले आणि मोठे केले, अशा शब्दात सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांचे कौतुक केले.दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता होईल अशी जोरदार चर्चा होती आहे. शरद पवार हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची जागा घेऊ शकतात. महाविकासआघाडीप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे, अशी चर्चा होती. मात्र,असे काहीही होणार नाही. हे वृत्त निराधार आहे, असे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना याआधीच पंतप्रधानपदाची संधी मिळायला हवी होती. पण त्यांना पंतप्रधान होण्यापासून अडवण्यात आले, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.  


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget