३ डिसेंबरला शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक

नवी दिल्ली - शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की ही बैठक चांगली झाली आणि आम्ही निर्णय घेतला आहे की ३ डिसेंबर रोजी पुन्हा चर्चा होईल. ते पुढे म्हणाले की, आम्हाला एक छोटा गट स्थापन करायचा होता, पण चर्चा सर्वांसोबत व्हावी अशी शेतकरी नेत्यांची इच्छा होती. आम्हाला यात काहीही अडचण नाही.यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह शेतकरी संघटनांचे नेते या बैठकीस उपस्थित होते.त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरु आहे. मागील काही दिवसांपासून टीकरी सीमा, सिंघू सीमा व उत्तर प्रदेश येथील गेटवर शेतकरी निदर्शने करीत आहेत. दरम्यान राजवीरसिंग जादौन यांनी ३ डिसेंबर रोजी यूपी गेटवर एक ऐतिहासिक पंचायत करणार असल्याची घोषणा केली आहे.आंदोलक शेतकर्‍यांशी चर्चेदरम्यान सरकारने म्हटले की, तुम्ही तुमच्या संघटनेतील चार ते पाच जणांची नावे घ्यावीत, ज्यामध्ये सरकारच्या काही प्रतिनिधींचा समावेश असलेली एक समिती तयार केली जाईल. ही समिती काही कृषी तज्ज्ञांशी कायद्याबाबत चर्चा करणार आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget