दिल्लीत उपमुख्यमंत्र्याच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला ; भाजपने फेटाळला आरोप

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी विरुद्ध भाजप असा पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. आम आदमी पक्षचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी आपल्या ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि या व्हिडीओवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काही अज्ञातांनी मनीष सिसोदिया घरी नसताना त्यांच्या घरात घुसून पत्नी आणि मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला आहे. दिल्लीमध्ये भाजपला निवडणूक जिंकता आली नाही म्हणून अशा पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे का ? असा सवाल देखील त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना विचारला आहे.हा व्हिडीओ उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शेअर केल्यानंतर खळबळ उडाली आणि भाजपने त्यावर आपली बाजू स्पष्ट करत सिसोदियांचे आरोप खोडून काढले आहेत. हा व्हिडीओ जुना असून हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते नाहीत असे देखील भाजपचे महामंत्री हर्ष मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे.काही अज्ञातांनी सिसोदिया घरी नसताना गेट तोडून घरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला. सिसोदिया यांच्या पत्नी आणि मुलांवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न होता. पोलिसांसोबत बाचाबाची करून हे सर्वजण जबरदस्तीने घरात घुसले. हा व्हिडीओ १२ जुलै २०२० चा असल्याची माहिती मिळाली आहे. हा व्हिडीओ मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी ट्वीट करत हे हल्लेखोर भाजप कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप केला.भाजपकडून हे आरोप खोडून काढण्यात आले. मनीष सिसोदिया यांनी हा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. भाजपची प्रतीमा मलिन करण्यासाठी सिसोदिया यांचा हा डाव असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget