रावसाहेब दानवेंना घरात घुसून माराव लागेल - बच्चू कडू

अमरावती - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक आरोप दानवे यांनी केला आहे. दानवे यांच्या या विधानावर महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जोरदार प्रहार केला आहे. आता दानवे यांना घरात जाऊन घुसून मारावे लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.रावसाहेब दानवे मूळचे हिंदुस्थानचे की पाकिस्तानचे याचा डीएनए तपासावा लागेल.आधी दानवेंच्या घरावर आंदोलन केले. आता दानवे यांना घरात घुसून मारावे लागेल, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या या आरोपाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतीउत्तर दिले आहे.केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीत लाखो शेतकरी मागील १३ दिवसांपासून आंदोलन करत आहे. परंतू या आंदोलनावर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका होत आहेत. आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका करत या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा केला.देशभरात या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून या आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानचा पाठिंबा आहे, असे म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. अशा पद्धतीने दानवे बोलत असेल तर आता त्यांना घरात जाऊन माराव लागेल, असे बच्चू कडू म्हणाले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget