पंतप्रधान मोदीच्या हस्ते १० डिसेंबरला होणार नवीन संसद भवनाचे भूमिपूजन

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी १० डिसेंबरला नवीन संसद भवनाच्या इमारतीचं भूमिपूजन करणार आहेत. शनिवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याची पुष्टी केली.लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, पंतप्रधान १० डिसेंबर रोजी भूमिपूजन करतील, त्यानंतर नवीन संसद भवनाची पायाभरणी होईल. यानंतर ११ डिसेंबरपासून नवीन संसद भवनचे काम सुरू होईल. नवीन इमारत विशेष असेल. २० महिन्यांत ही इमारत तयार होण्याची अपेक्षा आहे. भूमिपूजन होताच दुसऱ्या दिवसापासूनच बांधकामाला सुरवात होईल.

संसद भवनची नवीन रचना त्रिकोणी संकुलात असेल. इमारतील लायटिंग आणि रंग असे केले जाईल की तीन रंगांचे दिसतील. ऑक्टोबर २०२२ पर्यंत नवीन संसदेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सुमारे ६० हजार चौरस मीटरमध्ये ही इमारत बांधली जाईल.इमारतीत संयुक्त सत्र झालं तरी ११२४ खासदारांच्या बसण्याची व्यवस्था केली जाईल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, नवीन इमारत भूकंप प्रतिरोधक असेल. २००० लोक थेट आणि ९०००लोक अप्रत्यक्षपणे त्याच्या बांधकामात सामील होतील.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget