जळगाव जिल्ह्यातील समीकरण बदलण्याची चिन्ह,एकनाथ खडसे देणार भाजपाला झटका

जळगाव - भाजपाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपाला पहिला झटका देणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. वाढदिवसाच्या पोस्टरमुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात या चर्चेनं जोर धरला आहे. भाजपाचे आमदार संजय सावकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे  बोलले जात आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार असल्याचे बोलले जात होते. त्याची सुरूवात आमदार संजय सावकारे यांच्या प्रवेशाने होण्याची चिन्ह आहेत. आमदार संजय सावकारे यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावकारे यांच्या समर्थकांकडून भूसावळ शहरात शुभेच्छाचे फलक लावले. मात्र, भाजपा आमदार सावकारे यांच्या शुभेच्छांच्या फलकावरून पक्षाच्या नेत्यांची छायाचित्रे गायब झाल्याचे दिसले.सोशल मीडियावरूनही आमदार सावकारे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सोशल मीडियावरील अनेक शुभेच्छा संदेशांवरही भाजपा नेत्यांऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे छायाचित्र होते. शुभेच्छांच्या या फलकावरून भाजपा नेते गायब असल्याने आता सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.भाजपा आमदार सावकारे हे एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी सावकारेंना राष्ट्रवादीतून भाजपात ओढले होते. मात्र, आता खुद्द एकनाथ खडसे हेच राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. त्यांच्याबरोबर इतर समर्थक नेते आणि कार्यकर्तेही राष्ट्रवादी आले आहेत. त्यामुळे आमदार सावकारे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा केली जात आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget