साऊथ सुपरस्टार धनुष झळकणार 'दि ग्रे मॅन' चित्रपटात

लॉस एँजेलिस - साऊथ सुपरस्टार धनुष आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. रुसो ब्रदर्स दिग्दर्शित 'दि ग्रे मॅन' या चित्रपटात तो झळकणार आहे. यामध्ये हॉलिवूड स्टार रायन गॉस्लिंग आणि ख्रिस इव्हान्स हेदेखील असणार आहेत. नेटफ्लिक्स या सिनेमाची निर्मीती करत आहेत.

या चित्रपटाचे चित्रिकरण जानेवारीत लॉस एँजेलिसमध्ये होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर, जगभरात आणखी काही ठिकाणी याचे चित्रिकरण करण्यात आले आहे, ज्याबाबत आणखी खुलासा करण्यात आला नाही.जोई आणि अँथोनी रुसो हे मार्व्हलच्या 'अव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर' आणि 'अव्हेंजर्स : एंडगेम' या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या एजीबीओ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती ते करणार आहेत.

.मार्क ग्रेअने या लेखकाच्या 'दि ग्रे मॅन' या पुस्तकावर आधारित या चित्रपटाची कथा असणार आहे. याची पटकथा जोई रुसो, ख्रिस्तोफर मार्कस आणि स्टीफन मॅकफीली यांनी लिहिली आहे. ख्रिस्तोफर आणि स्टीफन यांनीच अव्हेंजर्स एंडगेमचीही पटकथा लिहिली होती. एका माजी सीआयए अधिकाऱ्याच्या जीवनावर ही कथा आधारित आहे.या सिनेमामध्ये मार्वलमध्ये 'कॅप्टन अमेरिका' साकारलेला ख्रिस इव्हान्स, 'ला ला लँड' फेम रायन गॉस्लिंग, नार्कोस या सीरीजमधील वॉग्नर मोऊरा, 'वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड'मधील ज्युलिया बटर्स, आणि 'गेम ऑफ थ्रोन्स'मधील जेसिका हेनविक अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. नेटफ्लिक्सने ट्विट करत याबाबत माहिती दिली.धनुषने यापूर्वी एका इंग्लिश सिनेमामध्ये काम केले आहे. 'दि एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ दि फकीर' असे या चित्रपटाचे नाव होते. हॉलिवूडचा मात्र धनुषचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. सध्या धनुष आनंद एल. राय यांच्या अतरंगी रे चित्रपटामध्ये व्यग्र आहे. यामध्ये त्याच्यासोबत अक्षय कुमार आणि सारा अली खानही आहेत.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget