आमची वसई रुग्णमित्र यांचा मास्क वाटप कार्यक्रम

वसई - कोरोना'ची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच नालासोपारा येथील धानीवबाग नाका परिसरात नाकाकामगारांचा शासनाच्या त्रिसूत्री नियमांचा विसर पडलेला दिसत आहे.हातावर पोट असलेल्या या नाकाकामगारांनी शासनाचे त्रिसूत्री नियमांचा धाक राहीला नाही व वसई विरार महानगरपालिका देखील अशांकडे दुर्लक्ष करतेय अस चित्र दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी होत असला तरी नियमांचे पालन करून ते शून्यावर आणणे ही प्रशासनासोबत नागरीकांचीही तेव्हढीच जबाबदारी आहे. अनेक सामाजिक संस्था सतत जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील असतात, आमची वसई चे रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी या नाका कामगारांना मोफत मास्क वितरण करून शक्य तेव्हढी जनजागृती करण्यासाठी अवश्य तो पुढाकार घेतला. ५०० हून अधिक नाकाकामगारांना आज आमची वसई सामाजिक संस्था, रुग्णमित्र उपक्रम व वसईचा राजा तर्फे मास्क वाटप करण्यात आले.

वसई-विरार महापालिकेने या प्रकरणी जातीने लक्ष देऊन नियम मोडणाऱ्या नाका कामगारांवर आवश्यक ती कडक कारवाई करावी असे मत वसईचा राजा चे अध्यक्ष श्री निलेश भानुशे यांनी व्यक्त केले.

वसई विरार मधील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येईल असे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे मत आमची वसई चे अध्यक्ष श्री हृषिकेश वैद्य गुरुजी यांनी व्यक्त केले.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget