खलिस्तानी झेंड्याने महात्मा गांधींचा झाकला चेहरा

 शेतकरी आंदोलनाचे भारताबाहेर पडसाद

नवी दिल्ली - कृषी कायद्यावरून पेटलेल्या शेतकरी आंदोलनाचे भारताबाहेर पडसाद उमटताना दिसत आहे. दिल्लीत आंदोलन तीव्र होत असताना वॉशिग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. कृषी कायद्यांचा विरोध करताना गटाने खलिस्तानी झेंड्याने महात्मा गांधींचा चेहरा झाकून टाकला.केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला देशाबाहेरूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. मात्र, वॉशिग्टनमध्ये कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आलेल्या काही खलिस्तानी समर्थक आंदोलकांकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. वॉशिग्टनमधील भारतीय दूतावासासमोरील महात्मा गांधी मेमोरियल प्लाझासमोर असलेल्या गांधी पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. खलिस्तानी घटकांनी खलिस्तानी झेंडा पुतळ्यावर टाकत चेहरा झाकून टाकला.भारतीय दूतावासाकडून या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेचा दूतावासाकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. शांती व न्यायाचे प्रतिक म्हणून बघितल्या जाणाऱ्या महात्म्याच्या विटंबनेचा आम्ही निषेध करतो, असे दूतावासाने म्हटले आहे. दूतावासाने अमेरिकेतील कायदा एजन्सीकडेही निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून, दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget