मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांची कंत्राटदाराला धमकी

मुंबई - मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी एका कंत्राटदाराला धमकावून कंत्राट मागे घेण्यास सांगितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. संबंधित कंत्राटदाराने आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पालिकेकडे केली आहे. यावरून स्थायी समिती अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. तर हे बदनामीचे षडयंत्र असून या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे पत्र आधीच दिले असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्षांनी दिली.मे. यश कॉर्पोरेशनच्या रमेश सोलंकी यांनी ई विभागात कामासाठी कंत्राट भरले होते. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी काम मागे घेण्यासाठी कंत्राटदाराला फोन केला होता. आपल्या मर्जीतला कंत्राटदार नेमण्यासाठी यशवंत जाधवांकडून धमकी येत असल्याचा आरोप कंत्राटदाराकडून करण्यात आला आहे. यशवंत जाधव हे धमकी देत असल्याची तक्रार सोलंकी यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलिसांकडे केली आहे. त्याचबरोबर नगरसेवक, पालिका अधिकारी आणि त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांकडून गुंडगीरी केली जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. ई वॉर्डातील २०९ बीटमधील ई निवीदा अंतर्गत सर्वात लघुत्तम निवीदाकार असूनही आपल्याला काम दिले जात नसल्याची तक्रार कंत्राटदाराने केली आहे. यशवंत जाधव, मनस्वी तावडे, राकेश सागठिया हे त्रिकुट मर्जीतील कंत्राटदार आणण्यास आग्रही आहे असे सोलंकी यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. माझ्या किंवा माझ्या भागीदारांच्या जिवाला धोका झाल्यास या तिघांनाच जबाबदार धरावे असेही सोलंकी यांनी म्हटले आहे.यशवंत जाधव यांनी कंत्राट मागे घेण्यासाठी रमेश सोलंकी यांच्यावर दबाब टाकला, त्यांना धमक्या देण्यात आल्या. या संदर्भातील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची कंत्राटदारासोबतच्या संभाषणाची ध्वनिफीत उपलब्ध आहे. तसेच लघुत्तम निविदाकारावर दबाव आणून त्याला कार्यादेश व चलन देण्यात येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला. यातून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार उघड होतो. ही गोष्ट मुंबई महापालिकेला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे यशवंत जाधव यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी असेही ते म्हणाले.दरम्यान याबाबत बोलताना, ऑडिओ क्लिपमधील आवाज माझाच आहे. मात्र, मी कंत्राटदाराला धमकावले नाही. उलट, कंत्राटदारानेच माझ्यासोबत टक्केवारीची भाषा केली. सदर, कंत्राटदारानं या आधी मुलुंडच्या टी वॉर्ड मध्ये एकच आणि ते ही निकृष्ट दर्जाचे काम केले होते. जर माझ्या विभागात काम होत असेल तर, ते चांगले व्हावे यासाठी मी आग्रही असेल. त्यामुळे, सदर कंत्राटदार कशा पद्धतीने काम करतो याची मी चौकशी करणारच. माझ्याकडेही समोरील लोकांच्या क्लिप आहेत, त्या वेळ पडल्यास मी उघड करेल. या कंत्राटदाराच्या मागे कोण आहे हे उघड करेन. हा शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले आहे. तसेच या कंत्राटदाराच्या कामांची चौकशी करून, त्याला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आपण प्रशासनाकडे केल्याचेही ते म्हणाले

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget