गोरेगावात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गोटेगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले  


मुंबई -
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संपुर्ण राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. विविध समाजहिताच्या आणी जनहिताच्या योजना राबवल्या जात आहेत.दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याचे जाहीर करून राज्यातील नागरीकांनी रक्तदान करावे असे आवाहन केले असता यास प्रतिसाद देत मुंबईतील  राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची जी कमतरता सध्याच्या घडीला आहे,ती भरून काढण्यासाठी गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक २० डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. प्रसंगी जिल्हा निरक्षक ताज्जूदिन भाई जिल्ह्याअध्यक्ष अजित रावराणे महिला जिल्हा अध्यक्षा आरती ताई साळवी तालुका अध्यक्ष अजय विचारे,महिला तालुका अध्यक्षा हर्षदा आयरे, सुनीता निवळे सर्व वॉर्डचे अध्यक्ष सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुंबई प्रदेशचे  चिंतामणी द्विवेदी सुभाष मालू  पक्षाचे जेष्ठ नेते यशवंत देसाई उपस्थित होते. शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget