ड्रग्ज पुरवणाऱ्या रिगल महाकालला एनसीबीने केली अटक


मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोची (एनसीबी) कारवाई सुरूच असून, या प्रकरणातील एनसीबीने मिलत नगर, लोखंडवाला भागात छापेमारी केली असून फरार ड्रग्ज पुरवणाऱ्या रिगल महाकाल याला अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही जप्त करण्यात आली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ही मोठी कारवाई असून फरार आरोपी रिगल महाकाल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. महाकाल हा ड्रग्ज पुरवठादार आहे. त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.ड्रग्ज प्रकरणातील दुसरा एक आरोपी अनुज केशवाणी याला महाकाल ड्रग्जचा पुरवठा करत असत. त्यानंतर केशवाणी पुढे दुसऱ्यांना हे ड्रग्ज पुरवत असे, असे एनसीबी कडून सांगण्यात आले.ओशिवरा भागातील मिलत नगर आणि लोखंडवाला येथे एनसीबीने बुधवारी सकाळी ही छापेमारी केली. यामध्ये महाकाल याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget