'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील लेखकाची आत्महत्या

मुंबई - 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील लेखक अभिषेक मकवानाने आत्महत्या केली आहे. राहत्या घरात तो मृत अवस्थेत आढळला. सदर घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या हाती सुसाइडनोट सापडली. आपण आर्थिक परिस्थितीचा सामना करत असल्याचे त्याने नोटच्या माध्यमातून सांगितले. मात्र तो सायबर फसवणूकीचा आणि ब्लॅकमेलचा शिकार झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला.

शिवाय अभिषेकला सतत फोनवरून धमक्या मिळत असल्याचा दावा देखील त्याच्या कुटुंबीयांनी केला. अभिषेकने घेतलेले कर्ज परत करण्यासाठी दबाव निर्माण केला जात होता, असे देखील त्याच्या भावाने सांगितले आहे. भावाच्या मृत्यूनंतर मी त्याचा मेल तपासून पाहिला त्याला वेग-वेगळ्या नंबरवरून फोन येत होते.'इजी लोन' ऍपच्या माध्यमातून अभिषेकने कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या परतफेडीची रक्कम अधिक होती. शिवाय अभिषेकने ज्या ऍपद्वारे कर्ज घेतले होते तो ऍप ऑनलाइन सायबर घोटाळ्यात सामील असल्याचे अभिषेकच्या भावाने सांगितले आहे.अभिषेकला बांगलादेश, म्यानमार आणि उर्वरित भारतातील वेगवेगळ्या राज्यातून फोन येत होते.याप्रकरणी चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget