बलात्काराच्या मुद्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षांचे गजब विधान

छत्तीसगढ - महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा देशात सातत्याने चर्चेत आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच एका विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानांवरून वाद निर्माण झाला आहे. “बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात,” असे विधान अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केले आहे.छत्तीसगढमधील बिलासपूर येथे माध्यमांशी बोलत असताना अध्यक्षा किरणमयी नायक म्हणाल्या,”जर एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल, तर अशावेळी मुलींनी हे बघायला हवे की ती व्यक्ती त्यांनी जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. पण, जेव्हा असे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश घटनांमध्ये महिला पोलीस ठाण्यात धाव घेतात,” असे नायक म्हणाल्या.अल्पवयीन असणाऱ्या मुलींना माझा सल्ला आहे की, कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात फसू नका. तुमचे कुटुंब, मित्र आणि तुमचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. हल्ली १८ व्या वर्षीच लग्न करण्याचे  प्रमाण वाढले आहे. पुढे काही वर्षानंतर जेव्हा मुले होतात, तेव्हा दाम्पत्याला सोबत राहणे अवघड होत आहे, असे नायक म्हणाल्या. “बहुतांश घटना अशा आहेत की लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. मी महिला/मुलींना आवाहन करते की, त्यांनी आधी नाते समजून घ्यावे. जर तुम्ही अशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आहात, त्याचा परिणाम वाईटच होईल, असा सल्ला त्यांनी दिला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget