शेतकरी आंदोलनात युवराज सिंगच्या वडिलांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली - माजी क्रिकेटपटू योगराज सिंग आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नवीन शेतीविषयक कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी भडकाऊ भाषण केले आहे. योगराज यांनी या भाषणात हिंदूंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.शेतकरी आंदोलनादरम्यान योगराज सिंग यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल माध्यमात प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये योगराज सिंग 'हिंदूंना गद्दार' म्हणत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी महिलांबद्दलही वादग्रस्त विधान केले आहे. अनेकांनी योगराज यांच्या भाषणाला निंदनीय, दाहक, अपमानजनक आणि द्वेषपूर्ण म्हटले आहे. योगराज यांचे हे वक्तव्य पंजाबी भाषेत आहे. काही वर्षांपूर्वी, युवराज सिंगला संघात स्थान न मिळाल्याने योगराज यांनी महेंद्रसिंह धोनीबद्दल वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला होता.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget