सायन रुग्णालयात कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीला सुरुवात

मुंबई -  कोरोणा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे. कोरोनावरील लसीची चाचणी मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर रुग्णालयानंतर आता सायन रुग्णालयात ५ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या एथिक कमिटीची परवानगी मिळाल्यानंतर भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या 'कोव्हॅक्सिन' लसीच्या चाचणीला सुरुवात केल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखता यावा म्हणून जगभरातील देशांमधून लसीचा शोध लावला जात आहे. अमेरिकेमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने 'कोव्हीशिल्ड' लसीचा शोध लावला असून त्या लसीची मानवी चाचणी सुरू आहे. या चाचणी दरम्यान या लसीचा मानवावर काही दुष्परिणाम होतात का?, याचा सध्या अभ्यास सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात त्याची चाचणी करण्यात सुरू आहे.एकीकडे महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोव्हीशिल्ड लसीचा अभ्यास सुरू आहे. तर पालिकेच्याच सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. सायन रुग्णालयात एक हजार स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार असून शनिवार ते आतापर्यंत १५ स्वयंसेवकांना लस टोचण्यात आल्याची माहिती डॉ मोहन जोशी यांनी दिली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget