डॉ बाबासाहेब आंबेडकर ६४व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

वसई - 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानामुळे कोरोना आटोक्यात येत आहे. तसे असले तरी सध्या राज्यभरात रक्तपुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.अशातच केईएम रक्तपेढी येथे उत्सव कमिटीच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शनिवार , दि. ५ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा 'महा रक्तदान शिबिराचे' आयोजन करण्यात आले. डॉ हेमंत देशमुख (डीन - केईएम रुग्णालय) यांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छबीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व शिबीराची सुरुवात केली. कोविड प्लाझ्मादानाची डबल हॅट्रीक साधणारे महाराष्ट्रातील पहिले प्लाझ्मादाता श्री राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र) यांचा केईएम रक्तपेढी तर्फे सत्कार करण्यात आला. डॉ जयश्री शर्मा (अध्यक्ष - केईएम रक्तपेढी) यांनी प्लाझ्मादानाकरीता आवाहन केले. पहिल्यांदाच रक्तदान करणारी संगिता खेडेकर(परिचारिका) हिला रुग्णमित्र श्री विनोदजी साडविलकर यांनी प्रोत्साहन दिले. श्रृती गमरे, प्रज्ञा देसक, प्रतिक्षा घाडगे, स्वाती शेट्ये, कस्तुरी धुरी, दिपीका गावीत,प्रियंका जाधव, अमिता शर्मा, तनुजा गुप्ता(सर्व परिचारिका), किशोर जाधव (MSW), शंभुदेव दळवी  (MSW),  वैभव जुवेकर, प्रफुल्ल अहिरे, प्रशांत मोहिते, शंकर खरात, प्रतिक पवार, महेंद्र भास्कर, महेंद्र गरबडे, जितेंद्र लोके (फिनिक्स फाउंडेशन), धनंजय पवार, दिपक गायकवाड, कविता ससाणे, डॉ शुभम दराडे, डॉ अमित दशपुत्र, डॉ कृष्णा सोनावणे, स्वाती पाटील आणि विनोद साडविलकर (रुग्णमित्र) यांच्या पुढाकाराने सदर रक्तदान शिबीर संपन्न झाले. तत्पूर्वी संयुक्त जयंती उत्सव समितीच्या आयोजकांनी रूग्ण मित्रांचा स्मृतीचिन्ह,शाल देऊन सन्मान केला.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget