जमिनी रुपांतरणाची स्थगिती हटवण्याची कार्यवाही सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई - निवासी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या शासकीय जमिनींच्या थकित सेवाशुल्कात सवलत देण्यासाठी यासंदर्भातील समितीच्या शिफारशीनुसार अभय योजना तयार करून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा. तसेच शासनाने लीजवर दिलेल्या भोगवटदार वर्ग दोन जमिनीचे वर्ग एकमध्ये (फ्री होल्ड) रूपांतर करण्याची स्थगिती उठवून कार्यवाही सुरू करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.या लीजवर दिलेल्या जमिनींचे रुपांतरण करण्यास तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ८ मार्च २०१९ रोजी परवानगी दिली होती. पण त्याचा लाभ धनदांडग्यांनी घेतल्याचे निदर्शनास आल्याने शासकीय महसुलाचे नुकसान होत असल्याचे कारण देत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निर्देशांनुसार रुपांतरणास नुकतीच स्थगिती देण्यात आली होती. हजारो गृहनिर्माण सोसायटय़ांना या निर्णयाचा फटका बसला असून रुपांतरणास असलेला प्रिमीयम कमी करण्याचीही त्यांची मागणी आहे.

यासंदर्भात मुख्य सचिवांच्या समिती विचार करणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे बुधवारी झालेल्या बैठकीत ही स्थगिती उठविण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.तसेच म्हाडा वसाहतीच्या ५६ गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून वाढीव सेवा शुल्कावर सूट देण्यासाठी शासन सकारात्मक असून यासाठी गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार तातडीने प्रस्ताव तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या. बैठकीत स्वदेशी मिल कंपाऊडमधील कामगारांच्या घराबाबत व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचे तसेच नेहरूनगर म्हाडा वसाहतीतील पोलिसांच्या सेवानिवासस्थानाच्या अनुषंगानेही चर्चा झाली.म्हाडा वसाहतीच्या ५६ गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून वाढीव सेवा शुल्कावर सूट देण्यासाठी शासन सकारात्मक असून यासाठी गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार तातडीने प्रस्ताव तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget