आजवर २० जणांना तरी मदत केलीस का?; कंगनाला मिक्का सिंगचा टोला

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता दिलजीत दोसांज या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर सुरु आहे. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधत आहे. या वादात आता गायक मिक्का सिंग याने देखील उडी घेतली आहे. आजवर २० लोकांना तरी मदत केली आहेस का? असा सवाल त्याने कंगनाला केला आहे.

आम्ही दिवसाला पाच लाखांपेक्षा अधिक लोकांना जेवण देतो. तू किमान २० लोकांना तरी मदत कर. सोशल मीडियावर स्वत:ला वाघिण म्हणतेस. वाघिण होणे सोपे आहे पण दररोज लोकांना मदत करण सोपे नाही. अशा आशयाचे ट्विट करुन मिक्काने कंगनावर निशाणा साधला. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget