एमडीसह मुंबईतून महिलेला अटक

मुंबई - अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका २६ वर्षीय महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटने कुर्ला पश्चिम येथे ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान ५० लाख रुपयांचे ५०३ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) मिळून आले.अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीवरून, फैजी ए दाऊदि बोहरा कब्रस्तान या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता. या दरम्यान सोफीना सर्फराज खान ही (वय २६) महिला आरोपी तब्बल ५०३ राम ग्राम वजनाचे एमडी हे अमली पदार्थ घेऊन आली. यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता तिच्याजवळ एमडी अमली पदार्थ आढळून आले.मुंबई व मुंबई उपनगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून ही महिला अमली पदार्थांचे वितरण करत होती. यासंदर्भात या महिलेला अटक करण्यात आली असून तिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget