आज मराठा संघटनाचा मंत्रालयावर मोर्चा

मुंबई - नोकरभरती रद्द करण्याच्या मागणीसाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणतीही नोकर भरती प्रक्रिया राबवू नका, या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला जाग आणण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे हे आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी याबाबत रविवारी माहिती दिली.

राज्याच्या विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नोकरभरतीवरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने कोणतीही नोकरभरती करू नये. तसेच सारथी संस्था पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चाचे हजारो कार्यकर्ते आज मुंबईत जाऊन प्रदर्शन करणार आहेत. 

आजच्या मुंबईतील मोर्चामध्ये राज्यभरातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. जोपर्यंत नोकर भरतीची स्थगिती आणि सारथी संस्था सुरू करणार असल्याबाबतचे लेखी आश्वासन राज्य सरकार मार्फत आम्हाला मिळणार नाही, तोपर्यंत मंत्रालयासमोर ठिय्या मांडणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget