पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आज पहाटेपासून सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यासोबतच, या चकमकीत एक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पुलवामाच्या टिकेन भागात ही चकमक सुरू आहे.या भागात आणखी दोन ते तीन दहशतवादी लपलेले असून, त्यांचा शोध सुरू आहे. या दहशतवाद्यांसोबत चकमकही सुरू असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. दरम्यान, याठिकाणी शोधमोहीम सुरू असल्याने परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.आज पहाटेपासूनच ही चकमक सुरू झाली होती. यावेळी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली नसून, त्यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.यापूर्वी नागोर्तामध्येही १९ नोव्हेंबरला जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. हे दहशतवादी काही दिवसांपूर्वीच सीमेपलीकडून भारतात दाखल झाले होते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget