काश्मिरमधील दल लेकमध्ये सुरू होणार 'बोट अ‌ॅम्ब्युलन्स' सेवा

श्रीनगर - अत्यावश्यक परिस्थिती लागणाऱ्या आरोग्य सुविधांसह 'अ‍‌ॅम्ब्युलन्स बोट' काश्मिरातील दल लेकमध्ये सुरू होत आहे. या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना या बोटीचा फायदा होणार आहे. तारिख अहमद पतलो नामक बोट चालकाने ही सुविधा सुरू करण्याचा ध्यास घेतला आहे. तारिख यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा वैद्यकीय मदतीची गरज भासली होती. त्यातून त्यांना ही बोट अ‌ॅम्ब्युलन्स सुरू करण्याची कल्पना सुचली.

माध्यमांशी बोलाताना तारीख यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी मला कोरोनाची लागण झाली होती, त्यावेळी माझ्या मदतीला माझे मित्र सोडून कोणीही आले नाही. मित्रांनी मला बोटीद्वारे रुग्णालयात पोहचवले. मित्रांशिवाय कोणीही मदत करण्यासाठी पुढे आले नाही, त्यामुळे वाईट वाटले. त्यामुळे गरजूंना मदत करण्यासाठी मी रुग्णवाहिका बोट तयार करण्याचा निर्णय घेतला.दल लेक परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्यांना अडचणीच्या काळात चांगले उपचारही मिळत नाहीत. त्यामुळे मी तयार करत असलेल्या बोट अ‌ॅम्ब्युलन्समुळे लोकांचा जीव वाचविण्यासाठी मदत होईल, असे तारिख म्हणाले. ऑक्सिजन सिलेंडर, ईसीजी, ऑक्झिमीटर, व्हिलचेअर आणि स्ट्रेचर सारख्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही तारिखने सांगितले.ही बोट रुग्णवाहिका लाकूड आणि स्टीलपासून बनविण्यात येत असून ३५ फूट लांब आहे. आतमध्ये सुमारे ६ फुटाची जागा रुग्णाला ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. काश्मिरातील दल लेक परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी बोटींवर अवलंबून राहावे लागते. अनेक वेळा तीन चार मिनटे उशिरा रुग्ण दवाखान्यात पोहचल्याने दगावल्याच्या घटना घडल्या आहेत, असे तारिख यांनी सांगितले. त्यामुळे ही बोट नागरिकांचे जीव वाचवणारी ठरेल, असेही ते म्हणाले. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget