ड्रग्स पार्टीवर करण जोहरने दिले स्पष्टीकरण

मुंबई - प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरला अंमली पदार्थ विरोधी पथकानं (एनसीबी) समन्स बजावले आहे. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी करण जोहरकडून महत्वाची माहिती मिळते का? हे जाणून घेण्यासाठी एनसीबीने त्याला चौकशीसाठी बोलावले. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना “माझ्या पार्टीत कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे सेवन केले गेले नाही, असे करण म्हणाला.

करण जोहरने गेल्या वर्षी आपल्या घरात एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, विकी कौशल, मलायका अरोरा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करण्यात आले होते असा आरोप माजी आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला होता. शिवाय त्यांनी करण विरोधात अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तक्रार देखील केली होती. तसेच गेल्या काही काळात ड्रग्स घेणाऱ्या बॉलिवूड कलाकारांची नावे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर एनसीबीने करण जोहर विरोधात समन्स जारी करुन त्याला चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान “मी ड्रग्स घेत नाही, आणि माझ्या कुठल्याही पार्टीमध्ये आजवर ड्रग्सचे सेवन केले गेलेले नाही. असे स्पष्टीकरण करण जोहरने दिले.बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात एनसीबीने आत्तापर्यंत ३० पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. तसेच रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, फिरोज नाडियादवाला, भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया, अर्जुन रामपाल यांसारख्या बड्या कलाकारांची चौकशी केली आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget