आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु

मुंबई - विधीमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ६ अध्यादेश आणि १० विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०० निर्णय घेण्यात आले असून त्यातील आठ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेली आहेत. कोरोना आणि बेमोसमी पाऊस या संकटांशी सामना करीत सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलले.विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.राज्यशासन गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनासारख्या आजारासोबत यशस्वी लढा देत आहे. याकाळात जनहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले, असे सांगतानाच हिवाळी अधिवेशनात अध्यादेश, विधेयक, पुरवण्या मागण्या, विनियोजन बिल, शोकसंदेश असे कामकाज असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटामुळे मार्चमध्ये लॉकडाऊन करावं लागलेत्यामुळे एप्रिल ते सप्टेंबर याकाळात राज्याला आर्थिक फटका बसला आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. मराठा समाजाच्या न्याय हक्काची लढाई पुर्ण ताकदीने लढली जात असून आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget