अहमदाबादमध्ये केमिकल कंपन्यांला भीषण आग

अहमदाबाद -  अहमदाबादमधील येथे केमिकल फॅक्टरीत मंगळवारी रात्री मोठी आग लागली होती. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. २० पेक्षा जास्त अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. 

अहमदाबादच्या वटवामध्ये जीआयडीसी इंडस्ट्रीयल भागात तीन केमिकल कंपन्यांमध्ये भीषण आग लागली. अहमदाबादचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश भट्ट यांच्या माहितीनुसार मंगळवारी रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन वाहने तेथे पोहोचली होती, आता आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, केमिकल गळतीमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज आहे.तीन पैकी एका केमिकल कंपनीत जोरदार स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येते आहे. अग्निशमन दलाच्या ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीत आत्तापर्यंत कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget