‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’या चित्रपटात दिसणार सनी लिओनी

मुंबई -  ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’हा आगामी चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या ऐतिहासिक घटनांवर हा चित्रपट आधारित असल्याची माहिती आहे. या चित्रपचातील एक गाणं नुकतचं प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात अभिनेत्री सनी लिओनी हिचा मराठोमोळा लुक लक्षवेधी ठरत आहे.सनी लिओनी हिची या चित्रपटात मुख्य भूमिका असून निर्मात्यांनी नुकतंच पोस्टरही प्रदर्शित केले आहे. १७९५ ते १८१८च्या काळातील हे कथानक असल्याचे समजते. तसेच अभिनेता अर्जुन रामपाल हा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्जुन एका महार योद्धाच्या भूमिकेत असेल असं म्हटले जात आहे.सनी लिओनी हिच्या भूमिकेसंदर्भात सध्या विशेष काळजी घेण्यात येत आहे. तिच्या भूमिकेद्दल उत्सुकता राखून ठेवण्यासाठी गुप्तता पाळली जात असल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे. सनी एका नृत्यांगनेच्या भूमिकेत असणार आहे. तसेत ती गुप्तहेर देखील असणार आहे.चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याची एक झलक सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. लाल रंगाच्या नऊवारी साडीतील सनीचा घायाळ करणाला लूक या गाण्यात पाहायला मिळत आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget