लांब पल्ल्याच्या गाडीने प्रवास करणाऱ्यांसाठी लोकलची मुभा

मुंबई - कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासासाठी काही बंधने आजही लागू आहेत. मात्र, सर्वसामान्यांना लोकलचा प्रवास अद्याप खुला करण्यात आलेला नाही. मात्र, लांब पल्ल्याच्या गाडीने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाश्यांसाठी मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे.लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडीने प्रवास करायचा असेल त्यावेळी कोविड संदर्भातील सर्व सूचनांचे पालन करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन केले आहे. त्याचवेळी लोकलमध्येही याचेही पालन करण्यात यावे. लांब पल्ल्याच्या गाडी पकडण्यासाठी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशाला लोकल रेल्वेचे तिकीट काढावे लागणार आहे. हे तिकीट सहा तास अधिकृत असणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्यासाठी आधी सरकारी कर्मचारी, डॉक्टर, बँक कर्मचारी यांना प्रवासाची मुभा दिली. त्यानंतर टप्प्या टप्प्याने महिला, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी दिली. पत्रकार आणि कॅमेरामन, वकील यांनाही परवानगी दिली. कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवास करताना वैध ओळखपत्र  सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. ओळखपत्र असल्याशिवाय रेल्वे स्थानकावर प्रवेश मिळणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले. मात्र, आता लांब पल्ल्याच्या गाड्यांतून आल्यानंतर तसेच प्रवास करण्यासाठी लोकलची मुभा देण्यात देण्यात आली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget