टीआरपी घोटाळा प्रकरण ;‘बार्क’च्या माजी ‘सीओओ’ला अटक

मुंबई - टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी पहाटे ‘ब्रॉडकास्ट ऑडिअन्स रिसर्च काऊन्सील’चे(बार्क) माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) रोमील रामगडिया (४०) यांना मुंबईतून अटक केली.रोमील यांनी ‘बार्क’मध्ये उपलब्ध गोपनीय, संवेदनशील माहिती ‘एआरजी आऊटलायर’ कंपनीला पुरवून रिपब्लिक वृत्त वाहिन्यांचा टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) गैरमार्गाने वाढविण्यात सहकार्य केले. ‘एआरजी आऊटलायर’ कंपनीचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासोबत व्हॉट्सअ‍ॅप संभाषण हाती लागले असून त्याआधारे रोमील यांचा गुन्ह्य़ातील सहभाग स्पष्ट होतो, असा दावा गुन्हे शाखेने केला.टीआरपी घोटाळ्यात ‘बार्क’चे आजी-माजी अधिकरी गुंतले असावेत, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याआधारे तपास केला असता रोमील यांचा सहभाग स्पष्ट झाला. त्यांच्याविरोधात पुरावे हाती लागताच विशेष पथकाचे प्रमुख सचिन वाझे, नितीन लोंढे, बिपीन चौहान, अमित लोकरे या पथकाने पहाटे अ‍ॅन्टॉप हिल येथील दोस्ती एकर संकुलातील निवासस्थानाहून रोमील यांना अटक केल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रोमील गेल्या सहा वर्षांपासून ‘बार्क’च्या ‘सीओओ’पदी कार्यरत होते. त्यामुळे देशभरातील दर्शकांचा कल, वृत्तवाहिन्यांच्या दर्शक संख्येतील चढउतार, वाहिन्यांची कामगिरीबाबत बार्कने गोळा केलेली गोपनीय, संवेदनशील माहिती त्यांना उपलब्ध होती. तसेच टीआरपी मोजण्यासाठी उपयुक्त ठरणारी बॅरोमीटर यंत्रे कोणत्या ग्राहकाच्या घरी बसविण्यात आली, हेही माहीत होते. ही माहिती एआरजी आऊटलायर कंपनीला पुरवून रोमील यांनी रिपब्लिकचे टीआरपी अवैधरीत्या कसे वाढवता येतील, यासाठी मदत केली, असे तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अटकेनंतर रोमील यांचा मोबाइल तपासासाठी गुन्हे शाखेने जप्त केला. प्राथमिक तपासणीत व्हॉट्सअ‍ॅपद्वारे रोमील यांनी ‘एआरजी आऊटलायर’चे संचालक, सीईओ यांच्याबरोबरचे संभाषण गुन्हे शाखेच्या हाती लागले. त्याआधारे रोमील यांनी रिपब्लिकला टीआरपी वाढविण्यात मदत केल्याचे स्पष्ट होते. तसेच या बदल्यात रोमील यांनी ‘एआरजी आऊटलायर’ किं वा रिपब्लिककडून मोठा आर्थिक फायदा करून घेतल्याचा संशय आहे, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget