कृषी कायद्यांविरोधात 'दिल्ली चलो' नवव्या दिवशी आंदोलन सुरूच..

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता पुढील रणनीती ठरवण्यासाठी शेतकरी संगठनांची सकाळी ११ वाजता एक बैठक होणार आहे.गुरुवारी केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत शेतकरी नेत्यांच्या एका शिष्टमंडळाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आता ५ डिसेंबरला पुन्हा बैठक होणार आहे. मात्र, बैठक सकारात्मक झाली असून आणखी बरीच चर्चा राहिल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. किमान आधारभूत किमतींना हात लावू नये, ही एक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यावर सरकार मवाळ होत असल्याचेही नेत्यांनी सांगितले.

दरम्यान, पंजाबी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. मोहनजीत, डॉ. जसविंर सिंग आणि पंजाबी ट्रिब्यूनचे संपादक स्वराजबीर यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आपले पुरस्कार परत केले आहेत. यापूर्वी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपला पद्मविभूषण पुरस्कार परत केला होता.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget