Sputnik V वॅक्सीनचे भारतात ट्रायल सुरु

नवी दिल्ली - रशियाच्या कोविड-१९ वॅक्सीन Sputnik V चे क्लिनिकल ट्रायल भारतात सुरु झाले आहे. यासाठी भारतात डॉ. रेड्डीस आणि RDIF या कंपन्यांना परवानगी मिळाली आहे. दोन्ही कंपन्यांनी याबद्दल घोषणा केली. Sputnik V वैक्सीनच्या क्लिनिकल ट्रायलची सुरुवात झाली असून, हे ट्रायल मल्टीलेव्हल आणि रॅंडम स्टडीवर असेल. ज्यामध्ये सुरक्षा आणि लसीकरणाच्या अभ्यासही करण्यात येणार आहे.क्लिनिकल रिसर्च पार्टनर म्हणून JSS मेडीकल रिसर्च काम पाहणार आहे. याशिवाय डॉ. रेड्डी यांनी  बायोटेक्नोलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टेंस काउंसिल (BIRAC), डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉ़जी (DBT) यांचा सल्ला घेणे आणि वॅक्सिनसाठी BIRAC के डायग्नोस्टिक ट्रायल सेंटरसोबत भागीदारी केली. 

वॅक्सिन क्लिनिकल ट्रायल डेटाच्या दुसऱ्या अंतरिम विश्लेषणात, पहिल्या डोसच्या २८ दिवसानंतर ही लस ९१.४ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. पहीली लस ४२ दिवसानंतर ९५ टक्क्यांहून अधिक प्रभावी सिद्ध झाले. 

या चाचणीत ४० हजार स्वयंसेवक सहभागी घेत असून २२ हजारांना पहीला डोस देण्यात आला असून १९ हजाराहून अधिक लोकांना पहीला आणि दुसरा डोस देण्यात आला. Sputnik V वैक्सीन रशियाच्या गामालेया नेशनल रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायोलॉजीमध्ये बनवण्यात आली. या वॅक्सिनची गेल्या ११ ऑगस्टला रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडे नोंद झाली. Sputnik V वैक्सीन ही जगातील पहीली नोंद झालेली वॅक्सिन आहे

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget