2021

मुंबई - भारतातील अनेक राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य एक सुजलाम सुफलाम राज्य म्हणून ओळखले जाते. त्या राज्यातील मुंबई पोलीस म्हटले आपोआप मान अभिमानाने उंचावली जाते.पोलिसांबद्दल समाजात अनेक गैरसमजही आहेत तितकाच अभिमानही आहे. पोलिस अधिकारी किंवा पोलिसात आहे म्हटले किंवा पोलिसांबद्दल लोकांचा कल बघण्याचा दृष्टिकोन भितीदायक किंवा नकारात्मक असतो. परंतु असे नसते. आपले कुटुंब सोडून अहोरात्र आपल्या कर्तव्यावर कर्तव्य बजावत आपल्या जनतेची प्रामाणिक सेवा करणारे हेच ते पोलिस असतात. महाराष्ट्र राज्य मधले संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. परिणामी या राज्यात नव्हे तर देशातही बाराही महिने सार्वत्रीक कार्यक्रम हिंदू-मुस्लिम-सिख-ईसाई आदी सर्व धर्मीयांचे सण-उत्सव ईद , गणपती ,नवरात्री,दिवाळी ख्रिसमस ,आदी सर्व कार्यक्रम सुरू असतात. गुन्हेगारी क्षेत्रावर नजर ठेवणे , चोऱ्या दरोडे यावर करडी नजर ठेवत तसेच महिलांच्या सुरक्षा बाबतचे अनेक विषयांवर नजर ठेवने त्याच बरोबर लोकसभा, विधानसभा ग्रामपंचायती व अन्य निवडणुका सह ,मोर्चे ,आंदोलने या सर्वांवर लक्ष ठेवण्याचे काम ते कार्यक्रम सुरक्षित पार पडण्याचे सर्व श्रेय आपल्या दक्ष पोलिसांना जाते. अशा धावपळीमध्ये देखील महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी त्यांना स्वतःला घरात कामासाठी वेळ देता येत नसल्यामुळे कुटुंबाची व स्वतःच्या देखभालीसाठी काही महिला घरगुती कामासाठी ठेवण्याची वेळ येते. परंतु घरगुती किंवा ऑफिसातील कामाच्या कर्मचाऱ्यांना आजही काही मालक बरोबरीचा दर्जा देत नाही. आपण मालक आहोत या अविर्भावात वावरत असतात आणि नोकर हा कमी समजून त्याच्याशी दुजाभाव केला जातो. परंतु बांद्रा येथे कर्तव्यावर असलेल्या जमिना बागवान या पोलीस इन्स्पेक्टरने आपल्या घरातील कामासाठी ठेवलेल्या महिलेबरोबर आपला पोलीस गणवेश यामध्ये स्वतःचा सेल्फी काढून आपल्या मोबाईलवर डीपी ठेवला आहे. यातून त्यांचे विशाल हृदय माणसातली माणुसकी व घरातील काम करणारी व्यक्ती ही आपल्या स्वतःच्या घरातला  सदस्य आहे असा मान दिला. यातून मोठा एकोप्याचा व मालक कामगाराची दरी तर दूर झालीच त्याच बरोबर त्यांच्या या कृतीमुळे समाजापुढे वेगळा आदर्श नक्कीच निर्माण होईल.तसेच पोलिसांनी प्रति नागरिकांचे प्रेम नक्कीच वाढेल यात संशय नाही.


पुणे -  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याची घटना ताजी असतानाच अजितदादांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीने सकाळीच धाड टाकली. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. ते अजित पवार यांचे मावस भाऊ आहेत. कदम हे सहकार नगरमध्ये राहतात. त्यांच्या घरी आज सकाळीच ईडीने धाड मारली.विशेष म्हणजे कदम हे मुंबईत आहेत. घरी ईडीने धाड मारल्याचे कळताच कदम हे मुंबईहून पुण्याकडे जायला निघाले. दौंड सहकारी साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते. तर कारखान्यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा खुलासा कारखान्याकडून करण्यात आला होता. त्यानंतरही ईडीकडून धाड मारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, ७ ऑक्टोबर २०२१ रोजी आयकर विभागाने दौंड साखर कारखान्यावर धाड मारली होती. किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. आयकर विभागाच्या धाडीनंतरही दौंड कारखान्याचे संचालक कदम यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, दौंड साखर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा पडल्यानंतर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्यात कोणतीही अनियमितता नसल्याचा खुलासा केला होता.


मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात अखेर महाराष्ट्र सरकारने चौकशीची घोषणा केली आहे. २५ कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी समीर वानखेडे यांची आता चौकशी होणार आहे. सरकारने ऑर्डर काढून ४ अधिकाऱ्यांची नावेही जाहीर केली आहे. एकीकडे नवाब मलिकांच्या आरोपांनी घायाळ झालेले समीर वानखेडे आता राज्य सरकारने लावलेल्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात त्याने धक्कादायक आरोप केले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रिलीज करण्यासाठी २५ कोटी रुपयांची डील होणार होती. त्यातले ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते. तसे फोनवरील संभाषण ऐकल्याचा दावा प्रभाकर साईलने केला. याच गंभीर आरोपांची दखल घेत राज्य सरकारने समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशीची घोषणा केली आहे. प्रभाकर साईल, ऍड सुधा द्विवेदी, ऍड कनिष्का जैन आणि नितीन देशमुख यांनी केलेल्या विविध तक्रार अर्जांची एकत्रित चौकशी करण्यासाठी ४ पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य सरकारकडून जाहीर केली गेली आहे. गेले अनेक दिवस नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असा सामना उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आता राज्य सरकारने वानखेडेंविरोधात चौकशी लावल्याने सरकार विरुद्ध वानखेडे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी करणार?

१) मिलिंद खेतले सहायक पोलिस आयुक्त

२) अजय सावंत पोलिस निरीक्षक

३) श्रीकांत पारकर सहायक पोलिस निरीक्षक

४) प्रकाश गवळी पोलिस उप निरीक्षकउल्हासनगर - उल्हासनगर शहरात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सूनबाई आणि उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर टीम कलानीच्या २२ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश झाला. पंचम कलानी या तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या चिन्हावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. आता राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी पंचम कलानी यांनी उल्हासनगरचे महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. टीम ओमी कलानीच्या भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या २२ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उल्हासनगर महापालिकेवर आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला. कलानी परिवाराच्या प्रवेशामुळे शहरात पक्षाला बळ मिळेल, असेही आव्हाड म्हणाले. कलानी गटाचे २२ आणि इतर १० अशा ३२ नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी मोठा हादरा मानला जात आहे. मागील निवडणुकीत हे २२ नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.पप्पू कलानी जेलच्या बाहेर आल्यानंतर उल्हासनगरातील राजकीय समीकरण  बदलताना दिसत आहे. चारच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरात जाऊन पप्पू कलानी यांची भेट घेतली होती. रात्री साडेतीन वाजेपर्यंत नेत्यांची चर्चा चालली होती.माजी आमदार पप्पू कलानी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. उल्हासनगरात निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय भूकंप होताना दिसत आहे. दरम्यान, उल्हासनगर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजपच्या (टीम ओमी कलानीच्या) सात नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान केले होते. त्यामुळे भाजपला सर्व समित्या गमवाव्या लागल्या होत्या. टीम ओमी कलानीच्या ९ नगरसेवकांनी महाविकास आघाडीला मतदान करत शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांना महापौर म्हणून निवडून आणले. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. हे नगरसेवक टीम ओमी कलानीचे असले, तरी ते भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले असल्याने तांत्रिकदृष्ट्या ते भाजपचे होते. त्यामुळे त्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करत भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी यांनी याचिका दाखल केली होती.


मुंबई - एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, पंच प्रभाकर साईल याने केलेल्या लाचखोरीच्या आरोपानंतर आता खारघरमधील एका जुन्या प्रकरणातील अजून एक पंच समोर आला. शेखर कांबळे याने एनसीबीविरोधात गंभीर आरोप केले आहेत. खारघरमधील ८०/२०२१ या नायजेरियन ड्रग्स पेडलर प्रकरणात मला पंच करण्यात आले होते. त्यावेळी १० कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या होत्या. ती कारवाई बोगस होती, असा आरोप पंच शेखर कांबळे याने केला आहे.त्यावेळी मला पंचनामा वाचायला दिला नाही. जी कारवाई केली गेली ती बोगस होती. त्यात काही सापडले नव्हते. मात्र, ६० ग्राम एमडी सापडल्याचे दाखवण्यात आले होते. मी आणि माझा एक मित्र प्रचंड दहशतीत आहोत. काल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पेपरमध्ये या केसचा उल्लेख होता. ज्यात ६० ग्राम एमडी पकडल्याचे समजले, त्यामुळे मी घाबरलो आहे, असे शेखर कांबळे माध्यमाशी बोलताना म्हणाला.

मला काल अनिल माने यांचा रात्री फोन आला. पण मी तिथे गेलो नाही, मला आता भीती वाटते. कोर्टात केस जाईल तेव्हा न्यायाधीश जे विचारतील तेव्हा मी काय उत्तर देणार? कारण मी पंचनामा वाचलेला नाही. म्हणून मी आता समोर आलो आहे. समीर वानखेडे मला १९ तारखेपर्यंत फोन करायचे, खूप वेळा फोन करायचे. मी नायजेरीयन नागरिकांची माहिती द्यायचो. पण त्यांनी मला अंधारात ठेवले. मी पुढील सगळ्या चौकशीसाठी तयार आहे, असेही शेखर कांबळे याने सांगितले. समीर वानखेडे आणि शबाना यांचा निकाह लावणाऱ्या मौलानांनी खळबळजनक दावा केला आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही मुस्लिम असल्याचे सांगितल्यानेच आम्ही निकाह लावला, असे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी एका माध्यमाशी बोलताना म्हणाले.  .


निकाहावेळी समीर यांनी दाऊद असेच नाव घेतले होते. आम्ही मुलाला त्याचे पूर्ण नाव सांगायला सांगतो, तसेच तुमचा निकाह शबाना यांच्यासोबत एवढ्या महरवर करत आहोत, तुम्हाला हे मान्य आहे? तेव्हा मुलगा म्हणते मान्य आहे. त्यानंतर स्वाक्षरी केली जाते. महरच्या समोरही स्वाक्षरी केली जाते. निकाह लावणारा काझीही त्यावर स्वाक्षरी करतो. तिथे उपस्थित असलेले साक्षीदारही आपली स्वाक्षरी करतात, असे मौलाना म्हणाले.


मुंबई - एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. मलिक हे ड्रग्ज लॉबीचे प्रवक्ते असून त्यांच्या जावयाला अटक केल्यानेच ते थयथयाट करत असल्याचा दावा यास्मिन वानखेडे यांनी केला आहे.

यास्मिन वानखेडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. नवाब मलिक हे ड्रग्ज लॉबीच्या सांगण्यावरूनच आरोप करत आहेत. मलिक यांच्यामागे ड्रग्ज लॉबी असणार. त्यांना पैसे देऊन आरोप करायला लावत असतील. ड्रग्ज लॉबींनी त्यांना प्रवक्ते म्हणून नेमले असावे. त्यांच्या जवायाला अटक केली होती. त्यामुळेच ते आरोप करत असावेत, असा दावा यास्मिन वानखेडे यांनी केला आहे.

मलिक आदरणीय मंत्री आहेत. पण त्यांना हे शोभत नाही. ते चुकीची माहिती देत आहेत. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा. मीडियाला बोलवून केवळ प्रसिद्धी घेऊ नका. तुमचा वेळही वाया घालवू नका, असे त्यांनी सांगितले. समीर वानखेडे यांचे बर्थ सर्टिफिकेट नेटवर मिळत नसल्याचे मलिक यांनी सांगितले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनाच बर्थ सर्टिफिकेट मिळत नाही. ते बर्थ सर्टिफिकेट का शोधत आहेत? त्यांची रिसर्च टीम आहे ना? मुंबईतील पोस्ट केलेला फोटो दुबईतील दाखवतात. मग त्यांनी शोधावे सर्टिफिकेट, असे सांगतानाच आमचे बर्थ सर्टिफिकेट शोधण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही कोण आहात? एखाद्या नोकरशहाचे सर्टिफिकेट काढण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमचे सर्टिफिकेट कुणी काढले आहे का? असा सवालही त्यांनी केला.


 


  

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत

मुंबई - आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला असून, यासाठी २५ कोटी रुपयांची डील झाली असल्याचे सांगितले आहे. त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचाही दावा प्रभाकर साईलने या कथित व्हिडीओत केला. या व्हिडीओत प्रभाकर साईल म्हणत आहे, ‘आम्ही लोवर परेलच्या दिशेने गेलो. तिथे ब्रिजखाली आमची गाडी जाऊन उभी राहिली. पाठिमागून इनोव्हा कार आली. अचानक त्या गाडीमागे निळ्या रंगाची मर्सिडिज आली. मी जाऊन बघितले तर त्या गाडीत शाहरुख खानची मॅनेजर बसलेली होती. यानंतर के. पी. गोसावी, सॅम आणि पूजा दादलानी या तिघांमध्ये बैठक झाली. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे १५ मिनिटे निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिले असल्याचा दावाही प्रभाकरने केला आहे. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचे मी फोनवरील संभाषण ऐकले होते. २५ सांग, शेवटी १८ फायनल कर, कारण त्यातील ८ समीर वानखेडेंना जाणार आहेत. तसेच १० आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. मी एवढे त्यांचे फोनवरचे संभाषण ऐकले’,अशी माहिती प्रभाकर साईलने दिली. गोसावीने आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितले. एनसीबीने त्याला १० साध्या कागदांवर सही करून घेतल्याचेही त्याने म्हटले आहे. आपण गोसावी यांना ५० लाख रोख रक्कम भरलेल्या २ पिशव्या दिल्या. तसेच १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजता गोसावीने फोन केला आणि २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितले, असेही प्रभाकर साईल याने सांगितले आहे. गोसावीने आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग्रीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असे प्रभाकरने म्हटले आहे. क्रुझवरील धाडसत्राच्या रात्री आपण गोसावी सोबतच होतो. गोसावी आणि सॅम यांना एनसीबीच्या कार्यालयाबाहेर एकत्र पाहिल्याचा दावाही त्यांनी केला. गोसावी नाट्यमयरित्या गायब झाला आहे. त्याच्या जीवाला समीर वानखेडेकडून धोका असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.समोर आलेल्या या व्हिडीओबाबत चर्चांना उधाण आले आहे. या कथित व्हिडीओची खातरजमा होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळेच याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. 


मुंबई - गोराई भागातील हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्यव्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी पाच जणींची सुटका केली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून १३ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम व पाच मोबाईल, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गोराई भागातील दोन हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायासावर छापा टाकण्यात आला. याठिकाणी दोन अल्पवयीन मुली तर तीन सज्ञान मुली आढळल्या. त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या ३२ वर्षीय महिला दलालासह हॉटेलचा केअर टेकर व व्यवस्थापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पाच मुलींची या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केली.या प्रकरणी भा.दं.वि.चे कलम ३७० (३), ३४ भा.दं.वि.चे सह कलम ४ व ५, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ सह कलम १२,१६,१७,१८, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा,२०१२ (पोक्सो), बालन्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनयम २०१५ चे कलम ७५, ८१ व ८७ अन्वये गोराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त एस. विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे यांच्या मागदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण, पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक पोलीस निरीक्षक भरत घोणे, सहायक पोलीस निरीक्षक पुनम यादव, अंमलदार चंद्रसेन गायकवाड, गिरीष सुर्वे, अजय कदम, विक्रांत खांडेकर, सोनाली लाडे व चालक उपेंद्र मोरे या पथकाने पार पाडली.


इंदौर - देशात आता कोरोना प्रार्दुभाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्याही नियंत्रणात असतानाच आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आतापर्यंत इंदौरमध्ये डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटची प्रकरणे समोर येत होती. मात्र आता जीनोम सिक्वेन्सिंग तपास अहवालात 'ए वाय ४'चे नवीन व्हेरिएंट आढळून आले आहे. हा डेल्टाचाच एक नवीन व्हेरिएंट असल्याचे बोलले जात आहे.इंदौरसह मध्य प्रदेशातून नवी दिल्लीतल्या NCDC लॅबमध्ये पाठवण्यात आलेल्या नमुन्याच्या चाचणी अहवालात नव्या व्हेरिएंटची ७ प्रकरणे समोर आली आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 'ए वाय ४' व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. इंदौरमध्ये सध्या दररोज एक किंवा दोन कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते.१६ ऑक्टोबरच्या अहवालात ७ नमुन्यांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यापैकी दोन जण न्यू पलासिया, एक दुबेची बाग आणि तीन महू येथील आहेत. यावर बोलताना एमजीएम ऑफ मेडिसिन, एमजीएम डॉ.व्ही.पी. पांडे म्हणाले की, कोरोना व्हायरसचे स्वरूप बदलत असते. या प्रकाराच्या संसर्गाविषयी काहीही बोलणे योग्य नाही, कारण स्पष्ट अभ्यास झालेला नाही. दरम्यान भारतात दिली जाणारी लस सर्व प्रकारांवर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. पुढील ४/५ वर्षे, आपल्याला दरवर्षी लस घ्यावी लागणार आहे.

 श्याम लालवानी यांच्या संघटनेच्या माध्यमातून नागरिकांना दिल्या मोफत लसी


मुंबई - कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडणाऱ्यांना कोरोना योद्धा नाव दिले आहे..कोरोना व्हायरस ने धावत्या भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला जरी थांबवले असले तरी कोरोना योद्धा या संकटाची संघर्ष करत होते आणि आजही ते या संकटाचा सामना करत आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ देशाचा आणि माणसांचा विचार त्यांनी केला. खरेतर कोरोना विरुद्ध लढाई जिंकण्यासाठी समाजातील अनेक घटक एकत्र येऊन कार्य करीत आहे. त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक डॉक्टर हा विशेष कोरोना योद्धा आहे. डॉक्टरांनी कोरोनावर उपचार करण्यासाठी स्वतःची व कुटुंबाची पर्वा केली नाही. ते दिवस रात्र कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त आहेत कोरोना रुग्ण सापडलेला परिसर स्वच्छ निर्जंतुक करण्याची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांची होती ती जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे निभावली. या सर्व कोरोना योध्यांचे कार्य सदैव स्मरणात ठेवण्याची गरज आहे कारण आपण त्यांच्यामुळेच उद्या मोकळा श्वास घेणार आहोत. या कोरोनाच्या संकटात कोरोना योद्ध्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड आपण करू शकणार नाहीत.डिसेंबर २०१९ मध्ये प्रथम सापडलेला कोरोना या अति सूक्ष्म विषाणूने अल्प काळात जगभर थैमान घातले. घड्याळाच्या काट्यावर धावणारे जग अक्षरशः जागेवर थांबले. अशा घातक भयंकर जीवघेणी संसर्गजन्य कोरोना महामारी विरुद्ध लढण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यात कोरोना योद्धे सज्ज झाले.याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अंधेरी पश्चिम भागातील श्याम लालवाणी आणि त्यांचे संघटक यांनी सुमारे दोन हजार लोकांना करोना काळात विनामूल्य लस दिली आणि घरो घरी जाऊन लसीबद्धल ज्या अफवा होत्या त्यांचे निवारण केले. प्रमुखतः वयस्कर लोकांना या लसीबाबत शंका होत्या त्यामुळे लास घेण्यास वयोवृद्द लोक जाण्यास घाबरत होते अश्या लोकांना श्याम ललवाणी आणि त्याचे संघटक यांनी अंधेरी, पार्ले स्थित लोकांच्या घरो घरी जाऊन त्यांचा गैरसमज दूर करून त्यांना लस दिल्या आहेत. शिवाय अंधेरी पार्ला परिसरात त्यांनी सॅनिटाईझ करून परिसर स्वछ करून करोना महामारीला दूर करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली यावर तर प्रत्येक नागरिकाची घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. कोरोना लढाईतील पोलीस,डॉक्टर,आरोग्य अधिकारी,महापालिका अधिकारी,सफाई कर्मचारी आणि काही संघटना विशेष करून श्याम लालवाणी यांच्यासारख्या योध्यांचा सन्मान केलाच पाहिजे अशा या योध्यांमुळेच आपण करोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखू शकलो. या योध्यांना नागरिक वार्ताचा सलाम.

अमरावती - कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीने छिदवाडी येथील सेजल जाधव या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. लेकीच्या अशा अचानक निघून जाण्याने उध्वस्त झालेल्या जाधव कुटुंबाला महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आधार दिला. श्रीमती ठाकूर यांनी सेजलच्या भाऊ-बहिणीला शिक्षणासाठी दत्तक घेतले असून, जाधव कुटुंबाला तातडीची आर्थिक मदतही केली आहे.तिवसा तालुक्यातील छिदवाडी येथील सेजल जाधव या १७ वर्षीय विद्यार्थिनीने कुटुंबावरील कर्ज, नापिकी, हलाखीची परिस्थिती यामुळे तणावात येऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत कळताच मंत्री श्रीमती ठाकूर हेलावून गेल्या. त्यांनी तातडीने तत्काळ जाधव कुटुंबाची भेट घेतली. तसेच सेजलच्या भाऊ- बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. कुटुंबाला १० हजार रूपयांची तत्काळ आर्थिक मदतही दिली. सेजलच्या भावंडांच्या शिक्षणाच्या जबाबदारीसह तिच्या बहिणीच्या विवाहाची जबाबदारी मंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वीकारली आहे. एखाद्या विद्यार्थ्याने असा विचार करावा व स्वत:चे जीवन संपवावे. ही अत्यंत सुन्न करून टाकणारी ही घटना आहे. ही वेदना शब्दांत मांडता येत नाही. आत्महत्येसारखे घातक पाऊल कुणीही उचलू नये. आत्महत्या हा इलाज नाही. संकट आले तर हार मानू नका. एकदा का जीव गेला तर तो पुन्हा येणार नाही. विद्यार्थी व तरूणांनी डिप्रेशनमध्ये येऊ नये. हिंमत ठेवावी, असे कळकळीचे आवाहन महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले. जाधव कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आपण त्यांच्या पाठीशी राहू. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनाच्या वतीने मदत मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. अशा घटना घडू नयेत म्हणून प्रभावी व सातत्यपूर्ण समुपदेशन यंत्रणा उभारण्यासाठीही प्रयत्न करू. या अनुषंगाने प्रशासनानेही आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

नागपूर - देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. 'मी त्यावेळी म्हटले होते की काळा पैसा परत आला तर इंधनाचे दर कमी होतील. पण सरकारला आता अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी आणि राष्ट्रहिताचे काम करावे लागत आहे, त्यामुळे कधी तरी स्वप्न पूर्ण होईल', असे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. बाबा रामदेव नागपूरमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना बाबा रामदेव यांनी आपली भूमिका मांडली.काळा पैसा परत आल्यावर पेट्रोलचे दर ३० रुपये होईल असे तुम्ही म्हणाला होता, पण आता दर वाढत आहे त्यामुळे देशात काळापैसा वाढलाय का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता बाबा रामदेव म्हणाले की, मी ज्यावेळी काळापैशांविरोधात देशभरात आंदोलन केले होते. त्यावेळी मी काही पर्याय ठेवले होते. कर चुकवणारे असतील किंवा काळापैसा साठवला असेल तर त्यावेळी मी म्हणालो होतो की, जो क्रुड इंधनाचा दर आहे, त्यानुसार जर इंधन विकले आणि कर कमी केला तर ३० रुपयांमध्ये पेट्रोल विकणे शक्य होते. पण आता सरकारपुढे अनेक आर्थिक संकट आहे, देशहिताचे कार्य सुरू ठेवायचे आहे. सामाजिक कार्य सुरू ठेवायचे आहे. सरकार सुद्धा चालवायचे आहे, त्यामुळे कधी ना कधी तरी स्वप्न हे पूर्ण होईल.तसेच, बॉलिवूडमध्ये ज्या प्रकारे नशेबाजीचे विनाशकारी तंत्र सुरू आहे. ते भारताच्या तरुण पिढीसाठी घातक आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना आपण रोल मॉडेल मानतो. त्यामुळे अनेक तरुण त्यांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे बॉलिवूडमधील लोकांनाच अंमली पदार्थाचा कचरा साफ करायला हवा नाही तर ते त्यांच्यासाठीच आत्मघाती ठरेल, असा सल्लाही बाबा रामदेव यांनी दिला.


ठाणे - राज्यभरात ड्रग्ज विरोधात धाडसत्र सुरु असून, ठाणे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री विशेष मोहिम राबवत अंमली पदार्थ विक्री, अंमली पदार्थ सेवन करणारे गर्दुल्ले आणि मद्यपींवर कडक कारवाई केली. चार तासांच्या विशेष मोहिमेत पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकांनी शहरातील बस स्टॉप, पडक्या इमारती, घरे, बंद वाहने, गर्दुल्ले बसण्याची ठिकाणे, निर्जन स्थळे, गुन्हेगारी वस्त्या, झोपडपट्ट्या, संवेदनशील ठिकाणे, अंमली पदार्थ विक्रीची ठिकाणे आणि सार्वजनिक स्वच्छता गृहांच्या बाजूचा परिसर अशा ठिकाणी तपासणी केली. एकाचवेळी झालेल्या या कारवाईमध्ये अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात तब्बल ९३ गुन्हे दाखल झाले असून १४० जणांना अटक करण्यात आली आहे. ठाणे परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये अंमली पदार्थांचा विळखा वाढत असून त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याचे समोर आले आहे. ठाणे शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि दाट लोकवस्तीच्या झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या ठिकाणी अंमली पदार्थांचे केंद्र निर्माण होऊ लागले आहे. यातून महिला अत्याचाराच्या घटना आणि गंभीर गुन्ह्यांची शक्यता निर्माण होत असल्याने पोलीसांकडून व्यापक मोहीम राबवण्याचे निश्चित करण्यात आले होते.पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्या आदेशानुसार सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी, गुन्हे शाखेचे सर्व घटक प्रभारी अधिकारी यांच्या माध्यमातून ही विशेष मोहिम राबवण्यात आली. यामध्ये ११८ पोलीस अधिकारी, ३३१ पोलीस अमलदार व इतर कुमक वापरण्यात आली. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या भागात ही मोहीम राबवण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी विक्री करणारे, अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून असे ९८ गुन्हे दाखल करून १४० आरोपींनी अटक करण्यात आले. दारूबंदी कायद्यांतर्गत १२ गुन्हे दाखल झाले असून १८ आरोपींनी अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या माध्यमातून भिवंडी, उल्हासनगर, विठ्ठलवाडी येथे गुंगीच्या पदार्थांची नशा करणाऱ्यांवर कारवाई करत आरोपींनी अटक करण्यात आले.

जळगाव - जळगाव जिल्हा बँक निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे. त्यात कुठलाही सत्तेचा दुरुपयोग झाला नाही. उमेदवारांचे अर्ज बदलण्याचे भाजपाने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, त्यांच्या अनुभवी उमेदवारांना देखील उमेदवारी अर्ज व्यवस्थित भरता आले नसल्याची टीका राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर व डॉ. सतीष पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या उमेदवारांना लढण्याची इच्छा नसल्यानेच जाणिवपूर्वक अर्ज चुकविल्याचा आरोपही डॉ. पाटील यांनी यावेळी लगावला. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेबाबत भाजपने केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील, गुलाबराव देवकर, डॉ. सतीष पाटील, बँकेच्या चेअरमन अ‍ॅड. रोहिणी खडसे, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, जिल्हा बँक निवडणूक प्रक्रियेत कुठल्याही प्रकाराचा सत्तेचा दुरुपयोग झालेला नाही. संपूर्ण प्रकियेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरण झाले आहे. तसेच भाजपाने केलेले अर्ज बदलविण्याचा आरोप केविलवाण आहे. भाजप खासदार रक्षा खडसे व माजी आमदार स्मिता वाघ हे अनुभवी उमेदवार असून देखील त्यांचे अर्ज चूकलेच कसे? त्यांना अर्ज का भरता आले नाहीत? असे प्रश्न उपस्थित करीत त्यांनीच जाणिवपूर्वक अर्ज चुकविल्याचा आरोप यावेळी माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांनी केला. तसेच रोहिणी खडसे यांच्याविरोधात रक्षा खडसे यांचा अर्ज भरून भाजपने आमच्या घरांमध्ये भांडणे लावण्याचे काम केल्याचेही सतीष पाटील यांनी सांगितले. मागील पाच वर्षांत जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनल होते. या काळात बँक व शेतकरी हीताचे काम झाले आहे. बँकेत आलेल्या तपासयंत्रणांनी देखील या कामाचे कौतुक केल्याची माहीती गुलाबराव देवकर यांनी यावेळी दिली.सर्वपक्षीय पॅनलसाठी आमचीही तयारी होती. मात्र, या दरम्यान भाजप नेत्यांनी राज्यातील आमच्या नेत्यांच्या चौकशा लावून त्रास देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्यासोबत जिल्ह्यात एकत्र कसे यायचे? याचा विचार करून काँग्रेस व आमच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, हा भाजपाचा आरोप निरर्थक असल्याचेही गुलाबराव देवकर म्हणाले. जिल्हा बँक निवडणुक राष्ट्रवादी, शिवसेना व कॉग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत जागावाटपाची निश्चिती करून तशी घोषणा करून प्रचारास सुरुवात करणार असल्याची माहितीही देवकर यांनी दिली.

नवी दिल्ली -  बांगलादेशात अलीकडेच दुर्गापूजा उत्सवादरम्यान हिंदूंविरुद्ध उफाळलेला हिंसाचार आणि मंदिरांवरील सामूहिक हल्ले यातील दुसरा प्रमुख संशयित असलेल्या तिशीतील एका तरुणाला बांगलादेशातील सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी अटक केली.वायव्येकडील रंगपूरच्या पीरगंज उपजिल्ह्यात १७ ऑक्टोबरला झालेल्या गोंधळाचा सूत्रधार असलेला शैकत मंडल आणि त्याचा साथीदार या दोघांना ढाक्याच्या सीमेवरील गाझीपूर येथून शनिवारी अटक करण्यात आली, असे रॅपिड अ‍ॅक्शन बटालियनच्या (आरएबी) अधिकाऱ्यांनी सांगितले.मंडलने केलेल्या फेसबुक लाइव्हमुळे लोक भडकले आणि त्यातून हिंसाचाराची लाट उसळली, असे आरएबीचा एक अधिकारी म्हणाला. १७ ऑक्टोबरच्या मंडलच्या फेसबुक पोस्टमुळे पीरगंज येथे करण्यात आलेल्या हल्ल्यांत हिंदूंची किमाने ७० घरे व दुकाने पेटवून देण्यात आली होती.कुमिला येथे दुर्गापूजा मंडपात कुराणाची प्रत ठेवणारा प्रमुख संशयित इक्बाल हुसेन याला पोलिसांनी शुक्रवारी कॉक्स बाझार येथून अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंडल याला अटक झाली आहे. हुसेन याला सध्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. दुर्गापूजा उत्सवादरम्यान हिंदूंविरुद्ध हिंसाचार भडकावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आतापर्यंत निरनिराळ्या भागांतून सुमारे ६०० लोकांना अटक केली आहे.

श्रीनगर - काश्मीरचा विशेष दर्जा २०१९ मध्ये रद्द करण्यात आल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी प्रथमच काश्मीर दौऱ्यावर आले. त्यांनी सांगितले की, अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरच्या काळात काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद आणि दगडफेक यांसारख्या घटना कमी झाल्या आहेत.जम्मू-काश्मीर यूथ क्लबच्या सदस्यांना संबोधित करताना त्यांनी हा दावा केला. जे कोणी शांतताभंगाचा किंवा विकासात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कठोरपणे कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  शहा म्हणाले की, दहशतवाद कमी झाला आहे, दगडफेकीचे प्रकारही दिसत नाहीत. मला तुम्हाला ग्वाही द्यायची आहे की, जे कोणी शांतताभंग करू  पाहतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणीही येथील विकासात अडथळा आणू शकत नाही. ही आमची बांधिलकी आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेने काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यास मंजुरी दिली, तो दिवस सोनेरी अक्षरांत लिहिला जाईल. त्यातून दहशतवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा अंत झाला. जम्मू-काश्मीरच्या युवकांनी या प्रदेशाच्या विकासात आपले योगदान देणे सुरू ठेवले पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे असेही शहा म्हणाले. शहा जम्मू-काश्मीरचा तीन दिवसीय दौऱ्यावर होते, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनिवारी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. पोलीस अधिकारी परवेझ अहमद यांची दहशतवाद्यांनी २२ जून रोजी हत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांची शहा यांनी भेट घेतली. तसेच अहमद यांच्या पत्नीला सरकारी नोकरीत नियुक्तीबाबतची कागदपत्रे सुपूर्र्द केली. नवगाव येथे भेट दिल्यानंतर सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. दहशतवाद्यांकडून परराज्यातील नागरिकांच्या होणाऱ्या हत्यांच्या पाश्र्वाभूमीवर दहशतवाद्यांशी लढण्याबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. स्थानिक अधिकाऱ्यांनी बैठकीत शहा यांना सुरक्षा दलांनी आखलेल्या मोहिमेबाबत तपशील दिला.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या काश्मीर दौऱ्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणे किंवा वैद्यकीय महाविद्यालयांचे भूमिपूजन या वरवरच्या उपाययोजनांमुळे मूळ प्रश्न सुटणार नाही, असे मत पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. दिल्लीत जूनमध्ये जी सर्वपक्षीय बैठक झाली होती त्यामध्ये जी आश्वासने देण्यात आली त्याबाबत पावले टाकणे महत्त्वाचे आहे असे मुफ्ती यांनी स्पष्ट केले. जनतेला भेडसावणाऱ्या  मुद्द्यांचा विचार या दौऱ्यात व्हावा असे मेहबूबांनी समाजमाध्यमांवरील प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे. अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर राज्यात गोंधळाची स्थिती आहे. शहा यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वाभूमीवर ७०० जणांना तुरुंगात डांबण्यात आले. अनेकांना जम्मू-काश्मीरबाहेर नेण्यात आले, असा आरोप मेहबूबा यांनी केला. त्यामुळे तणावात भर पडेल असा त्यांनी इशारा दिला आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत प्रदूषणात कमालीची वाढ झाली. २०१८ पासून वायू प्रदूषणाविरोधात लढा देण्यासाठी एअर फिल्टरिंगसाठी तब्बल ७६ कोटी रुपये केंद्र सरकारने भारतभरात दिले. या निधीतला जास्त हिस्सा हा दिल्ली राज्यासाठी देण्यात आला होता. मात्र आजपर्यंत यातील किती रक्कम वापरली याबाबत दिल्ली सरकारने काहीही ठोस पुरावे दिलेले नाहीत. ऑक्टोबर २०२१ महिन्यातसुद्धा प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीपेक्षा जास्त आहे. दिल्लीमध्ये प्रदूषण सर्वात जास्त आहे आणि सरकार या संकटाविरोधात मार्ग काढण्यात अयशस्वी ठरत आहे. 

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते २०१८ मध्ये “वायू” या प्रकल्पाअंतर्गत बाह्य प्रदूषण नियंत्रण प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. मात्र अनेक तज्ज्ञांकडून या हवा शुद्धीकरण प्रकल्पाला नामंजुरी देण्यात आली आणि त्याला भव्य व्हॉक्यूम क्लीनर्सशी तुलना करण्यात आली.वायू प्रोजेक्ट हा निरी आणि आयआयटी मुंबईने तयार केला आहे आणि हे फिल्टर्स वायू प्रदूषणातील धोकादायक कार्बन मोनो ऑक्साईड पीएम २.५ आणि पीएम १० ला कार्बन डाय ऑक्साईडमध्ये रूपांतरीत करते, ज्याने ट्रॅफिक जंक्शनवरील प्रदूषण ४० ते ६० टक्क्यांनी कमी होईल. यासाठी ३६ कोटी दिले होते असे वृत्त आहे.यानंतर जानेवारी २०२० मध्ये पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी त्यांच्या फाऊंडेश द्वारे लाजपत नगर मार्केटमध्ये एक भव्य एअर प्युरिफायर लावले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये एक एअर प्युरिफायर लावले. हे प्युरिफाअर्स त्या भागात १००० स्क्वेअर मीटर परिसरात  १ लाख क्युबिक मीटर शुद्ध वायू देईल, असे त्यांनी सांगितले होते. यासारखे भव्य एअर प्युरिफायर्स दिल्लीच्या कॅनोट प्लेस आणि आनंद विहारमध्ये देखील बसवलेले आहेत. मात्र हे प्रक्लप वायू प्रदूषणाविरोधात किती प्रभावी आहेत, यासाठी संशोधक आणि तज्ज्ञांनी सवाल उपस्थित केले. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात हरयाणामध्ये शेतीचा कचरा जाळण्यामुळे दिल्लीत प्रदूषण वाढते, असे म्हटले जाते. पण दिल्लीत प्रदूषणाचं मुख्य कारणे हे वाढत असलेल्या गाड्या, वीज निर्मितीसारखे जड उद्द्योग, वीट भट्ट्यांसारखे लघु उद्द्योग, सतत चालत असलेले बांधकाम उद्द्योग, उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा इत्यादी आहेत. ऑक्टोबर २०२१ महिन्यात सुद्धा पीएमची पातळी धोकादायक पातळीपेक्षा जास्त आहेत. भारतभरात दिल्लीमध्ये प्रदूषण सर्वात जास्त आहे आणि सरकार या संकटाविरोधात मार्ग काढण्यात अयशस्वी आहे.

अमृतसर- काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी, काँग्रेसच्या नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. अरूसा आलम यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कॅप्टन अमरिंदर सिंग हे कोणत्याही मंत्र्यांची नियुक्ती करत नव्हते. एवढेच काय स्टेशन पोलीस अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्तीही आलम यांच्या संमतीशिवाय होत नसल्याचा आरोप नवज्योत कौर सिद्धू यांनी केला.नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या, की अरुसा आलम यांचा मुलगा हा पैशांनी भरलेली सुटकेस घेऊन दुबईला पळून गेला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांचे वय पाहाता पुजेकडे वळायला हवे. त्यांनी उर्वरित आयुष्य हे अरुसा आलम यांच्यासोबत घालवावे.  नवज्योत कौर म्हणाल्या, की अकाली दलाचे सर्व नेते हे आलम यांना भेटायला जाताना हिऱ्यांचा सेट घेऊन जात होते. पंजाबमधून सर्व पैसे घेऊन आलम ही दुबईला पळून गेली आहे. कॅप्टन यांनीही आलम यांच्यापाठोपाठ जावे व आयुष्य आनंदाने व्यतीत करावे, असेही त्यांनी म्हटले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्षाची स्थापना केली आहे. त्याबाबत विचारले असता नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या, की त्यांच्या पक्षाचा आमच्यावर कसलाही परिणाम होणार नाही. कॅप्टन यांच्या नेतृत्वात नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मतदारसंघावर भेदभाव झाला आहे. मात्र, नवज्योत सिंग हे मोठ्या प्रमाणात मतदारसंघाचा विकास करणार आहेत. नवज्योत सिंग सिद्धू हे पूर्व अमृतसरमधून निवडणूक लढविणार आहोत.अरुसा आलम या संरक्षणविषयक पत्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला व कॅप्टन यांचे खास संबंध होते. पंजाबच्या राजकीय तसेच सांस्कृतिक वर्तुळातील सर्वांना हे माहीत होते. आरुसा आलम यांनी २००६ मध्ये जालंधरमध्ये पंजाब प्रेस क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची भेट घेतली होती.आरुसा यांचे वडील अकलीम अख्तर हे पाकिस्तानी राजकारणातील सुप्रसिद्ध चेहरे आहेत. आरुसा यांना दोन मुलेही आहेत. कॅप्टनने आपल्या 'द पीपल ऑफ द महाराजा' या पुस्तकात अरुसाचा उल्लेख मित्र असा केला आहे.

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. आता त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. राज ठाकरेंच्या आईंचाही कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मुंबई - मुंबईतील करी रोड रेल्वे स्टेशन जवळील ६० मजली वन अविघ्न पार्क इमारतीला लागलेल्या आगीतनंतर मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. वन अविघ्न पार्कमध्ये लागलेल्या आगीमध्ये एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. अग्निसुरक्षा यंत्रणा बहुमजली इमारतींमध्ये कार्यरत आहे की नाही याचा शोध महापालिका घेणार आहे. करी रोड परिसरातील ‘वन अविघ्न पार्क’ इमारतीच्या १९ व्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या घटनेमुळे मुंबईतील बहुमजली इमारती पालिकेच्या रडारवर आल्या आहेत.मुंबईतील बहुमजली इमारतींच्या पुन्हा अग्निप्रतिबंधक यंत्रणेची कसून तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अग्निप्रतिबंधक यंत्रणेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या सोसायटय़ांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवरक्षक उपाययोजना कायदा २००६’अन्वये बहुमजली इमारतीत अग्निप्रतिबंधक यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही यंत्रणा न उभारणाऱ्या सोसायटय़ांविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार खटला दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मुंबईतील बहुमजली इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा आढावा घेऊन निष्काळजी सोसायटय़ांची यादी तयार करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अविघ्न इमारतीच्या १९ व्या आणि २० व्या मजल्यावर लागलेल्या आगीला दोषी असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. घटनास्थळी काहीच मिनिटांमध्ये महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले. आग विझवण्यावर आणि रहिवाशांच्या सुटकेवर जास्तीत जास्त भर दिला. याप्रकरणी जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करणार असून अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणारच, कुणालाही अभय नाही. आगीची संपूर्ण चौकशी केली जाईल, चौकशीनंतर दोषींवर कारवाई करु, असे आश्वासन मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले.

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांची वसुली प्रकरणाचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला या प्रकरणामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला तर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना देखील पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता राज्य सरकारकडून न्या.कैलाश चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगासमोर परमवीर सिंग यांनी वकीला द्वारे शपथपत्र सादर केले आहे.मी माझी तक्रार मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेली आहे. आता त्या संदर्भात मला कुठलेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत वा उलटतपासणीही करायची नाही असे शपथपत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी न्या.कैलाश चांदीवाल आयोगासमोर मुखत्यारमार्फत पॉवर ऑफ ॲटर्नी दिले. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले होते असा आरोप करणारे पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २० मार्च २०२१ रोजी दिले होते. त्या पत्राची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चांदीवाल आयोग स्थापन केला. या आयोगासमोर सिंग यांनी पॉवर ऑफ ॲटर्नी दिलेले महेश पांचाल यांनी शुक्रवारी शपथपत्र सादर केले. परमबीर यांच्या वतीने या शपथपत्रात अशी भूमिका मांडण्यात आली आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिलेली होती तसेच सर्वोच्च न्यायालयासही त्याबाबत अवगत केलेले आहे. तब्येतीच्या कारणामुळे स्वत: आयोगासमोर हजर राहू शकत नाही असेही स्पष्ट करण्यात आले. आता त्या पत्रासंदर्भात त्यांना कोणतेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत तपासणी वा उलटतपासणीही करायची नाही. चांदीवाल आयोगाने यापूर्वी परमबीर सिंग यांना हजर राहण्यासंदर्भात दोन वेळा जामीनपात्र वॉरन्ट काढला होता.परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार तर दिली पण ते स्वत: आयोगासमोर साक्षीसाठी तर येतच नाहीत शिवाय आता त्यांना साक्षी-पुरावे द्यायचेच नसल्याची भूमिका घेत आहेत याकडे देशमुख यांच्या वकिलांनी न्या.कैलाश चांदीवाल यांचे लक्ष वेधले. त्यावर आपलेही अशील अनिल देशमुख आजवर आयोगासमोर आलेले नाहीत याचे भान ठेवून बोला अशी समज न्या.चांदीवाल यांनी देशमुख यांच्या वकिलास दिली.


मुंबई - दिग्दर्शक आदित्य चोप्राने १९९५ साली ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ रिलीज केला होता. आता २६ वर्षांनंतर तो पुन्हा एकदा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. पण यावेळी ही कथा एका संगीत नाटकाच्या स्वरूपात सादर केली जाईल म्हणजेच म्युझिकल ब्रॉडवे.चित्रपट निर्मात्याने याबद्दल बोलताना सांगितले की, मी ब्रॉडवे म्युझिकलबद्दल खूप चिंताग्रस्त आहे, पण तितकाच उत्साही देखील आहे.’ ते म्हणाले की, ‘मला वाटते की मी आजही २३ वर्षांचा आहे (जेव्हा मी डीडीएलजे दिग्दर्शित केला होता).’आदित्य चोप्रा म्हणाले की, ‘मी सिनेसृष्टीचा माणूस आहे, मी कधीही थिएटर केले नाही आणि मी माझ्या आयुष्यातील सर्वात विलक्षण महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. यशराज फिल्म्स दिग्दर्शित DDLJ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील शाहरुख आणि काजोलच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. या ब्रॉडवे शोचे नाव आहे ‘कम फॉल इन लव: द डीडीएलजे म्युझिकल’ जो यशराज फिल्म्स निर्मित करत आहे.’

ब्रॉडवेवर संगीतकार विशाल आणि शेखर हे संगीतकार म्हणून काम करतील. या शोसाठी दिग्दर्शकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या टीमची निवड केली आहे. शोची कोरिओग्राफी टोनी, एमी विजेता रॉब अॅशफोर्ज असोसिएट कोरिओग्राफर श्रुती मर्चंट प्रॉडक्शन करणार आहे.‘कम फॉल इन लव्ह विथ द डीडीएलजे म्युझिकल’ 2022-2023 दरम्यान ब्रॉडवेवर प्रीमियर होईल, सप्टेंबर २०२२ मध्ये सॅन दिएगोच्या ओल्ड गोल्ड थिएटरमध्ये त्याचा वर्ल्ड प्रीमियर होईल.म्युझिकल ब्रॉडवे हा हिंदी सिनेमासारखा असून, वर्षानुवर्षे विभक्त झालेले दोन प्रेमी आहेत, असे निर्माता आदित्य चोप्रा यांचे मत आहे. जो त्याच्या ब्रॉडवे शो ‘कम फॉल इन: लव्ह द डीडीएलजे’ मध्ये पहिल्यांदा भेटणार आहेत. फार कमी लोकांना माहीत आहे की, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा पहिला इंग्रजीत बनवण्यात येणार होता, ज्यात टॉम क्रूझला नायक म्हणून घ्यायचे होते.

मुंबई - ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर त्यांच्या वक्तव्यांमुळे आरएसएस समर्थक ॲड. संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात अख्तर यांच्याविरोधात कलम ४९९ (मानहानी),५०० (बदनामी अंतर्गत शिक्षा) फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे जावेद अख्तरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.आरएसएसची प्रतिष्ठा खराब करणे, नुकसान हेतूने, हेतुपुरस्सर बदनामीकारक काल्पनिक विधाने केल्या प्रकरणी जावेद अख्तरांवर फौजदारी तक्रार दाखल केली आहे.जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले होते. अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे म्हणजे त्यांना या अतिरेकी संघटनेबद्दल बस्तुस्थिती लक्षात येईल, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिले होते.जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. तसेच, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले होते. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संभाषण करताना अख्तर म्हणाले की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमा देखील ओलांडतील. जावेद अख्तर, ज्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता ताब्यात घेण्यास नाखूष असलेल्या भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गावर टीका केली होती. ते म्हणाले की, राईट विंग जगात एक आहे. भारतातील अल्पसंख्यांकांच्या मॉब लिंचिंगच्या काही घटनांवर अख्तर म्हणाले, ‘पूर्ण तालिबान बनण्याची ही एक प्रकारची पूर्ण ड्रेस रिहर्सल आहे. ते तालिबानी युक्तीचा अवलंब करत आहेत. ते एकच लोक आहेत, फक्त नाव वेगळे आहे. भारतीय राज्यघटना त्यांचे ध्येय आणि त्यांच्यामध्ये येत आहे, परंतु जर संधी दिली तर ते ही सीमा ओलांडतील.
ठाणे - कल्पित पिंपळे हल्ला प्रकरण ताजे असतानाच अवैध फेरीवाल्यांवर कारवाईला गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यावर हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना समोर आली आहे. ही घटना १८ ऑक्टोंबर रोजी घडली. 'कल्पिता पिंपळेची फक्त बोट छाटली आहेत. तुझी तर मानच छाटेल', आशा भाषेत धमकी ठाणे पालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी काशिनाथ राठोड यांना दिली. तीन दिवसांपूर्वी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांच्या पाटलीपाडा येथे नारळ विकणारा फेरीवाला अंगावर धावून जाऊन या प्रकारची धमकी देतो. ठाणे पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या बाहेरच्या परिसरात हे सर्व घडत आहे. धसका घेतल्याने राठोड यांचा रक्तदाब वाढला असून ते सुट्टीवर गेले आहेत. याला सर्वस्व जबाबदार ठाणे पालिका आहे. यासाठी फेरीवाला धोरण राबवणे गरजेचे आहे, असे भाजपा नेते मनोहर डुंबरे यांनी म्हटले. पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकारानंतर महापालिकेच्या प्रशासनाला जाग आली होती. मुख्यमंत्र्यांनी देखील या हल्ल्याची दखल घेत कल्पिता पिंपळे यांना फोन केला होता. मात्र, आता तर महापालिका आयुक्तांच्या घराबाहेर झालेल्या या प्रकारामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा पालिकेने दाखल नोंदवला नाही. यातून प्रशासनाचा आपल्या कर्मचार्‍यांच्या बाबतचा हलगर्जीपणा उघड होत आहे, असेही ते म्हणाले. .राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचे हिरानंदानी इस्टेटमध्ये फ्लॅट आहेत. त्यामध्ये प्रताप सरनाईक पण बसून अनेक बिल्डर अनेक मोठे व्यावसायिक महसूल अधिकारी पोलीस अधिकारी होऊन पालिका अधिकारी यांचा समावेश आहे. असे असताना हिरानंदानी इस्टेटमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. पालिका आयुक्तांच्या घराबाहेरच असलेला हा परिसर जर फेरीवाला मुक्त होऊ शकत नाही. तर ठाणे शहर कसा फेरीवाला मुक्त होईल, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. 

मीरा भाईंदर - मिरारोडमध्ये अंमली पदार्थ चरस विक्री करण्यास आलेल्या एका युवकाला काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये ७२ ग्राम बाजारभाव प्रमाणे ५४ हजाराचा चरस जप्त करण्यात आले आहे.पश्चिम द्रुतगती मार्गावरील प्युमा शोरूम जवळ एक व्यक्ती चरस विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि सेनवाद दिन मोहम्मद लखाणी या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला ७२ ग्रॅम चरस आढळून आले आहे. याची बाजारभावप्रमाणे ५४ हजार रुपये इतकी किंमत आहे. यामध्ये घटनास्थळी मोहम्मद अनिस अबबुर रहमान,जय हरीश सोमय्या यांना ताब्यात घेण्यात आले. यात जय हरीश सोमय्या हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चरस या अंमली पदार्थांची तस्करी करतो. काशीमिरा पोलिसांनी तिघांन विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.


मुंबई - मुंबई-पुण्यासह राज्यभरात पुन्हा एकदा चित्रपटगृह,नाट्यगृह उघडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात तिसरी घंटा वाजवून नांदी केली. कोव्हिड 19 विषाणूंच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी शासनाने काढलेल्या आदेशान्वये लागू केलेले निर्बंध आता शिथिल केले जात आहेत. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर बंद पडलेली सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणारे इतर कार्यक्रम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार नियम पाळून आजपासून (२२ ऑक्टोबर) राज्यातील सर्व नाट्यगृह पुन्हा सुरु करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

१) सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची/आयोजकांची जबाबदारी असेल.

२) बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या ५० टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये.

३) बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान ६ फूट) आवश्यक राहिल.

४)  बैठक व्यवस्थेत सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील.

५) बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक राहिल.

६) आरोग्य सेतू अॅप इन्स्टॉल करुन ते दिवसभर सुरु ठेवावयाचे आहे. तसेच बालकलाकारा व्यतिरिक्त सर्व कलाकार/ आयोजक व साह्यभूत कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोसनंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) झालेले असणे आवश्यक असेल. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅपवरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्यदृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती “सुरक्षित” अशी दर्शवलेली असणे आवश्यक राहील.

७) सभागृहातील सर्व परिसर / खोल्या / प्रसाधनगृहे वेळोवेळी स्वच्छ करणेबाबत सभागृह व्यवस्थापनाने वेळापत्रक आखणे आणि प्रसाधन गृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. तसेच, वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. प्रशासन याशित सर्वांनी मास्क लावणे आवश्यक राहील

चित्रपट आणि नाटक वगळता बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्याबाबत विविध घटकांकडून सातत्याने मागणी होत आहे. हे घटक असंघटित असून आर्थिकदृष्टया कनिष्ठ स्तरातील आहेत. कोव्हिड 19 विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने वेळोवेळी घातलेल्या निर्बंधांमुळे हे घटक मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहांप्रमाणेच चित्रपट आणि नाटक वगळता बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेत होणाऱ्या इतर सांस्कृतिक कार्यक्रमांवरील निर्बंध शिथील करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने काही निर्णय घेतले आहेत.कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे / मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट अ मधील मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ पासून नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास शासन मान्यता देत आहे.सर्व संबंधितांनी बंदिस्त सभागृहे / मोकळ्या जागेत होणारे इतर कार्यक्रमांचे परिचालन, कोविड 19 संदर्भातील केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधांचा भंग होणार नाही अशा पद्धतीने करणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून कारवाई करण्यात येईल. कोविड 19 विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या टाळेबंदीच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सूचना या प्रकरणीही लागू राहतील. हा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महसूल व वन विभाग ( मदत व पुनर्वसन प्रभाग ) यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.


जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना महामारीचे संकट देशावर आले तेव्हा सर्वच शासकीय यंत्रणा गोंधळात पडल्या होत्या.  या भयाण विषाणूला आळा कसा घालायचा, त्याचा संसर्ग रोखायचा कसा? असे विविध प्रश्न तज्ज्ञ मंडळींसमोर उभे ठाकले होते. जगभरात पसरलेल्या या विषाणूवर परिणामकारक असे औषधही अख्या जगात उपलब्ध नव्हते. हा विषाणू युरोपच्या अनेक देशांमध्ये हाहाकार माजवून आपल्या देशात आला आणि सगळेच गोंधळून गेले. या भीषण संकटाचा धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनी तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांची महत्त्वाची बैठक बोलवून कोरोनाला रोखण्याचा एक ॲॅक्शन प्लान तयार केला. कोरोनाला रोखण्यासाठी नवी लस शोधून काढायला जगभरातील शास्त्रज्ञ कसोशीने प्रयोगाला लागले.त्यातच पंतप्रधान मोदींनीही आपल्या संशोधकांना, औषध कंपन्यांना लस विकसित करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यातच सर्वप्रथम पुण्याच्या अदर पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटला यश प्राप्त झाले. त्यानंतर हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीलाही कोरोना विरोधी लस विकसित करण्यात यश मिळाले. आता कोरोनाला रोखायचे असेल आणि देशभरातल्या नागरिकांमधील प्रतिकारशक्ती वाढवायची असेल, तर लसीकरणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, हे जाणून मोदींनी या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात लस उत्पादनाचे आदेश दिले. त्यासाठी आवश्यक असणारी सरकार पातळीवरील सर्व मदत त्यांना दिली. मुख्य म्हणजे लस उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झाली  आता संपूर्ण देशवासीयांचे लसीकरण कसे करायचे?हि बाब अतिशय कठीण होती. मोदींनी या कामात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरच अन्य आरोग्यसेवकांना पुढे येण्याची हाक दिली आणि सर्वांनीच या महान कार्यात स्वत:ला झोकून दिले.त्यात कित्येक डॉक्टर आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू हि झाला परंतु न डगमगता त्यांनी करोनाशी लढण्यासाठी एकजुटीने सरसावले. खरेतर, भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात नागरिकांचे लसीकरण करताना या आरोग्य सेवकांनी दिवसरात्र झटून काम केल्याने कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताने एक ऐतिहासिक  यश मिळाले.देशात लसीकरणाच्या आकड्याने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आणि एकच जल्लोष झाला. जगभरांतून देशाचे आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक केले जात आहे. भारताने १०० कोटींचा टप्पा पार केला असताना अन्य देशात मात्र अजूनही ५० कोटीही लसीकरण पूर्ण झालेले नाही. अमेरिकेत फक्त ४१.०१ कोटी  लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यापाठोपाठ ब्राजिलमध्ये २६.०२ कोटींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या धामधुमीत साजरा केला .अत्यंत जलद गतीने लसीकरणाचा १०० कोटींचा आकडा गाठणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. गेल्या १०० वर्षांत आलेल्या सर्वात मोठ्या महामारीशी दोन हात करण्यासाठी देश मजबूत स्थतीत आहे. या निमित्ताने लाल किल्ल्यावर सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकावत या क्षणाला ऐतिहासिक महत्त्व देण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. मोदींनी देशभरातील आरोग्यसेवकांचे, नागरिकांचे आभार मानले आणि कौतुकही केले. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनीही देशाला लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि समर्थ नेतृत्वाचे हे फळ आहे, याबाबत दुमत नाही. आता उर्वरित नागरिकांचे लसीकरण होणे बाकी असून ते उद्दिष्टही सहज साध्य होणार आहे. १३० कोटींची लेखसंख्या असलेल्या देशाने १०० कोटी लसीकरणाचा एकदा पार केल्याने जल्लोष तर होणारच. 


मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज २० ऑक्टोबरला पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर निशाणा साधला. खरेतर एनडीपीसी कोर्टाने आज अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्ज फेटाळला. आर्यन सह त्याचे अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीवर सडकून टीका केली. आर्यन खानची केस ही फेक आहे. तसेच एनसीबीने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवायांपैकी ९० टक्के कारवाया फेक आहेत. लोकांमध्ये दहशत आणि खंडणी मागण्यासाठी या कारवाया केल्या जात असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे.मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा मोबाईल चेक करा, असे मी आवाहन करतो. त्यांचे व्हाट्सअॅप चॅट, फोन रेकॉर्डिंग रिव्हील झाले तर सगळे केसेस फेक आहे, ते स्पष्ट होईल. तसेच त्यांनी काय-काय फेक काम केले ते सिद्ध होईल. भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून मुंबईत दहशत माजवत आहेत. आम्ही त्याचे पुरावे पुढच्या आठवड्या देऊ. मुंबईत खंडणीचा मोठा धंदा सुरु असून, लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.लोकांना बदनाम करण्याचे कटकारस्थान सुरु आहे. प्रसिद्धीसाठी कुणालाही अडकविण्याचा उद्योग एनसीबीच्या माध्यमातून सुरु आहे. एनसीबीने गेल्या वर्षभरात ज्या कारवाया केल्या आहेत त्याचा तपास करावा. त्यासाठी केंद्र सरकारने आयोग नेमावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.या केसमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचा हवाला देवून ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. बिटकॉईन, क्रिप्टोकरन्सीचा उल्लेख कुठेतरी मीडियातून करण्यात आला. एनसीबीचा प्रत्येक केसमध्ये युक्तीवाद बदलत जातोय आणि लोकांचा जामीन कसा थांबवता येईल हे टेक्टिस एनसीबीचे आहे. बरेचसे उदाहरणे माझ्याकडे आहेत. आमच्या केसमध्ये जेव्हा एनडीपीसी न्यायालयात जामीनासाठी गेलो तेव्हा एक चॅट दाखवण्यात आले, त्यामध्ये ५ लाख रुपयांच्या देवाणघेवाण्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असे सांगण्यात आले. पण आमच्या घरातील छोट्या जावायांनी मोठ्या जावायाला कर्ज देण्याबाबतचे ते चॅट होते. पण जेव्हा चार्जशीट दाखल करण्यात आले त्या चार्जशीटमध्ये त्याचा कुठलाही उल्लेख नव्हता. लोकांना त्रास कसा द्यायचा तेवढेच आहे. जामीन मिळू नये यासाठी सर्व प्रयत्न असतात, असा आरोप मलिकांनी केला. सिलेक्टीव लोकांचा विरोध करायचा, काही लोकांना जामीन मिळवून देण्यासाठी मदत करायची, अशी पद्धत एनसीबीची आहे. आर्यन खानशी संबंधित केस ही फेक आहे. आता आरोपींचे वकील जामीनासाठी हायकोर्टात जातील. काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे. मी पहिल्या दिवसांपासून सांगतोय, एनसीबी कोर्टात जे फोटो, औषधे दाखवत आहेत ते सर्व मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्ट समीर वानखेडे यांच्या कार्यालयातले आहेत. एनसीबीला क्रूझवर काहीच सापडलेले नाही. जर एखादा कोर्ट कमिश्नर बसवला तर जे खरे ते स्पष्टपणे समोर येईल. बनावट फोटो जारी करुन ते केस दाखवत आहेत. त्याबाबत जर चौकशी केली तर ती केस फेक आहे हे सिद्ध होईल, असा दावा मलिकांनी केला.

राजकीय हेतून काही विशेष लोकांना त्रास देण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय. एनसीबीच्या माध्यमातून दहशत निर्माण करुन पैसे उकळण्याचे काम सुरु आहे.समीर वानखेडे यांच्या नावाने आमच्याकडून पैशांची मागणी केली जाते, अशी तक्रार वर्सोवा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने केली आहे. हि एप्रिल महिन्यात केली आहे. यापूर्वी रेव्ह पार्टी जेव्हा झाली. त्यामध्ये जी लोक सापडली त्यांची युरीन, ब्लड सॅम्पल घेण्यात आले. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले. कोर्टासमोर हजर करण्यात आले. अशाप्रकारे केसेस चालल्या. पण गेल्या वर्षभरात एनसीबीने प्रत्येक व्यक्तीवर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप केला. पण कुठल्याही आरोपीचा ब्लड आणि युरीन सॅम्पल घेत नाही. तुम्हाला ते सॅम्पल सापडत नाहीत. मग तुम्ही व्हाट्सअॅप चॅटच्या आधारावर सांगतात, असे नवाब मलिक म्हणाले

लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी लखनौमध्ये सुमारे अर्ध्या लोकसंख्येची म्हणजे महिलांची मोठी घोषणा केली. प्रियंका गांधी म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महिला उमेदवारांना ४० टक्के तिकिटे देईल. यासोबतच त्यांनी महिला समाजसेविका, शिक्षिका, महिला पत्रकार आणि इतर सेवांशी संबंधित महिलांना राजकारणात येण्याचे आवाहनही केले. त्या म्हणाल्या की, ज्याला स्वारस्य असेल त्यांनी पुढे येऊन अर्ज करा, आम्ही त्यांना तिकीट देऊ.प्रियंका गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पक्षाने यूपीतील शोषित महिलांबाबत हा निर्णय घेतला आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘मी एक मुलगी आहे, मी लढू शकतो’ हा काँग्रेसचा नारा आहे.आम्हाला पुढे जायचे असेल तर महिलांना राजकारणात यावे लागेल. गुणवत्तेच्या आधारावर महिलांना तिकीट दिले जाईल. आपल्याला जाती धर्माच्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.प्रियांका गांधी म्हणाल्या की, याची सुरुवात ४० टक्क्यांपासून होत आहे. आगामी काळात ५० टक्के महिलांना तिकिटे दिली जातील. इच्छुक असलेल्या कोणत्याही महिला त्यांच्या विधानसभेतून फॉर्म घेऊन अर्ज करू शकतात. महिलांना पुढे जायचे आहे, निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस त्याला मदत करेल. दुसरीकडे, प्रियांकाच्या मास्टरस्ट्रोकनंतर भाजप आणि समाजवादी पक्षानेही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या प्रवक्त्या अनिला सिंह म्हणाल्या की, जर प्रियंका गांधींनी ही घोषणा केली असेल तर ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत किती साम्य आहे हे पाहावे लागेल. ही परंपरा भाजपमध्ये अगदी सुरुवातीपासूनच आहे. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अनुराग भदौरिया म्हणाले की, समाजवादी पक्षाने नेहमीच महिलांचा आदर केला आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ४० महिला आमदार निवडून आल्या. अशा प्रकारे, ही संख्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या केवळ १० टक्के आहे. ४० महिला आमदारांपैकी जास्तीत जास्त ३४ भाजपच्या आहेत. बसपा आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार आहेत तर सपा आणि अपना दल (सोने लाल) यांचे प्रत्येकी एक आमदार आहेत. 

मुंबई - भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात नवघर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दसऱ्याच्या दिवशी अधिकाऱ्यांनी काही गुंडांना हाताशी धरुन नील सोमय्या आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. पोलीस आणि महापालिका अशा दोघांनीही हे मान्य केले की त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर आदेश नव्हता, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. पोलीस आणि महापालिका अशा दोघांनीही कबूल केले आहे की त्यांच्याकडे कोणतीही कायदेशीर आदेश नव्हता. ते विदाऊट एनी सिक्युरिटी कन्सेंट परमिशन तुमच्या परिसरात घुसले म्हणून दोघांनीही बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल यासंबंधात एफआयआर रजिस्टर करून पोलिसांनी दोन्ही संबंधित अधिकारी आणि त्यांच्यासोबत आलेल्या अर्धा डझन गुंडांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी सोमय्या यांनी केली. महत्वाची बाब म्हणजे सत्ताधारी पक्षांचे दोन गुंड सुद्धा त्यात होते. जर मी वेळेवर पोहोचलो नसतो तर कार्यालयाची नासधूस केली असती. त्यामुळे मला यासंबंधी चौकशी आणि कारवाई हवी आहे, असे सोमय्या म्हणाले.ठाकरे सरकारची गुंडगिरी सुरु आहे. पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग केला जात आहे. त्यांच्या लक्षात आले की ठाकरे आणि पवारांच्या माफियागिरीला किरीट सोमय्या घाबरत नाही. माफियागिरी करणाऱ्या पोलिसांना आणि महापालिका इंजिनियरला ही सोडणार नाही. कुणाच्या घरात, परिसरात दसऱ्याच्या दिवशी येत नाहीत. त्याचा धडा मी पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांना शिकवणार, असा इशाराही सोमय्यांनी दिला.

मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर एनसीबी ऑफीसमध्ये त्याच्यासोबत सेल्फी काढणारा किरण गोसावी हा चर्चेत आला आहे. एनसीबीने किरण गोसावी हा आपला साक्षीदार असल्याचे सांगितले. परंतू यानंतर किरण गोसावीने तरुणांना परदेशात नोकरी देतो असे सांगून लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले. यापैकी पालघरच्या एढवन येथील दोन तरुणांना दीड लाखांना लुबाडल्याप्रकरणी किरण गोसावीविरुद्ध केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळवे पोलीस आरोपी किरण गोसावीच्या मागावर असून त्याला कधीही अटक करण्यात येऊ शकते असे कळते.आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेले आहे. याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो, असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावीने केली होती.नवी मुंबई येथील कार्यालयातून किरण गोसावी हे फसवणुकीची रॅकेट चालवत होता. फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष आणि आदर्श यांना गोसावीने मलेशियाला कामाला लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोघांनीही गोसावीला बँक खात्यात पैसे पाठवले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट आणि व्हिसा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट आणि व्हिसा बोगस असल्याचे त्यांना समजले. ते पालघरला परत आले आणि आपली फसवणूक झाल्या प्रकरणी केळवा पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. किरण गोसावी विरोधात फसवणूक केल्याची तक्रार केळवा पोलीस ठाण्यात दोन वर्षापूर्वी देण्यात आली होती. किरण गोसावीने फसवणूक केल्याचा आरोप उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांनी केला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात तत्कालिन पोलrस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात स्वारस्य दाखवले नाही. आर्यन खान प्रकरणात टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्या पाहून आर्यन सोबत सेल्फीत असलेला व्यक्ती हाच आपली फसवणूक करणारा व्यक्ती असल्याचे तरुणांच्या लक्षात आले. फसवणूक झालेल्या या तरुणांनी पुन्हा केळवे पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी केळवे पोलीस ठाण्यात किरण गोसावी विरोधात भादवि कलम 420, 406, 465, 467, 471 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत.रविवारी पुन्हा सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढवले ​​आहेत. वाढत्या दरामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझलचे दर कधी कमी होणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवल्यानंतर रविवारी दिल्लीत डिझेल आणि पेट्रोल या दोन्हीच्या किमतीत ३५ पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये लोकांना आता एक लिटर पेट्रोलसाठी १०५.८४ रुपये आणि डिझेलसाठी ९४.५७ रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत एक लीटर पेट्रोल १११.७७ रुपयांना आणि एक लिटर डिझेल १०२.५२ रुपयांना विकले जात आहे. 

मुंबई -  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती केली. जम्मू काश्मीरमध्ये होणारे दहशतवादी हल्ले, पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव, महागाई, शेतकरी आंदोलन या मुद्यावरुन नवाब मलिकांनी भाजप आणि संघासमोर प्रश्न उपस्थित केले. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राने यंत्रणेचा वापर केला तर महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेले असते असे म्हटले होते. त्यावरुन देखील मलिकांनी प्रत्युत्तर दिले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र सांगितले की केंद्राने यंत्रणांचा वापर केला असता अर्ध मंत्रिमंडळ तुरूंगात दिसले असते, यावर नवाब मलिकांनी म्हंटले आम्ही म्हणतो की पूर्ण मंत्रिमंडळ तुरूंगात टाका. जनता पाहते, बंगालमध्ये जनतेने जे ऊत्तर दिले तेच ऊत्तर तुम्हाला इथे मिळेल. भ्रष्टाचारासाठी सॉफ्टवेअर केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता त्यावर नवाब मलिकांनी फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होता. फडणवीस सरकारच्या काळात काय- काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढू, असा इशारा नवाब मलिकांनी दिला.

लोकांची हत्या होत आहे लोक जम्मू काश्मीर सोडून पलायन करत आहेत. आतंकवादी हल्ले थांबत नाहीत. सात वर्षांपासून तुमच्याकडे केंद्राचे सरकार आहे. गेल्या दोन वर्षांपासून तुम्ही काश्मीरमध्ये सरकार चालवत आहात. त्यापूर्वी तुम्ही काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत सत्तेत होता. मग तेथील परिस्थिती का सुधारत नाही याचे उत्तर जनतेला देण्याची गरज आहे. जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार संघाला नाही. जम्मू काश्मीरचे स्पेशल स्टेटस संपवूनही दहशतवादी कारवाया का थांबत नाही, असा सवाल नवाब मलिकांनी केला. 

पेट्रोल डिजेलची सेंच्युरी पार झालेली आहे. युपीएच्या काळात ६० रुपये होते तेव्हा विचारले की दर वाढले. भाजपवाले त्यावेळी सत्ता आली की पेट्रोल डिझेलचे दर कमी करु, असे आश्वासन देत होते. संसद चालू देणार नाही ही भूमिका घेत होते. आत्ता मोदींनी सांगावे की दर का वाढले. यूपीएच्या काळात भाजपवाल्यांनी तेव्हा थयथयाट केला, दिल्लीच्या निवडणुकीत मोदींनी सांगितले की माझ्या नशिबांनी किंमत कमी झाली आत्ता सांगा कुणाच्या नशिबाने किंमत वाढतेय, हे सांगा असा प्रश्न नवाब मलिकांनी विचारला. 

नागपूर - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त १८ किंवा ८,१० जागा मिळाल्या तर भाजपसोबत युती करु, असे सांगितले आहे. तसेच आगामी काळात उत्तर प्रदेशात एक लाख लोकांचे संमेलन घेणार असंदेखील जाहीर केले आहे.रामदास आठवले आज नागपुरात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले गट) आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आरपीआय उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाग घेईल. यूपीतील दलित मतांवर फक्त मायावती यांचा अधिकार नाही. आम्ही यूपीमध्ये आगामी काळात एक लाख लोकांचे संमेलन घेणार आहोत, असे सांगितले. तसेच उत्तर प्रदेशात बाह्मण समाजाचेही संमेलन घेऊ, असेही आठवले म्हणाले.पुढे बोलताना त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर दावखण्यात येणाऱ्या अविश्वासावरही भाष्य केले. त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा या निष्पक्ष आहेत. काही शंका असल्यास तपास यंत्रणा चौकशी करतात. आम्ही छापा टाकून काटा काढत नाही. काटा टाकून छापा टाकतो, असे भाष्य आठवले यांनी केले. तसेच पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार आणि सत्तेचे गणित यावर मत व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्षांचा विचार करावा. अडीच वर्षे ते मुख्यमंत्री राहणार आणि अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपद सांभाळतील. सेना भाजपत समन्वय करायला मी तयार आहे. पण यांना समन्वय करायचा नाही, असे रामदास आठवले म्हणाले.तसेच आगामी महापालिका निवडणुकीवर बोलताना अनेक शिवसैनिक नाराज आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत निवडणूक लढणार आहे, असे आठवले यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बंगाल केला तर आम्ही बंगालचा महाराष्ट्र करु अशी मिश्किल टिप्पणी केली.

नागपूर -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. काहीच महिन्यांवर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या भेटीवेळी भाजपचे कोअर कमिटीचे काही महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित होते. नागपूर महापालिकेची निवडणुकही आता तोंडावर आहे. त्यात पंचायत समिती-जि.प. निकालात काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूीवर या बैठकीत विचारमंथन झाले आणि रणनितीही आखण्यात आल्याची माहिती आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. राज्यातील प्रमुख पक्षांनी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सगळी तयारी सुरु केली आहे. भाजपनेही आता विविध शहरातील कारभारी-नेते मंडळींवर विशेष जबाबदारी सोपविण्याचे ठरवले आहे. त्याच्याच रणनितीचा एक भाग म्हणून प्रमुख पदाधिकाऱ्यांसह फडणवीस-गडकरींमध्ये बैठक पार पडली. परंतु या बैठकीत नागपूर महापालिका या विषय अजेंड्यावर होता.

राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आहे. विचारांनी भिन्न असलेले तिन्ही पक्षात सध्या सत्तेत आहे. नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका पार पडल्या आहेत, निकालही लागलेत. त्यात भाजपने चांगली कामगिरी केलेली असली तरी सर्वोत्तम कामगिरी करणे जमले नाही. त्यात नागपूर पंचायत समिती. जि.प. निकालात काँग्रेसने खूपच चांगली कामगिरी केली. साहजिकच भाजपसमोरची डोकेदुखी वाढली.जिल्हा परिषदेच्या ८५ आणि पंचायत समितीच्या १४४ गणांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे या सारख्या प्रमुख भाजप नेत्यांचा गड असूनही काँग्रेसने नागपूरमध्ये जोरदार मुसंडी मारली. नागपूरमध्ये मंत्री सुनील केदार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे.जि.प आणि पंचायत समितीमध्ये अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांचे आव्हान भाजपला होते. आता याच निकालातून धडा घेत भाजप त्या दृष्टीने डावपेच आखत आहे. कोणत्या महापालिकेत काय  परिस्थिती आहे?, भाजपला कुठे अनुकुल वातावरण आहे?, कुठे आणखी जोर लावाला लागू शकतो?, कोणत्या महापालिकेची जबाबदारी कोणत्या नेत्यावर सोपवायची?, अशा अनेक विषयांवर गडकरी-फडमवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली  - काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकारिणीची बैठक दिल्लीत झाली. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्षातील जी-२३ नेत्यांना, ‘पक्षाची पूर्णवेळ अध्यक्षा मीच आहे,’ असे सोनिया गांधी यांनी सुनावले आहे.काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांनी पक्षातील असंतुष्ट नेत्यांचा गट असलेल्या जी-२३ची कानउघाडणी केली. बैठकीच्या सुरुवातील उपस्थितांना संबोधित करताना सोनिया गांधी यांनी सांगितले की, काँग्रेसच्या प्रत्येक सदस्याला पक्षाचे पुनरुज्जीवन हवे आहे पण या ऐक्यासाठी आणि पक्षाचे हित असणे आवश्यक आहे. मीच काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्षा आहे. मी नेहमीच स्पष्टतेचे कौतुक केले आहे, माध्यमांच्या माध्यमातून बोलण्याची गरज नाही. दरम्यान,काही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल यांनी पक्षामध्ये निर्णय कोण घेत आहे, हे समजत नसल्याचे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी हे वक्तव्य केले. सोनिया गांधी म्हणाल्या की, आम्ही कधीही लोकहिताच्या मुद्द्यांवर टिप्पणी करण्यास नकार दिलेला नाही. खुल्या वातावरणातील चर्चेला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे. मात्र माध्यमाच्या माध्यमातून बोलण्याची गरज नाही. प्रामाणिक आणि निकोप वातावरणात चर्चा झाली पाहिजे. या बैठकीच्या बाहेर काय गेले पाहिजे, याचा निर्णय कार्यकारिणीने सामुदायिकपणे घ्यायला हवा, असा सल्लाही सोनिया गांधी यांनी दिला. या कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुकीच्या तारखेची घोषणाही झाली आहे. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी मागणी काही नेत्यांकडून होत आहे.


पिंपरी -  लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेतून कळते की तेथील काही लोकांच्या डोक्यात सत्तेची गुर्मी आहे. ज्यांच्या गाडीखाली चिरडून लोकांचा मृत्यू झाला त्यांचे वडील अजय मिश्रा केंद्रीय राज्यमंत्री आहेत. एवढी गंभीर गोष्ट घडल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, सत्तेचा दर्प एवढा आहे की आम्ही सत्तेत असल्याने वाटेल ते करू, आम्ही सत्ता सोडणार नाही, हा उन्माद यातून दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. हे आज ते दाखवतील पण देशातील जनता योग्यवेळी याचे उत्तर देईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवड येथे शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी लखीमपूर खीरी हिंसाचार व शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवरून शरद पवार यांनी केंद्र सरकारवर घणाघाती शब्दांत हल्ला चढवला. 'देशातील शेतकऱ्यांचे १० महिने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी मी स्वतः जाऊन आलो. आंदोलनामध्ये जे घटक सहभागी आहेत त्यांच्याबाबत केंद्र सरकारची सामंजस्याची भूमिका दिसत नाही, असे मला वाटते. आंदोलनात पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील शेतकऱ्यांचा सहभाग आहे. आमचे केंद्र सरकारला सांगणे आहे की, पंजाबमधल्या शेतकऱ्याला अस्वस्थ होऊ देऊ नका. पंजाब हे सीमेवरील राज्य आहे. सीमेवरील राज्यातील लोकांना अस्वस्थ केले तर त्याचे दुष्परिणाम देशावर होतात', अशा शब्दांत पवार यांनी केंद्र सरकारला सावध केले.

केंद्रीय तास यंत्रणांकडून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहे. राज्यातील अनेक नेते सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यारून पवार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. 'भाजपाचे जुने नेते एकनाथ खडसे यांनी मध्यंतरी पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी पक्ष सोडल्यानंतर ताबडतोब त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर खटले सुरू झाले. अनेक वर्षे पक्षात असलेल्या व्यक्तीने पक्ष सोडल्यावर त्याला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. माजी खासदार आणि माजी मुख्यमंत्री हे राज्यात एखादी गोष्ट बोलल्यानंतर त्यावर केंद्रीय यंत्रणा लगेचच कारवाईला सुरुवात करते. हा नवीनच प्रकार पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा', असे पवार म्हणाले.

अहमदनगर - लोकसभा निवडणुकीच्यावेळी रिंगणात उतरलेल्या राजकारणातील दोन नातूंची मोठी चर्चा झाली होती. नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांची औरंगाबाद-पुणे विमानप्रवासात भेट झाली. या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियात शेअर करीत डॉ. विखे यांनी याला सीमांपलीकडील मैत्री असे संबोधले. यावर नेटकऱ्यांनी मात्र विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मैत्रीचे स्वागत केले, काहींनी राजकीय अर्थ काढला तर काहींना दोघांवर आणि त्यांच्या नेत्यांवरही टीका केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पक्षाच्या कार्यक्रमासाठी औरंगाबादला आले होते. तर ज्येष्ठ नेते स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय हेही औरंगाबादला गेलेले होते. तेथून दोघेही विमानाने मुंबईला गेले. विमानात शेजारी बसून त्यांनी प्रवास केला. यावेळी दोघांत नेमकी काय चर्चा झाली, हे त्या दोघांनाच माहित असावे. प्रवासात आणि प्रवास संपल्यानंतर दोघांनी एकत्र छायाचित्र काढले. हे छायाचित्र डॉ. विखे यांनी सोशल मीडियात शेअर करून सीमांपलीकडील मैत्री असल्याचे म्हटले. यावरून चर्चा सुरू झाली. काहींनी याचा राजकीय अर्थ काढून दोघांनाही पक्ष बदलणार काय? अशी विचारणा केली. काहींनी या मैत्रीचे कौतूक केले. अनेकांनी मात्र कडाडून टीका केली आहे. गरीब वडिलांची मुले अशा उपरोधिक प्रतिक्रियाही आल्या असून सगळे राजकारणी आतून एक असून शेतकरी आणि जनतेची फसवणूक सुरू असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे.

ही भेट योगायोगाने झालेली असली, तरी त्याचे छायाचित्र डॉ. विखे यांनी शेअर केल्याने चर्चा सुरू झाली. विखे-पवार यांच्यात राजकीय वितुष्ट आहेच. लोकसभा निवडणुकीपासून ते आणखी वाढत गेले. या निवडणुकीत डॉ. विखेंचा विजय आणि पार्थ यांचा पराभव राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला. मात्र, त्यानंतर काही काळातच पार्थ यांची भाजपशी संबंधित लोकांची मैत्री चर्चेत आली होती. त्यांचे काही ट्विटही यासाठी चर्चेत आले होते. त्याची एवढी चर्चा झाली होती की, शेवटी स्वत: पवार यांनी याची दखल घेत समजुतीच्या गोष्टी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या दोघांची भेट आणि त्याचे डॉ. विखे यांनी छायाचित्र शेअर करणे, यामुळे चर्चेला तोंड फुटले. पार्थ पवार यांनी मात्र या भेटीबद्दल काहीही भाष्य केल्याचे दिसून येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी सध्याचे कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नगरला भेट दिली होती. त्यावेळीही डॉ. विखे यांनी भेटीचे छायाचित्र असेच शेअर केले होते. त्यावेळीही अशाच चर्चा रंगल्या. पवार-विखे यांच्यातील राजकीय वैर तिसरी पिढी संपविणार, अशीही चर्चा झाली होती. प्रत्यक्षात मात्र हे वैर कायम राहिले. पुढे डॉ. विखे खासदार आणि रोहित आमदार झाले. मात्र, त्यांच्या या मैत्रीची चुणूक पुन्हा पहायला मिळत नाही.


nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget