January 2021

मुंबई - दिल्ली शेतकरी हिंसाचाराला केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह जबाबदार  असल्याची टीका, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. हे सरकार असंवेदनशील आहे. शेतकरी आणि गुंड यांच्यातील फरकच यांना कळत नाही असा आरोप त्यांनी केला. संसदेत आपण या मुद्यावर पुन्हा भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागले. आंदोलक शेतकरी आणि आणि स्थानिक असल्याचा दावा करणारे काही स्थानिक एकमेकांमध्ये भिडले. स्थानिक आंदोलक विरुद्ध शेतकरी आंदोलक आमने-सामने आल्यानंतर गोंधळ उडाला.स्थानिकांकडून आंदोलक शेतकऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनीही इथे लाठीमार केला.

दरम्यान, दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात नंदुरबार जिल्ह्यातील आंबापुर येथील सीताबाई रामदास तडवी यांचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला. केंद्र सरकार काळे कायदे मागे घेण्यासाठी अजून किती शेतकऱ्यांचे जीव घेणार असा प्रश्न तडवी यांच्या कुटुंबाने उपस्थित केला आहे. सीताबाई या लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेतृत्वात दिल्लीला गेल्या होत्या. या आंदोलनात सहभागी होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या सीताबाई या महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी आहेत. त्या १५ जानेवारी रोजी दिल्लीला गेल्या होत्या. सीताबाईच्या मृत्यूमुळे सम्पूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे गाझियाबाद प्रशासनानं शेतकरी आंदोलकांना उत्तर प्रदेश गेटवरुन हटण्याचे आदेश दिलेत. आंदोलन स्थळ रिकामे करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला. मात्र प्राण देऊ पण आंदोलन स्थळ सोडणार नाही, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी दिला आहे. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर दोन महिन्यांपासून बंद असलेला रस्ता खुला करण्यात आला आहे. पण रस्त्याच्या एकाच लेनवरुन वाहतूक सुरु आहे. एका रस्त्यावर अद्यापही शेतकरी आंदोलन चालू आहे. मात्र दुसरा मार्ग खुला केल्यामुळे गाजियाबाद दिल्ली वाहतूक सुरळीत सुरू झाली. 

मुंबई - सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी रात्री उशिरा महत्वाचा निर्णय घेतला आहे. धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. यावरून सर्वच स्तरावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मुंबईत प्रफुल्ल पटेलांच्या घरी झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत राजीनाम्याबद्दल महत्वाचा असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

बलात्काराच्या आरोपावरून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाहीत, असा महत्वाचा निर्णय पक्ष वरिष्ठांच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत प्रफुल्ल पटेलांच्या घरी झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला. रेणू शर्माविरोधात ब्लॅकमेलिंगच्या तीन तक्रारी आल्याने धनंजय मुंडे सेफ असल्याचे म्हटले आहे. धनंजय मुंडेवर थेट बलात्काराचे आरोप करण्यात आले. इतकेच नाही तर स्वत: धनजंय मुंडे यांनी लग्नाच्या बायकोशिवाय आपले आणखी एका महिलेसोबत संबंध होते आणि तिच्यापासून आपल्याला दोन मुले असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पण त्याच महिलेच्या धाकट्या बहिणीने आता बलात्काराचा आरोप केल्याने धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्दच पणाला लागली आहे.सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे गंभीर आरोप केले आहेत.त्यात भाजप नेत्यांनी त्यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केल्याने मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. खरे तर धनंजय मुंडेंनी बुधवारीच पवारांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. त्यापूर्वी त्यांनी फेसबूकवर या प्रकरणाचा खुलासा केला होता.

मुंबई - कोविड-१९ आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचा पहिला साठा आज (ता. १३) सकाळी ५.३० वाजता मुंबईमध्ये दाखल झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचला आहे.पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे १ लाख ३९ हजार ५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ प्रसंगी मुंबईतही लसीकरण सुरू करणे शक्य होणार आहे.महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला. पोलिसांची दोन वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती. एफ/दक्षिण विभाग कार्यालयात लस साठा वाहनाचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तळमजल्यावरील लस भांडार कक्षात विहित प्रक्रियेनुसार लस साठवण्यात आली आहे.


रायपूर - २०१३मध्ये एका स्थानिक पत्रकाराची हत्या करणाऱ्या तीन नक्षलवाद्यांनी आज (मंगळवार) आत्मसमर्पण केले आहे. छत्तीसगडच्या बैजपूरमध्ये ही घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.हे नक्षलवादी बासागुडा-जागरगुंडा भागात सक्रिय होते. माओवादी 'पोकळ'विचारसणीने केलेली निराशा आणि वरिष्ठांच्या अत्याचारांना कंटाळून या तिघांनी पोलीस आणि सीआरपीएफ जवानांसमोर आत्मसमर्पण केले. आलम बामो (२४), मोदियाम सुंदर (२७) आणि मदम मोतू (२८) अशी या तिघांची नावे आहेत.यांपैकी आलम हा कार्यकारी पथकाचा डेप्युटी कमांडर होता. तर सुंदर हा त्याच्याच पथकातील एक सदस्य होता. तसेच, मोतू हा पुरवठा पथकाचा सदस्य होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या तिघांनी यापूर्वी सुरक्षा दलांवर अनेक वेळा हल्ले केले होते. यामध्ये २०१२ सालच्या आयईडी ब्लास्टचाही समावेश होता. या हल्ल्यात सुरक्षा दलांच्या दोन जवानांना वीरमरण आले होते.यासोबतच, साई रेड्डी या पत्रकाराच्या हत्येमध्येही त्यांचा सहभाग होता. एका हिंदी दैनिकासाठी काम करणाऱ्या या पत्रकाराची २०१३च्या डिसेंबरमध्ये बासागुडा गावात हत्या करण्यात आली होती.आत्मसमर्पण केल्यानंतर या तिघांनाही प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच, शासनाच्या नियमानुसार पुनर्वसनासाठी इतर गोष्टींची मदतही करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

जयपूर - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने बंदुकीच्या गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना राजस्थानमधील भिलवारा जिल्ह्यात घडली आहे.बी. रणजीत यांची सीआयएसएफच्या ९व्या केंद्रीय राखीव दलात नियुक्ती होती, अशी माहिती हनुमान नगर पोलीस स्टेशनचे एसएचओ मोहम्मद इम्रान यांनी दिली. मृत जवान मूळचे तामिळनाडूमधील रविहासी होते. त्यांचा २१ फेब्रुवारीला विवाह होणार होता. त्यांच्या पार्थिवाजवळ आत्महत्येबाबतची कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही. त्यांच्या आत्महत्येबाबतची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे. देवळी रुग्णालयात जवानाचे पार्थिव ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जवानाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.दरम्यान, बंदुकीच्या गोळ्या झाडून जवानाने आत्महत्या केल्याचा घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले. या या तिन्ही कायद्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. त्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. आज सर्वाच्च न्यायालयाने तीन्ही कृषी कायद्यांना स्थगिती दिली असली तरीही शेतकऱ्यांना ही स्थगिती मान्य नाही. हे कायदे सरकारने कायमचे रद्द करावेत, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.केंद्रीय कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तात्पुरती स्थगिती घातली. शेतकऱ्यांच्या निषेधावरील याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांची अंमलबजावणी थांबविली. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतरही शेतकरी आपले आंदोलन संपविण्यास तयार नाहीत आणि कायदा रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.भारतीय किसान युनियनचे सरचिटणीस राकेश टिकैत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सांगितले की, 'हा कायदा रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहिल. न्यायालयाच्या आदेशाचा शेतकरी संघटना अभ्यास करतील, जेणेकरून पुढील रणनीती ठरवता येईल. ते म्हणाले, 'एकदा न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आम्ही कोअर कमिटीची बैठक बोलावू आणि आमच्या कायदेशीर टीमशी चर्चा करू. यानंतर, आम्ही काय करावे हे ठरवू.सर्वोच्च न्यायालयाने कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती देताना या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक समिती गठीत केली, ज्यात एकूण चार जणांचा समावेश असेल. या समितीत हरसमिरत मान, कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी, कृषीतज्ज्ञ डॉ. प्रमोदकुमार जोशी, अनिल घनवट यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या अर्जावर कोर्टाने २६ जानेवारी रोजी शेतकरी संघटनांना नोटीस बजावून उत्तर मागितले. या मुद्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. ट्रॅक्टर रॅलीबाबत राकेश टिकैट म्हणाले की, २६ जानेवारीच्या योजनेनुसार ट्रॅक्टर रॅली सुरूच राहणार असून शेतकरी सीमा सोडणार नाहीत.


मुंबई - बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने प्रसिद्ध मुच्छड पानवाला उर्फ जयशंकर तिवारी याला अटक केली आहे. मुंबईतल्या केम्स कॉर्नर त्याचे पानाचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीकडून करण सजनाणी या ब्रिटिश अनिवासी भारतीयाला अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. या बरोबर अभिनेत्री दिया मिर्झा हिची माजी मॅनेजर राहिला फर्निचर हीला हीअटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशी नंतर एनसीबीने मुच्छड पानवाला याला अटक केली आहे. पानवाला याचे बॉलिवूडमधील मोठ्या हस्तीं बरोबर चांगले संबध आहेत.

मुच्छड पानवालाचे खरे नाव जय शंकर तिवारी असून १९७० च्या दशकामध्ये मुंबईत आल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांचा पान बनवण्याचा व्यवसाय सुरू ठेवला होता. मात्र यामध्ये प्रगती करत त्याने बॉलिवूडमधील सेलिब्रेटी व उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांच्या संपर्कात राहून स्वतःचा व्यवसाय पसरवला होता. दरम्यान, मुंबईतल्या वेगवेगळ्या परिसरातील उच्चभ्रू वस्ती व बॉलिवूडमधील कलाकारांसोबत मुच्छड पानवाला याची चांगली ओळख आहे.

अभिनेता सुशांत सिंग अमली पदार्थ प्रकरणातील तस्कर अनुज केशवानीला एनसीबीने अटक केली होती. अनुज केशवानी हा करन सजनानी कडूनच अंमली पदार्थ घेऊन तस्करी करायचा. तसेच करन सजनानी परदेशातील महागड्या अमली पदार्थांची तस्करी करायचा. करन सजनानी हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून तो ब्रिटिश नागरिक आहे. एनसीबीने त्याच्याकडून ७५ किलो भारतीय गांजा, तर १२५ किलो परदेशी अंमली पदार्थ जप्त केले. हा करन सजनानी आर्टिशनल मॅरुआना ज्वाईंट अमेरिकेचे इम्पोर्टेंड बड रिकामे बाॅक्स सांगून एअरपोर्ट वरुन घेऊन आला होता. ज्याचे वजन १.१ किलो आहे. त्याची बाजार किंमत ६०ते ७० लाख रुपये आहे. करन सजनानी हा परदेशी अंमली पदार्थ भारतातील गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मेघालय या राज्यात तस्करी करायचा.

मुंबई - केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. या आंदोलनात आतापर्यंत ६० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला असून, केंद्रातील असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नाही. या निर्दयी, अहंकारी मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी १६ तारखेला ‘राजभवनला घेराव’ घालण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.थोरात म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार अत्यंत निदर्यी असून शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर कमालीचे असंवेदशील आहे. जुलमी कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून ते भांडवलदारांच्या हिताचे आहेत, ही शेतकऱ्यांची भूमिका योग्य असून, काँग्रेस पक्षाने वारंवार शेतकऱ्यांना पाठिंबा देत विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारचे हे काळे कृषी कायदे महाराष्ट्रात लागू केले जाणार नाहीत. ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. एकीकडे शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे इंधन दरवाढ करून सामान्य जनतेलाही लूटत आहे. कृषी कायदे रद्द करावेत आणि पेट्रोल-डिझेलची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी या मागणीसाठी १६ तारखेला आंदोलन केले जाणार आहे.शेतकऱ्यांबरोबर मोदी सरकारने सामान्य जनतेला लुटण्याचा उद्योग सुरू केला आहे. पेट्रोल डिझेलमध्ये सतत दरवाढ करून नफेखोरी केली जात आहे. इंधन दरवाढीने ७३ वर्षातील उच्चांक गाठला आहे. मे २०१४ मध्ये पेट्रोलवर असलेली ९.२० रुपये एक्साईज ड्युटी वाढवून मागील सहा वर्षात मोदी सरकारने ३२.९८ रुपये केली आहे. लिटरमागे २३.७८ रुपयांची वाढ म्हणजे तब्बल २५८ टक्के वाढ, तर डिझेलची मे २०१४ मध्ये असलेली ३.४६ रुपये एक्साईज ड्युटी आज ३१.८३ रुपये केली म्हणजे प्रति लिटर २८.३७ रुपये आणि ८२० टक्क्यांची वाढ. विशेष म्हणजे, जगात क्रूड ऑईलचे दर ११० डॉलर प्रति बॅरलवरून ५० डॉलर प्रति बॅरल एवढे घसरलेले असताना ही इंधन दरवाढ केली जात आहे.

नागपूर - राज्यातील पोलीस भरती मागील ३ वर्षांपासून प्रलंबित असून ती लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. या मागणीला घेऊन महासंघाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटनाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन सोमवारी ११ जानेवारीला केले जाणार आहे. मागील तीन वर्षांपासून राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया प्रलंबित आहे. भरतीची घोषणा करुन राज्य सरकार भरतीला वारंवार स्थगिती देत आहे, असा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला. तसेच, पोलीस भरती लवकरात लवकर घेण्याची मागणी करत महासंघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी महासंघाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरासमोर जमा होऊन घंटानाद आदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. हे आंदोलन सोमवारी केले जाईल. यावेळी ओबीसी समाजाचे तसेच पोलीस भरतीसाठी कित्येक वर्षांपासून तयारी करणारे तरुणही उपस्थित असतील.

गृह विभागाने २०१९ मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार जाहिरातही प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र, ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया खोळंबली.त्यानंतर सरकारने जानेवारी महिन्यात पोलीस भरतीचा पुन्हा आदेश काढला. यामध्ये राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला. त्यांनतर गृहविभागाचा पोलीस भरतीचा जीआर चुकीचा आहे. ही पोलीस भरती तातडीने थांबवण्याची मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली होती.राज्य सरकारच्या या भरती प्रक्रियेविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. सामाजिक आणि मागास प्रवर्गातंर्गत (SEBC) आरक्षण न देता राज्यात पोलीस भरती प्रक्रिया (Police recruitment) राबवली तर मराठा समाजाकडून पुन्हा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा संघटनांनी दिला होता. त्यांनतर राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात 4 जानेवारीला गृहविभागाने काढलेला जीआर पुन्हा एकदा रद्द केला आहे.या सर्व गोष्टींमुळे आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक झाला आहे. महासंघाने भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्याची मागणी केली. 

कोलकाता - एआयएमआयएम पश्चिम बंगालचे प्रमुख एस. के. अब्दुल कलाम यांनी तृणमूल काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. त्यांच्यासह इतर सदस्यांनीही एमआयएमला सोडचिठ्ठी देत टीएमसीत प्रवेश केला.मागील अनेक वर्षांपासून पश्चिम बंगाल एक शांत राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र या शांततेत विषारी हवा सोडण्याचे काम सध्या सुरू झाले आहे, अशी टीका त्यांनी टीएमसीत प्रवेश करतेवेळी भाजपावर केली. टीएमसीच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत कलाम यांनी प्रवेश केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टीएमसीची वाट धरली आहे.

ते पुढे म्हणाले, की एमआयएमने पश्चिम बंगालच्या राजकारणात आधीच प्रवेश करायला हवा होता. आता मात्र येथे योग्य वातावरण नाही. मी बांकुरा, मुर्शिदाबाद, कूचबिहार आणि मालदा या जिल्ह्यांचा दौरा केला. तेथील नागरिकांशी बोललो. सध्याची विषारी हवा रोखायला हवी, असा सूर निघाला. त्यानंतर आपण तृणमूलमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले.२९४ सदस्यांच्या विधानसभेसाठी पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. साधारण १०० ते ११० जागांवर मुस्लीम मतांचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत जाणवला. टीएमसीला त्याचा फायदा झाला. आता कलाम यांच्या प्रवेशानंतर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

जयपूर - आत्तापर्यंत देशातील सात राज्यात बर्ड फ्लू आजार पसरला असून हजारो पक्षांचे मृत्यू झाले आहेत. याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावरही झाला आहे. राजस्थानातील ११ जिल्ह्यात बर्ड फ्लू पसरला असून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. कोंबड्या, बदक, चिमणी, कावळे, बगळे, कबूतर यांच्यासह अनेक पक्ष्यांचेचे मृत्यू होत आहेत.केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे. तर इतर काही राज्यांतील पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि दिल्लीतही पक्षांचे मृत्यू झाले आहेत. या राज्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. केंद्रीय पशुसंवर्धन, मासेमारी आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.ज्या राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झाला आहे. तेथील पोल्ट्रीतील कोंबड्या, इतर पक्षी आणि अंडी नष्ट करण्यात येत आहेत. काही राज्यात प्रवासी पक्षांचेही मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने आजार दुसऱ्या ठिकाणी पसरू नये म्हणून प्रतिबंधित क्षेत्रे निर्माण केली असून परिस्थितीवर बारकाईने नियंत्रण ठेवण्यात येत आहे. राजस्थान सरकारने जोधपूर शहरातील प्राणी संग्राहालयात जाण्यास नागरिकांना बंदी घातली आहे.

महाराष्ट्रातील दापोली, ठाणे येथे पक्षांचे मृत्यू झाले आहेत. लातूर जिल्ह्यातही सुमारे साडेतीनशे कोंबड्या दगावल्या. त्यामुळे नागरिकांत भीत पसरली आहे. महाराष्ट्रात अद्याप बर्ड फ्लू आल्याचा कोणताही पुरावा नाही. ठाणे येथील पक्षांचे नमुने बर्ड फ्लू निगेटिव्ह आल्याचे पशुसंवर्धन मंत्र्यांनी सांगितले. तर इतर काही ठिकाणांवरी पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.केरळ राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झाला असून शेकडो पक्षांचा मृत्यू झाला आहे. या संकटापासून पोल्ट्री व्यवसायिकांना सावरण्यासाठी केरळ सरकार धावून आले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना सरकार नुकसान भरपाई देणार असून राज्याच्या कॅबिनेट बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली - देशात लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. दुसर्‍या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त व तिसर्‍या टप्प्यात गंभीर आजाराने ग्रस्त ५० वर्षाखालील लोकांना लसी दिली जाईल. दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात सुमारे २७ कोटी लोकांची लसीकरण होईल.१६ जानेवारीपासून देशात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरणासंदर्भात शनिवारी उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. ज्यामध्ये लसीकरणाच्या अंतिम तारखेची घोषणा करण्यात आली. या बैठकीत कॅबिनेट सेक्रेटरी, पंतप्रधानांचे प्रधान सचिव व आरोग्य सचिव यांच्याव्यतिरिक्त इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.


पुदुच्चेरी - पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल आणि मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण बेदींना उपराज्यपाल पदावरून हटवा या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या समर्थकांनी राज्यपाल निवासाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.पुद्दुचेरीत काँग्रेस प्रणित सेक्युलर डेमॉक्रॅटिक पक्षाचे सरकार आहे. किरण बेदी निवडून आलेल्या सरकारची विकास कामे आणि कल्याणकारी योजना लागू करण्यात बाधा आणत असल्याचा आरोप मुख्यमंत्री व्ही. नारायण स्वामी यांनी केला आहे. राज निवासबाहेर मुख्यमंत्री आणि समर्थकांनी ८ जानेवारीला आंदोलन सुरू केले आहे.

मुख्यमंत्र्याशिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ए. व्ही. सुब्रमण्यम, अनेक मंत्री, कार्यकर्ते, सीपीआय, सीपीआय(एम) पक्षाचे नेते कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाचा सहकारी द्रमुक या आंदोलनापासून दूर राहिला आहे. पंतप्रधान मोदी लोकशाही आणि जनतेच्या कल्याणाचा विचार करत असतील तर त्यांनी किरण बेदींना माघारी बोलवावे, असे सीपीआय पक्षाचे सचिव मुधुरासम यांनी म्हटले आहे.

मुंबई - औरंगाबाद महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. नामांतराच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारमधून दोन भूमिका समोर आल्यामुळे हा वाद अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने नामांतराच्या मुद्द्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास काँग्रेसने ठाम विरोध केला आहे. तर, शिवसेनेनं नामांतराच्या हालचालीही सुरु केल्याचे बोलले जातं आहे. त्यामुळे आघाडीत दोन गट पडले असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते प्रफु्ल्ल पटेल यांनीही भाष्य केले आहे.'शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या समन्वय समितीत निर्णय झाल्याशिवाय औरंगाबाद नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. औरंगाबादचे नामांतर ही शिवसेनेची भूमिका आहे सरकारची नाही,' प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

समन्वय समितीत नामांतराच्या विषयावर एकमत झाल्याशिवाय हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. समन्वय समितीत चर्चा होऊन या वादावर तोडगा काढण्यात येईल. शिवसेनेचे नेते औरंगाबादला संभाजीनगर म्हणत असले तरी ती भूमिका सरकारची नाही, असेही पटेल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही नामांतराचा प्रस्ताव आमच्या अजेंडामध्ये नाही. नाव बदलून शहरांचा विकास होतो असे आम्ही मानत नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली होती.

मुंबई - दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी  किसान अलायन्स मोर्चा मुंबईत १६ जानेवारी रोजी लाँगमार्चचे आयोजन केले आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनातील चर्चा निष्फळ ठरत आहे. कृषी कायदे रद्द करण्याबाबत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही. केवळ चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, कायदे रद्द करणार नाही. काही सूचना असेल तर सांगा. मात्र, शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. आता पुन्हा १५ जानेवारीला होणार चर्चा होणार आहे. मात्र, किसान अलायन्स मोर्चाने आंदोलनाची तयारी केली आहे.

किसान अलायन्स मोर्चा केंद्र सरकारवर आरोप केला आहे. कोरोनाचे कारण पुढे करीत संसदेचे हिवाळी अधिवेशन टाळणाऱ्या मोदी सरकारने, कोरोनाची परिस्थिती टोकाची असताना संसदेचे कामकाज चालवून शेतकरी विरोधी कायदे मंजूर केले. शेतकऱ्यांना, त्यांच्या संघटनांना वा देशातील विरोधी पक्षांना चर्चेची संधी न देता, त्यांना विश्वासात न घेता, हे कायदे मंजूर करण्यात आले. तेव्हापासूनच देशातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. कारण हे कायदे शेती व्यवसायाच्या मुळावर येणार आणि काही उद्योगपतींच्या हातातील वेठबिगार बनणार, ही शेतकऱ्यांची भावना आहे, असे किसान अलायन्स मोर्चाने म्हटले. 

केंद्र सरकारने शेती क्षेत्रात कायदे करुन संकट आणले आहे. संघटित कामगारांचा विरोध आपण मोडू शकतो, तर असंघटित असलेल्या शेतकऱ्यांना सहज गप्प करू, या भ्रमात सरकारने शेती विषयक तीन कायद्यांना मंजुरी दिली. सरकारच्या विरोधात शेतकरी लढायला उभे राहिले आहेत. दिल्लीच्या दिशेने कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी खंदक खोदण्यापासून काटेरी तारांचे कुंपण करण्यापर्यंत आणि शेवटी कडाक्याच्या थंडीत गार पाण्याचा मारा करून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न सरकारने केला. मात्र या सगळ्यांवर मात करीत शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर गेले जवळपास दीड महिना ठाण मांडले आहे. लहान मुलेबाळे, महिला यात सहभागी आहेत! या काळात ५० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र जीवाची पर्वा न शेतकरी कशालाही बधले नाहीत आणि शांततेच्या मार्गाने त्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे, असे किसान अलायन्स मोर्चाने सांगत आम्ही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लॉगमार्च काढत आहोत.

मुंबई - अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.यासाठी ती सध्या जोरदार तयारी करत असून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच ही स्टारकिड सोशल मीडियावर चर्चेत आहे.शनायाने गेल्याच वर्षी फॅशन विश्वात पदार्पण केले आहे. नुकतेच तिने एक फोटोशूट केले असून यामध्ये तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज दिसुन येत आहे. मेकअप आर्टिस्ट रिद्धिमा शर्मा हिने शनाया हिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. स्टारकिड असूनही शनाया कॅमेरापासून सहसा दूरच असते. परंतु नुकतीच ती नेटफ्लिक्सच्या  "The Fabulous Lives of Bollywood Wives या कार्यक्रमात तिची आई महिप कपूर बरोबर दिसली होती. या फोटोमध्ये शनाया काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसून येत असून खूपच हॉट अवतारात दिसत आहे. 


मुंबई - भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. इरफान ‘कोब्रा’ या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात तो दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमसोबत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी इरफान पठाणचा आगामी चित्रपट ‘कोब्रा’चा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्यांनी ‘विक्रम आणि इरफान पठाण मुख्य भूमिकेत असणाऱ्या कोब्रा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. कोब्रा हा तामिळ चित्रपट असून माजी क्रिकेटपटू इरफान पठाण या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे’ असे म्हटले आहे.सध्या सोशल मीडियावर अभिनेता विक्रम आणि इरफान पठाणच्या ‘कोब्रा’ चित्रपटाचा टीझर चर्चेत आहे. ही जोडी मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. इरफान आणि विक्रमसोबत चित्रपटात केएस रविकुमार, मृणालिनी, कनिका, पद्मप्रिया हे कलाकार दिसणार आहेत.

ठाणे - शहरात कोरोना काळामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी खूप काम केले. सत्ताधारी शिवसेनेने मात्र, बघ्याची भूमिका घेतली होती. दिवंगत नेते आनंद दिघे यांनी कायम सामाजिक बांधिलकी संपली मात्र, त्यांची जागा आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाणेकर भाजपाला सहकार्य करतील. महापलिकेवर भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.राज्यात सत्ता स्थापन कारण्यासाठी शिवसेनेने हिंदुत्वचा झेंडा खांद्यावरून उतरवला. सध्या शिवसेनेची स्थिती 'नाचता येईना अंगण वाकडे', अशी झाली आहे. प्रत्येकवेळी राज्य सरकार म्हणून स्वतः काही करायचे नाही आणि नेहमी केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे. त्यांचे हेच उद्योग सध्या सुरू आहेत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.कोपरीत सुरू असणाऱ्या धार्मिक कार्यक्रमामुळे, ठाण्यात हिंदू धर्माची पताका जपण्याचे काम करत असल्याचे जनतेला दिसत आहे. ठाण्यात भाजपाचे काम योग्य पद्धतीने सुरू असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. कोरोना काळात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लोकांसाठी धावपळ करून समाजसेवा केली. आनंद दिघे यांची सामाजिक बांधिलकी आणि दिघे यांच्या कामाचा वसा खऱ्या अर्थाने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उचललेला असल्याचे स्पष्ट चित्र दिसत असल्याचे प्रवीण दरेकर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

ठाणे - घराच्या मालकीवरून कौटुंबिक वादातून एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने आपला भाऊ व दुसऱ्या स्वर्गवासी भावाची पत्नी यांना चाकूने भोसकल्याचा प्रकार किसननगरमध्ये घडला. या हल्ल्यात २८ वर्षीय भावाचा जागीच मृत्यू झाला असून भावजय गंभीर जखमी झाली आहे.याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी निवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कर्डक यास अटक केली आहे.महेंद्रने पोलिस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. वागळे इस्टेट येथील किसननगर नंबर दोनमधील विजय सदन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर नीता कर्डक (४३) यांच्या घरात त्यांचा दीर महेंद्र कर्डक (५५) राहत होता. नीता यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर हे घर झाले होते. या घरासाठी त्यांनी वारंवार विनवण्या केल्या होत्या. अखेर घराचा ताबा घेण्यासाठी त्या इमारतीत आल्या असता त्यांचे व महेंद्रचे कडाक्याचे भांडण झाले. कौटुंबिक वादाची माहिती श्रीनगर पोलिसांना मिळताच गस्तीवरील बीट मार्शल पोलिस शिपाई राठोड व धोंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नीता व महेंद्र यांच्यातील वाद सोडवण्यासाठी नीता यांचा दुसरा दीर अजय कर्डक धावून आला. मात्र संतप्त महेंद्रने दोघांवर चाकूने हल्ला केला. त्यात अजयचा जागीच मृत्यू झाला तर नीता याही रक्तबंबाळ झाल्या. गस्तीवरील पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले. राठोड व धोंडे यांच्या प्रसंगावधानामुळे नीता यांचे प्राण वाचू शकले, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. धोंडे व राठोड यांनी महेंद्रचा शोध घेतला, तेव्हा तो त्याच्या खोलीत होता व स्वतःवर वार करण्याची धमकी देत होता. मात्र धोंडे यांनी मोठ्या कौशल्याने त्याच्या हातातील चाकू काढून घेतला.

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवर आज (शुक्रवार) शेतकरी नेत्यांची सरकारसोबत चर्चा होणार आहे. ही चर्चेची आठवी फेरी असून आधीच्या सातही बैठका निष्फळ ठरल्या आहेत. दरम्यान, काल शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर ट्रॅक्टर रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले. सुमारे पाच हजार ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.कृषी कायद्यांवरून केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. तिन्ही कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. तर सरकार कायदे रद्द करण्यास तयार नाही. काल (गुरुवार) केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शीख धार्मिक नेते बाबा लखा सिंग यांची पंजाबात जाऊन भेट घेतले. लखा सिंग हे नानकसार सीख पंथाचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडून आंदोलनस्थळी शेतकऱ्यांसाठी लंगरही चालविण्यात येतात. सरकार आणि शेतकऱ्यांत मध्यस्थी व्हायला आवडले, असे त्यांनी म्हटले. मात्र, लखा सिंग आणि शेतकरी आंदोलनाचा काहीही संबंध नसल्याचे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.केंद्रीय मंत्रीगटासोबत शेतकरी संघटनांच्या नेत्यांची चर्चा होणार आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय अन्न मंत्री पियूष गोयल, वाणिज्य आणि व्यापार खात्याचे राज्यमंत्री सोम प्रकाश यांचा मंत्रीगटाच्या समितीत समावेश आहे. तर शेतकरी संघटनांचे ४१ प्रतिनिधी बैठकीत सहभागी असणार आहेत. बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्रालयाने अनौपचारिक बैठकही घेतली. तसेच बैठकीआधी सर्व मंत्रीगटातील सर्व मंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळत आहे.

बीड - पंचायत समिती सभापती विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला मोठा धक्का दिल्याची चर्चा राज्यभरात सुरु होती. कारण, भाजपच्या ३ सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे गुरुवारी सांगण्यात आले. पण, ते तीनही सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा परळी भाजपकडून करण्यात आला. तसे प्रसिद्धी पत्रकच भाजपने जारी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही भाजपनं केला आहे. पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधात गुरुवारी अविश्वास ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या ३ सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे प्रसिद्धी पत्रक राष्ट्रवादीकडून जारी करण्यात आले. त्यावर आता भाजपनेही एक प्रसिद्धी पत्रक काढून ते सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा केला आहे. तसंच त्या सदस्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातम्या देत राष्ट्रवादी काँग्रेसने बनवाबनवी केल्याचा आरोप भाजपने केला.

भाजपचे तिनही सदस्य अधिकृत चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, असे पत्रक काढून राष्ट्रवादी काँग्रेस दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपचे पंचायत समिती सदस्य असलेले भरत सोनावणे, मुरलीधर साळवे आणि मोहन आचार्य यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आपला विश्वास आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे म्हटले.परळी पंचायत समिती सभापती उर्मिला शशिकांत गित्ते यांच्याविरोधात गुरुवारी दुपारी बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. याप्रसंगी भाजपच्या सदस्यांनी चक्क राष्ट्रवादीला मदत केली.  परळी पंचायत समिती सभापती म्हणून उर्मिला शशिकांत गित्ते या काम पाहत होत्या. मात्र राष्ट्रवादीच्या सदस्यांना चक्क भाजपच्या सदस्यांनी साथ देऊन गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आणि तो ठराव पारितही झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परळी पंचायत समिती सभापतीविरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय. तरीही बबन गित्ते यांच्या घरासमोर दीडशे ते दोनशे कार्यकर्त्ये जमा झाले होते. तेव्हा पोलिसांनी ती गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांनी गित्ते यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी 2 गावठी पिस्तुल, 4 जिवंत काडतूस आणि लाठ्या-काठ्यासह अन्य धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नागपूर - कोरोना काळात मातोश्री आणि वर्षा निवासस्थानावरुन राज्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना ते भेट देतील. आज सकाळी  मुख्यमंत्र्यांचे नागपुरात आगमन होईल. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने गोसेखुर्द धरणाकडे रवाना होणार आहेत. गोसेखुर्द प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्षी २ हजार कोरी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचं पाटंबधारे विभाकडून सांगण्यात आले होते. जुलैमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यावेळी प्रकल्पाच्या पुनर्वसनाला गती देण्याची सूचना केदार यांनी दिली होती.गोसेखुर्द प्रकल्पाची सुधारीत प्रशासकीय मान्यता १८ हजार ४९४ कोटी रुपयांची आहे. प्रकल्पाची एकूण क्षमता ११४६ दलघमी आहे. तर सिंचन क्षमता २ लाख ५० हजार ८०० हेक्टर आहे. गोसेखुर्द धरणावर खासगीकरणांतर्गत २ विद्यूत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० डिसेंबर रोजी सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याचा दौैरा केला. रत्नागिरी इथे दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोफळी प्रकल्पाची पाहणी केली. पोफळी जलविद्युत प्रकल्पातील विद्युतगृहाचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अनिल परब, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

मुंबई - अभिनेता सोनू सूद  विरोधात अवैध बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी मुंबई महापालिकेच्या निर्णयावर टीका केली आहे. कंगना रणौत नंतर सोनू सूद यांच्यावर वेळ आली असून किती जणांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार, असा सवाल राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. राम कदमांनी त्याबाबत ट्विट केले आहे. 

भाजप आमदार राम कदम यांनी यापूर्वी कंगना रणौतच्या बाजूने मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली होती. मुंबई महापालिकेने अभिनेता सोनू सदू विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर राम कदमांनी त्याच्या बाजूनं भूमिका मांडली आहे. कोरोना संकटाच्या काळात सोनू सूद यांनी गरीब मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मदत केली. हे काम महाविकास आघा़डी सरकारने करायला हवे होते. मात्र, ही गोष्ट सरकारला आवडली नाही,त्यामुळे बदल्याच्या भावनेतून कंगना रणौत आणि आता सोनू सूद यांच्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे, असे राम कदम म्हणाले. महाविकास आघाडी सरकार किती जणांचे आवाज दाबणार असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.

प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जुहू पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबई महापालिकेने जुहू पोलिसांकडे तक्रार करुन सोनू सूद विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायद्यांतर्गत सूदने केलेल्या अनियमित भरती, बदल आणि उपयोगकर्त्याच्या बदल्याची नोंद घेण्यासंदर्भात जुहू पोलिसांना सांगण्यात आले आहे. पालिकेने सोनू सूद विरोधात ४ जानेवारील तक्रार दाखल केली आहे. सहा मजली इमारत परवानगी न घेता हॉटेलमध्ये रुपांतरित केल्याची पालिकेची तक्रार आहे. सोनू सूदला याबाबत नोटीस देऊन सुद्धा बांधकाम सुरूच ठेवले त्यामुळे पालिकेने पोलिसात तक्रार केली.


वॉशिंग्टन - वॉशिंग्टन डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारामुळे अमेरिकन लोकशाही व्यवस्थेला धक्का बसला आहे. कॅपिटॉल इमारत परिसरातील घडामोडींनंतर अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मॅट पॉटिंगर, फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांच्या चीफ ऑफ स्टाफ स्टेफनी ग्रीशम आणि व्हाइट हाऊसचे उप प्रेस सचिव सारा मॅथ्यूज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्टेफनी ग्रीशम यांनी व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव पदाची जबाबदारी सुद्धा संभाळली आहे. त्यांनी सर्व प्रथम राजीनामा दिला.

“व्हाइट हाऊसमध्ये राहून देशसेवा करणे हा एक सन्मान होता. लहान मुलांना मदत करण्याच्या मेलेनिया ट्रम्प यांच्या मोहिमेचा मी एक भाग होते, याचा मला अभिमान आहे ” असे ग्रीशम यांनी टि्वटरवर म्हटले आहे.आज कॅपिटॉल इमारतीमध्ये मी जे बघितले, ते पाहून अस्वस्थ झाले. मी माझ्या पदावरुन तात्काळ पायउतार होत आहे. आमच्या देशाला शांततेने सत्ता हस्तांतरणाची गरज आहे, असे सारा मॅथ्यूज यांनी म्हटले आहे.

भावी राष्ट्राध्यक्ष जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच मोठया संख्येने ट्रम्प समर्थक राजधानी वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीवर धडकले. कॅपिटॉल इमारतीमध्ये अमेरिकन काँग्रेसचे सभागृह आहे. इथे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील इलेक्टोरल मतांची मोजणी सुरु होती. बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर विजय मिळवल्याची घोषणा करण्यात येणार होती. या प्रक्रियेत बाधा आणण्याच्या हेतूने हे सर्व घडवण्यात आले. कॅपिटॉल इमारत परिसरात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून ५२ जणांना अटक करण्यात आली आहे.


नवी दिल्ली - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच असून सुमारे दीड महिन्यापासून शेतकरी सीमेवर आहेत. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ट‌्रॅक्टर रॅली काढणार असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी केली आहे. त्याची रंगीत तालीम आज शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर केली.शेकडो शेतकरी ट्रॅक्टर घेवून महामार्गावर पोहचले होते. त्यामुळे दिल्लीला जोडणाऱ्या अनेक महामार्गांवरी टोल नाक्यावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. आंदोलकांना दिल्लीत आत येऊ दिले जाणार नाही, यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

२६ जानेवारीला विशाल ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी आणि सरकारमधील चर्चा अद्यापही सुरू असून तोडगा निघाला नाही. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून सरकार कायदे रद्द करण्यास तयार नाही. शेतकऱ्यांच्या सर्व शंका दूर केल्या जातील असे आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिले आहे. मात्र, कायदे रद्द केल्यानंतरच चर्चा करण्यात येईल, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

किसान रॅलीत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत सहभागी झाले होते. गाझीपूर सीमेवरून त्यांनी ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात केली. आत्ता काढण्यात आलेली ट्रॅक्टर रॅली फक्त ट्रेलर असून खरी परेड तर २६ जानेवारीला पाहायला मिळेल, असे टिकैत यांनी म्हटले.

मुंबई - जलद गतीने दुपट्ट पैसे मिळवण्याच्या मोहात तुम्ही कुठे गुंतवणूक करत असाल तर सावधान ! कारण अशा प्रकारच्या फसवणुकीचा भांडाफोड खार पोलिसांनी केला. ब्रिटिश नागरिक इसा अहमद खान असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून तो ब्रिटीश नागरिक असल्याचा पोलिसांना संशय आहे. इसाने EA Rarcoa collection private limited  या नावाने मुंबई आणि बंगळूर येथे कंपनी स्थापन करुन लोकांना लाखोंचा गंडा घातला.

दुर्मिळ नाण्यांच्या खरेदी विक्रीतून काही महिन्यात दुप्पट परतावा करतो असे आमिष इसाने आपल्या कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना दाखवले. यामध्ये मुंबईमधील एका नागरिकाने ७२ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.मात्र काही महिन्याने पैसे मिळणे बंद झाले. त्यानंतर इसाविरोधात फसलेल्या गुंतवणुकदारांनी खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करण्यासाठी सुरवात केली. हा सर्व प्रकार बंगळूरमधून चालायचा. 

पोलिसांनी युबीसीटी बंगळूर येथील कार्यालयातून डिझाईन कॉईन बनविण्याचे डाय, कंपनीचे ब्रोशर्स, व्हिजिटिंग कार्ड्स तसेच वेगवेगळ्या देशाचे आणि चित्रांचे ९१७ दुर्मिळ कॉईन हस्तगत केले आहेत. तसेच आरोपीचे विविध ६ बँक खात्यामधीलएक कोटी ११ लाख ४७ हजार रुपये गोठविले आहेत.

दुर्मिळ नाणे मुंबईमधील जुन्या बाजरातून विकत घेऊन देणाऱ्या आमिर याकूब शेख ३० वर्षीय या आरोपीला अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी फरार आहे. ब्रिटिश पासपोर्ट असला तरी तो पाकिस्तानी नागरिक असल्याचा  पोलिसांना संशय आहे. आरोपींनी आतापर्यत १५ ते १६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. जर अशाप्रकारे तुमची फसवणूक झाली असेल तर पोलिसांशी संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे. .

मुंबई - कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटिव्ह’ संशोधनासाठी अनुकुल वातावरण आणि क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राज्य शासन कोकणच्या शाश्वत विकासासाठी बांधिल असून खासदार पवार यांच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आंतरराष्ट्रीय नवोन्मेश (इनोव्हेशन) विभाग म्हणून विकसित करण्यासंदर्भात राज्य सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड  इनोव्हेटिव्ह रिजन’ संदर्भात सादरीकरण केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनीही इनोव्हेटिव्ह रिजनच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवत कोकणच्या आणि राज्याच्या विकासासाठी या संकल्पनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले.

बैठकीला उपमुख्यमंत्री तिन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राला अनेक क्षेत्रात पुढे नेण्याचे प्रयत्न होत असताना कोकणला ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड  इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची मोठी संधी आहे. कोकणात त्यासाठी अनुकुल वातावरण आहे. कोकणात बुद्धिमत्ता, सर्जनशीलता प्रचंड आहे. मुंबई विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, मत्स्यविज्ञान संस्था याठिकाणी आहेत. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करुन घेत तेथील निसर्गाला हानी न पोहोचवता या विभागाचा विकास करणे शक्य आहे, असे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले.पुढील ५० ते १०० वर्षांचा विचार करुन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, असेही शरद पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही या संकल्पनेचे सादरीकरण करुन त्यांच्या मान्यतेनंतर पुढे जावे, अशी सूचनाही पवार यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोकणातील तिन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. तिन्ही मंत्री आणि राज्य सरकार कोकणचा ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड  इनोव्हेटिव्ह रिजन’ विकास करण्यासाठी सकारात्मक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणानंतर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. 

मुंबई - बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने आपल्या मैत्रिणीची हत्या करून स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. मालाड पश्चिमच्या लिंक रोडवरील इनॉर्बिट मॉलच्या मागे ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री नऊच्या सुमारास घडली. सोमवारी रात्री एका मुलाने स्वत:वर गोळी झाडण्याआधी मुलीला ठार मारले. दोघांचीही ओळख पटली असून तपास सुरू आहे, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) दिलीप सावंत यांनी सांगितले.कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी भेट देली असून घटास्थळाची पाहणी केली. 'ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचे प्राथमिकदृष्या दिसत असून मुलीचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. दोघांचेही वय सारखेच होते. घटनास्थळावरून एक बंदुक हस्तगत करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे, असे अस्लम शेख यांनी सांगितले.संबंधित तरुण आणि तरुणी कांदिवलीतील घाणेकरवाडी येथील रहिवासी होते. दोघे अ‍ॅक्टिव्हा स्कुटीवरून येथे आले होते. तरुणाने आधी तरुणीवर गोळी झाडली. त्यानंतर त्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. तरुणाने वापरलेले हत्यार हे देशी कट्टा असून यासंबंधी पोलीस अधिक तपास करत आहेत.

नवी मुंबई - आमदार रोहित पवार यांनी आज पहाटे चार वाजता अचानक नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये भेट दिली. पहाटे ते बाजार समितीतल्या भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये दाखल झाले.मार्केटमधल्या व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी बातचीत केली. शेतकऱ्यांसाठी एपीएमसी आवश्यक आहे. केंद्राने कृषी कायदा देशावर लादला असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकार एपीएमसीबाबत योग्य निर्णय घेईल असे आश्वासन त्यांनी दिले.

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा ४१ वा दिवस आहे. शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये चर्चेची आणखी एक फेरी पार पडली. मात्र, या फेरीतूनही काही तोडगा समोर आला नाही. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास मनाई केल्यामुळे आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे.यानंतर शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये पुढील बैठक ८ जानेवारीला होणार आहे. दुपारी दोनच्या सुमारास ही बैठक पार पडेल.बैठकीमध्ये कायदे मागे घेण्याची मागणी शेतकरी संघटनांनी लावून धरली होती. मात्र, सरकारने तसे करण्यास नकार दिल्यामुळे ही चर्चा फिस्कटली आहे.भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकाईतही या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी सांगितले, की बैठकीच्या पहिल्या तासामध्ये केवळ कायद्यांबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत आमची मागणी स्पष्ट आहे. आम्हाला यासंदर्भात कोणत्याही समितीची गरज नसून, कायदे मागे घ्या हीच आमची मागणी असल्याचे टिकाईत यांनी सांगितले.

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ४० दिवसांपासून देशभरात आंदोलने सुरू आहेत. तसेच, दिल्लीच्या सीमांवर प्रमुख ४० शेतकरी संघटनांसह, देशभरातील सुमारे ५०० शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आलेल्या थंडीच्या लाटेमध्येही हे शेतकरी सीमांवरतीच बसून आहेत. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, आणि एमएसपी लागू करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी ही आंदोलने सुरू आहेत.

नवी दिल्ली - केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे.या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. जानेवारी २०२१ पासून ही वाढ करण्यात आली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.सध्या कर्मचाऱ्यांना १७ टक्के महागाई भत्ता मिळतो. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता २८ टक्के होईल. केंद्र सरकारच्या ५० लाख कर्मचाऱ्यांना तसेच ६० लाख निवृत्ती धारकांना याचा लाभ होईल. विविध राज्यांच्या कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे.

याआधी जुलै २०२० मध्ये महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवण्यात आला. त्यापूर्वी जानेवारी २०२० मध्ये महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. आता पुन्हा महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्यामुळे केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.सरकारने कर्मंचाऱ्यांना महागाई भत्ता दिलेला नाही. त्यामुळे आता एकत्र ११ टक्के वाढीसह कर्मंचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार आहे. याआधी कर्मचाऱ्यांना १७ टक्के महागाई भत्ता देण्यात येत होता. आता नव्या वाढीनंतर महागाई भत्ता २८ टक्के होणार आहे. अयोध्या  - येत्या मकर संक्रांतीपासून म्हणजेच १५ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. तीन वर्षात राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने शनिवारी दिली.५ एकर जागेमध्ये बांधले जाणारे हे राम मंदिर तीन मजली असणार आहे. मंदिराची लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट आणि उंची १६१ फूट असणार आहे. या बांधकामासाठी साधारण ४०० वर्षांपर्यंत तग धरेल अशा सिमेंटचा वापर केला जाणार आहे. मंदिराच्या दर्शनीभागात २२ पायऱ्या असतील तर, ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांसाठी लिफ्ट आणि एस्कलेटरचीही सुविधा असणार आहे. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला ६५ एकर क्षेत्रामध्ये विविध बांधकामे केली जाणार आहेत, अशी माहिती ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली.बांधकामचे कंत्राट दिलेल्या कंपन्यांना मंदिर पूर्ण करण्यास साधारण तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे डिसेंबर २०२३पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दिवसाला ५० हजार भाविक मंदिरात येतील, असा अंदाज ट्रस्टला आहे. बांधकामासाठी देणगी जमा केली जाणार आहे. जानेवारी महिन्यापासून ते मेघ पौर्णिमेपर्यंत हे काम चालणार आहे. यासाठी ४ लाख स्वयंसेवक ११ कोटी घरांना भेटी देणार आहेत.

राम जन्मभूमी मंदिर बांधकामाच्या ठिकाणी एकूण १२ खांबांसाठी खोदकाम करून त्यात बसवलेल्या खांबांची चाचणी करण्यात आली. या खांबांच्या तपासणीचे काम आयआयटी चेन्नईचे अभियंते आणि मंदिर बांधकामासाठी अधिकृत नियुक्ती केलेल्या लार्सन अँड टुब्रोच्या युनिटने केली. पायासाठी घातलेले खांब एक मीटर व्यासाच्या आत ३३ मीटर खोलीपर्यंत खोदले गेले आहेत. भूकंपाच्या धक्क्याने भगवान रामाच्या मंदिरावर परिणाम होऊ नये आणि पूर आल्यासही या ऐतिहासिक मंदिरास कोणताही धोका होऊ नये, या दृष्टीने पाया जमिनीपासून शंभर फुटांपेक्षा जास्त खोलीवर ठेवला जात आहे. तसेच, या खांबांवर ७०० टनांचे वजन टाकून त्यांच्या क्षमतेचे मूल्यांकनही आयआयटी चेन्नईच्या तज्ज्ञांनी केले आहे.ट्रस्टने भगवान श्री राम मंदिर अयोध्येत बांधले जावे, यासाठी जगातील ऐतिहासिक मंदिर बनविण्यासाठी एक विशेष कृती योजना तयार केली आहे. या मंदिराच्या रचनेपासून ते पाया घालण्यापर्यंत सर्व बाबींमध्ये हे मंदिर शेकडो नव्हे तर, हजारो वर्षे हवामान आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करू शकेल, अशा मजबुतीकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. तसेच, विशेष सौंदर्यासह बांधण्यात येत असलेले हे राम मंदिर श्रद्धा आणि पर्यटनाचे केंद्र बनेल, असे ट्रस्टने म्हटले आहे.

मुंबई - काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कॉमन मिनिमम प्रोग्रामची आठवण करुन दिल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसची नाराजी समोर आली आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेनेने राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, हे लक्षात ठेवावे असे त्यांनी म्हटले.संजय निरुपम यांनी शनिवारी यासंदर्भात ट्विट केले. औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र, आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. युतीचे सरकार हे वैयक्तिक अजेंड्यावर नव्हे कॉमन मिनिमम प्रोगामच्या आधारे चालते. हा कॉमन मिनिमम प्रोगाम काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, नाव बदलण्यासाठी नाही, असा टोला संजय निरुपम यांनी शिवसेनेला लगावला. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून निरुपमांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

औरंगाबाद शहराच्या नामांतरच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये केवळ नुरा कुस्ती सुरु असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. शिवसेनेला फक्त निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो. आतादेखील महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की, शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील, असे थोरात म्हणाले. औरंगाबादच्या नामकरणाचा वाद पुन्हा एकदा पुढे आला असताना बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती.

मुंबई - केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यात फास्टटॅगच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. पण, पहिल्या टप्प्यात केवळ दोन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि सी लिंकवर १०० टक्के फास्टटॅग कार्यान्वित करण्यात येणार आहे. तर इतर काही ठिकाणी फास्टटॅग सुरू करण्याचा २६ जानेवारीचा मुहुर्त चुकणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.राज्यात पहिल्या टप्प्यात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक आणि अन्य दोन ठिकाणी २६ जानेवारीला १०० टक्के फास्टटॅगची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. मात्र, हा मुहूर्त चार-पाच दिवस पुढे जाईल, असे एमएसआरडीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पण नेमकी तारीख सांगण्यास नकार दिला आहे.देशभरातील टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. टोलची प्रक्रिया पूर्ण करण्याकरता बराच वेळ लागत असल्याने ही गर्दी होताना दिसत आहे. ही बाब लक्षात घेता काही महिन्यांपूर्वी केंद्राने फास्टटॅग ही इलेक्ट्रॉनिक टोल वसुली प्रणाली बंधनकारक केली. पण ही प्रणाली राबवण्यासाठी आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी वेळ लागणार असल्याने फास्टटॅगला मुदतवाढ दिली. दरम्यान फास्टटॅग हे स्टिकर गाडीच्या समोरील बाजूस लावल्यास या स्टिकरवर असलेल्या आरएफआयडीमार्फत ऑनलाइन टोल संकलन होते. वाहनधारकांच्या बँक खात्याशी फास्टटॅग जोडले गेलेले असते. त्यामुळे काही सेकंदात टोल भरला जातो. त्यामुळे वेळ वाचतो आणि गर्दी कमी होते, इंधन वाचते.

केंद्र सरकारने १ जानेवारीपासून देशभर १०० टक्के फास्टटॅग अनिवार्य केले आहे. पण कुठल्याही यंत्रणेची यादृष्टीने तयारी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे राज्यात १ जानेवारी नव्हे तर २६ जानेवारी आणि मार्च अशा दोन टप्प्यात एमएसआरडीसीच्या अखत्यारीतील टोलनाके १०० टक्के फास्टटॅग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास प्राधिकरणाने १५ फेब्रुवारीपासून केंद्राच्या निर्णयाची अमलबजावणी करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यासह देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर १५ फेब्रुवारीपासून फास्टटॅग अनिवार्य होणार आहे.


मुंबई - खारमधील १४-रोडवरील भगवती हाइट्स या इमारतीमध्ये एका मुलीचा तिच्या मित्रांनी खून केला. ३१ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये जान्हवी कुकरेजा या १९ वर्षीय मुलीचा खून झाला.इमारतीच्या टेरेसवर झालेल्या पार्टी मध्ये एकूण १२जण उपस्थित होते. त्यामध्ये पाच मुलींचा समावेश होता. हे सर्वजण मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. मृत जान्हवी तिचा मित्र श्री जोगधनकर (वय २२) आणि दिया पडनकर (वय १९) यांच्यासोबत या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. अगोदर पार्टीमध्ये येऊन हे तीघे पुन्हा जान्हवीच्या घरी तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. सांताक्रुजमधील घरी वाढदिवस साजरा करून ते रात्री १२वाजता खारमधील पार्टीत पोहचले. मात्र, जान्हवीला पार्टीमध्ये आक्षेपार्ह गोष्टी आढळल्यानंतर तिने पार्टीमध्ये थांबण्यास नकार दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवीने श्री आणि दियाला पार्टीमध्ये अश्लील चाळे करताना पाहिले. त्यानंतर तिघांमध्ये जोरदार वाद झाला होता. या वादा दरम्यान श्री आणि दियाने जान्हवीचे डोके जिन्याच्या लोखंडी रेलींगला आपटले. या झटापटीमध्ये जान्हवीच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर दोघांनी तिला तिथेच सोडून पळ काढला. मात्र, यश नावाच्या मित्राने जान्हवीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहिले. त्याने आपल्या कुटुंबाच्या मदतीने खार पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. या प्रकरणाचा तपासकरून पोलिसांनी श्री आणि दिया या दोघांना अटक केली आहे.

नवी मुंबई - नेरुळ, ऐरोली येथील माताबाल रुग्णालयातील आरोग्यव्यवस्था सक्षम करण्यासाठी गेला महिनाभर सुरू असलेले नियोजन १ जानेवारीपासून प्रत्यक्षात उतरत असून अतिदक्षता व औषध विभाग या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले. मार्चअखेर या दोन रुग्णालयांतील तीनशे खाटा कार्यान्वित होणार असून  फेब्रुवारीमध्ये शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्याचे नियोजन आहे.मागील १० वर्षांपासून करोडो रुपये खर्चून पालिका प्रशासनाने या उत्तुंग इमारती बांधल्या होत्या. मात्र फक्त बारुग्ण सेवा या ठिकाणी सुरू होती. त्यामुळे चांगल्या आरोग््य सुविधा मिळत नसल्याने नागरिकांत नाराजी होती. रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयावरच या आरोग्य सेवेचा मोठा ताण येत होता. असे असताना नेरुळ व ऐरोली येथे बांधलेल्या रुग्णालयांची क्षमता ३०० खाटांची असतानाही त्या ठिकाणी फक्त बारुग्ण सेवा दिली जात होती. या सात मजल्यांच्या दोन्ही इमारतींमध्ये चार मजले पडून होते. करोनाकाळात पालिकेची आरोग्य सुविधा तोकडी पडल्याने पालिका प्रशासनाला मोठय़ा प्रमाणात या सुविधा वाढवाव्या लागल्या. खासागी रुग्णालयांचाही आधार घ्यावा लागला. यासाठी कोटय़वधी रुपये मोजावे लागले. त्यामुळे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ऐरोली व नेरुळ येथील या सात मजली इमारती वापरात आणण्याचे नियोजन आखत ही दोन्ही रुग्णालये सामान्य रुग्णालय करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी गेला महिनाभर रुग्णालयत प्रत्यक्ष भेटी, बैठका घेतल्या जात होत्या.  त्यानुसार नवीन वर्षांच्या पहिल्या दिवसापासून प्रायोगिक तत्त्वावर या दोन्ही रुग्णालयांत अतिदक्षता व औषध विभाग सुरू करण्यात येत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १५ खाटांची सुविधा असलेला महिला व पुरुष औषध उपचार विभाग आणि १० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे.यासाठी आवश्यक उपकरणे व साहित्य, औषधे आणि मनुष्यबळाची पूर्तता करण्यात आली आहे. गॅस वाहिनीचे कामही सुरू करण्यात आले असून १ जानेवारीपासून ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी दिली.

भिवंडी - भिवंडी शहरात मलनिस्सारण प्रकल्प राबवला जात असून, ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून भुयारी गटारांची निर्मिती केली जात आहे. मात्र कामाच्या ठिकाणी ठेकेदारांसह मनपा प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात कोणत्याही उपायोजना राबवण्यात आलेल्या नाही.मलनिस्सारण केंद्राच्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. गौसिया आरिफ शेख असे या दुर्दैवी चिमुरडीचे नाव आहे. तर तिच्यासोबत खड्ड्यात पडललेल्या ५ वर्षांचा रेहान इम्रान शेख याला वाचवण्यात यश आले आहे.

भिवंडी शहरातील चव्हाण कॉलनी कोंडाजीवाडी या भागात उदच्चन केंद्र बनविण्यात येत असून, तेथे सुमारे तीस फूट खड्डा खोदण्यात आला आहे. कोरोना काळात काम बंद असल्याने या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डबके झाले आहे. शुक्रवारी नजीकच्या झोपडपट्टीतील मृतक गौसिया व रेहान ही दोन चिमुरडी मुले त्या ठिकाणी खेळत असताना, त्यांचा तोल जाऊन ती पाण्यात बुडाली. शेजारीच एका इमारतीचे बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरीकांनी पाण्यात उड्या मारून या दोन्ही मुलांना बाहेर काढले, व उपचारासाठी स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी गौसिया आरिफ शेख या ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. तर रेहान इम्रान शेख हा ५ वर्षांचा चिमुरडा हा या दुर्घटनेत वाचला असून, त्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने नागरिक संतप्त झाल्याने, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत फौजफाटा घेऊन, घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेनंतर परिसरातील नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, येथे काम करणाऱ्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सुरक्षा रक्षक ठेवणे गरजेचे असताना ते न ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.


नवी मुंबई - तोटय़ात सुरू असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाला पुढील काळात विद्युत बसचा मोठा आधार मिळणार आहे. केंद्र शासनाच्या विद्युत वाहनांच्या धोरणामुळे (फेम योजनेअंतर्गत) वर्ष अखेपर्यंत  २३० विद्युत बस नवी मुंबई परिवहन सेवेत दाखल होणार आहेत. यातील ३० बस सध्या सेवा देत असून त्या फायदेशीर ठरत आहेत. तर ३० बस या महिनाअखेर परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

पेट्रोल, डिझेल या पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र शासन बॅटरीचलित वाहनांसाठी प्राधन्य देत धोरण आखत आहे. यासाठीचा ‘फेम १’ हा टप्पा संपला असून या अंतर्गत नवी मुंबई परिवहन उपक्रमासाठी ३० विद्युत बस अनुदानावर मिळाल्या आहेत. या बस सध्या प्रवासी सेवा देत असून त्या पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या बसपेक्षा फायदेशीर ठरत आहेत. सध्या केंद्राच्या ‘फेम २’ योजनेला गती देण्यात आली असून त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात नवी मुंबई परिवहन उपक्रमाला १०० व दुसऱ्या टप्प्यात १०० बसचा प्रस्ताव आहे. ‘फेम २’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील १०० विद्युत बससाठी महापालिकेने रीतसर प्रस्ताव पास करून त्याबाबत ठेकेदार निश्चित करून कार्यादेश दिला आहे. त्यामुळे या महिन्यात यातील ३० बस तर पुढील काही महिन्यात ७० बस मिळणार आहेत.सध्या सुरू असलेल्या ३० बस फायदेशीर ठरत असल्याने पालिकेने १०० बसच्या प्रस्तावाव्यतिरिक्त केंद्राकडे अतिरिक्त १०० बसेसची मागणी केली होती. त्यालाही केंद्राने मान्यता दिली आहे. त्यामुळे या १०० बस मिळण्यासाठी आता पालिका ठेकेदार निश्चिती करत असून ही प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे फेम २ अंतर्गत परिवहन उपक्रमाला दोनशे विद्युत बस मिळणार असल्याने या वर्षअखेर शहरात २३० विद्युत बस धावतील असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

अगोदरच नवी मुंबई परिवहन उपक्रम तोटय़ात सुरू आहे. पालिकेच्या अनुदानावर त्याचे अवलंबित्व आहे. त्यातच करोनामुळे उपक्रमाच्या तोटय़ात भर पडली आहे. परिवहन उपक्रमाचा तोटा ४ कोटीवरून जवळजवळ ७.५० कोटीवर गेला आहे. यातून सावरण्यासाठी या विद्युत बसचा मोठा हातभार लागणार असल्याने याला प्राधान्य देत लवकरात लवकर या बस मिळविण्याचे नियोजन पालिका प्रशासन करीत आहे.

ठाणे - २५ डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह चाविंद्रा येथे निर्जनस्थळी शुक्रवारी आढळला. हा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत होता. कृष्णा केशरवाणी (२८ ) असे मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव असून तो भिवंडी शहरातील घुंगट नगर परिसरातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी सोहेल खान या भंगार विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतक व आरोपी दोन्ही भंगार विक्रीचा व्यवसाय करीत होते. याच व्यवसायच्या वादातून कृष्णा केशरवाणी याची निर्घृण हत्या सोहेल खान याने केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

कृष्णा केशरवाणी हा शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता घुंगट नगर येथून भंगार खरेदी करण्यासाठी निघाला. परंतु तो परत आला नाही. रात्री उशिरापर्यंत कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. पण तो न सापडल्याने त्यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. त्याचा सर्वत्र शोध सुरू असतानाच भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा या आडवाटेच्या रस्त्यावर त्याची दुचाकी आढळून आल्याने त्याच्या घरच्यांची धास्ती वाढली. पोलिसांनी आपल्या मुलाचा तत्काळ शोध घ्यावा, यासाठी कुटुंबियांसह शेकडो नागरिकांनी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते.भिवंडी शहर पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सोहेल खान या भंगार व्यवसायिकास ताब्यात घेत त्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. कृष्णा हा सोहेल खानकडून चोरीचे भंगार खरेदी करायचा. परंतु व्यवहार न पटल्यास पोलिसांना खबर देऊन माझा माल पकडून देऊन आर्थिक नुकसान करायचा. या रागातून त्याने ही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.मृतदेह चाविंद्रा गावाच्या हद्दीत यंत्रमाग कारखान्याच्या पुढे असलेल्या निर्जन ठिकाणी आणून टाकल्याचे सांगितल्यावर पोलिलांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी मृतदेहाचे शीर व पायाचे काही अवशेष कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून न्यायिक शवविच्छेदनासाठी मुंबई येथे पाठविण्यात आला.

मुंबई -  नव्या वर्षाला सुरूवात करत नव्या संकल्पाला अभिनेत्री वनिता खरातने सुरूवात केली आहे. वनिता खरातने वर्षाच्या पहिल्याच दिवशी अतिशय बोल्ड फोटो शेअर केला आहे. वनिता खरातने शेअर केलेला हा बोल्ड फोटो फक्त शाब्दिकरित्या बोल्ड नसून तो वैचारिकदृष्ट्या ही बोल्ड आहे. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळतगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला आहे. वनिता खरातने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना यासोबत एक पोस्टही लिहिली आहे. वनिता म्हणते की,'मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे ... कारण मी मी आहे...!!!


मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही काळ मोठ्या पडद्यापासून दूर होता. मात्र, आता लवकरच तो रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. रणबीर त्याच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.२०२१ या नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच रात्री बरोबर १२ वाजून १ मिनिटांनी रणबीरने त्याच्या सोशल मीडियावर नव्या चित्रपटाचा टीझर शेअर केला. अ‍ॅनिमल असे रणबीरच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात रणबीर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.


मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने सोशल मीडिया अकाउंट्सवरुन २०२०च्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर रोजी सर्व सोशल मीडिया पोस्ट डिलीट केल्या आहेत. १ जानेवारी रोजी दुपारी तिने एक ऑडिओ डायरी शेअर केली. या माध्यमातून दीपिकाने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाचा शुभेच्छा दिल्या आहेत.मात्र, दीपिकाने आपल्या सर्व जुन्या पोस्ट डिलीट करण्याचा अचानकपणे हा निर्णय का घेतला हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.दीपिकाचे इंस्टाग्रामवर जवळपास ५ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिने केवळ इंस्टाग्रामच नव्हे तर ट्विटर आणि फेसबुक या सोशल मीडिया अॅपवरुनदेखील तिच्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्यामुळे १ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत तिच्या अकाऊंटवर कोणतीही पोस्ट दिसली नाही.विशेष म्हणजे या पोस्ट दीपिकाने स्वतः डिलीट केल्या की अन्य कोणत्या तांत्रिक कारणामुळे तिच्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत. हे मात्र, अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय यावर दीपिकाने देखील अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.

मुंबई - महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारविरोधात टीकास्त्र सोडण्याचीची मोहीम राबविणाऱ्या कंगना रनौत हिला न्यायालयाने झटका दिला आहे. सदनिकांचे (फ्लॅट) अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, कंगनाने नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहे.उपनगर दिंडोशी येथील खटल्याची सुनावणीच्यावेळी न्यायाधीश एल. एस.चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे की, “खार परिसरातील १६ मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगना रनौत हिने आपले तीन फ्लॅट एकत्रित करताना नियोजित आराखड्यातील बांधकाम काढले आहे. त्यामुळे अन्य क्षेत्रही त्यात समाविष्ट केले. हे मंजूर योजनेचे गंभीर उल्लंघन आहे, ज्यास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे.

त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेला अनधिकृत बांधकाम पाडण्यापासून रोखण्यासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या आदेशामुळे अभिनेत्री कंगना रनौत हिला झटका बसला आहे. मार्च २०१८ मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकीने तिच्या खार फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम कामासाठी अभिनेत्रीला नोटीस बजावली. पण त्यानंतर ही बाब मागे पडली होती.


मुंबई - अमर महाल येथील पंचशील नगरमध्ये गेल्या दोन वर्षापासून महिलांचे आंदोलन सुरू आहे. एसआररए पुनर्वसन प्रकल्पाबाबत हे बेमुदत आंदोलन आहे. पंचशील नगरमध्ये मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय लोक राहतात. त्यांच्या घरांसाठी आणि बुद्धविहारासाठी जागा मिळावी म्हणून हे आंदोलन केले जात आहे. आपल्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या महिलांच्या या बेमुदत आंदोलनाला भीम आर्मीचे प्रमुख अ‌ॅड. चंद्रशेखर आझाद पाठिंबा घोषित केला.

अ‌ॅड. संतोष सांजकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षापासून महिला आंदोलन करत आहेत. एसआरएच्या नावाखाली पंचशीलनगर येथील रहिवाशांना मागील सहा वर्षांपासून स्वत:च्या हक्काचे घर दिले गेले नाही. त्यांचे धार्मिक स्थळ असलेले बुद्ध विहार बांधून दिले नाही. रहिवाशांना गार्डन, पार्किंग इत्यादी मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. पंचशीलनगरप्रमाणे संपूर्ण मुंबईमध्ये एसआरएच्या नावाखाली झोपडपट्टीमधील रहिवाशांवर होत असलेल्या अन्यायाला राज्य व देश पातळीवर वाचा फोडण्यासाठी चंद्रशेखर आझाद चेंबूरमध्ये दाखल झाले होते. त्यांनी सर्व नागरिकांना एकत्र येऊन लढा देण्याची विनंती केली. आपण नक्कीच विजय मिळवू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.जे स्वप्न सरकारने नागरिकांना दाखवलेला आहे ते खोट आहे. बिल्डरच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जमिनी हडपने हा त्यांचा उद्देश आहे. अगोदरच्या सरकारवर मला विश्वास नव्हता. या सरकारवर मला विश्वास आहे. मी सरकारमधील मंत्र्यांना या विषयाबाबत भेटून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन. मला विश्वास आहे की, सरकारमधील लोक आमच्या मागण्या मान्य करतील. जर, मागण्या मान्य नाही केल्या तर, मी स्वतः हे आंदोलन पुढे चालवेन, असे चंद्रशेखर आजाद म्हणाले.मुंबई - तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने बुधवारी रात्रीपासून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील २०० कंत्राटी उद्घोषकांनी काम बंद आंदोलन सुरू केले, त्यामुळे उद्घोषणा ठप्पच झाली. तर सीएसएमटी स्थानकात गुरुवारी धरणे आंदोलन केल्याने गोंधळ उडाला. कंत्राटदाराला वेतनाचे बिल रेल्वेकडे जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर वेतन लवकरच मिळेल, या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

रेल्वे स्थानकातील उद्घोषणांसाठी पूर्वी रेल्वेच्या विविध विभागातूनच उद्घोषकांची निवड होत होती. यामध्ये बढती किंवा वेतन वाढीचीही शक्यता नसल्याने रेल्वे कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे उद्घोषकांची कमतरता जाणवू लागल्याने मध्य रेल्वेने २०१६ पासून कंत्राटी पद्धतीने त्यांची भरती करण्यास सुरुवात केली. यासाठी एका कंपनीला कंत्राटही दिले. उद्घोषकांची कंत्राटी पद्धतीने दोन वर्षांकरिता भरती केली जाऊ लागली. सध्या २०० उद्घोषक काम करतात. त्यांना गेल्या तीन महिन्यांपासूनचे वेतनच देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासू लागली. बुधवारपासून उद्घोषकांनी काम बंद आंदोलन केले. यासंदर्भात कंत्राटदाराशी रेल्वे प्रशासनाने चर्चा केली असून त्याला वेतनाची बिले सादर करण्यास सांगितले असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले. लवकरच त्यांचे वेतन दिले जाईल, असेही ते म्हणाले.


लखनऊ - आर्थिक घोटाळ्यांप्रकरणात आरोपी असणारे समाजवादी पक्षाच्या सरकारमधील माजी मंत्री राहिलेल्या गायत्री प्रसाद प्रजापती यांच्या घरासोबतच कार्यालयामध्येही सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापे मारण्यात आले. या कारवाईमध्ये अनेक कागदपत्र, हवाला माध्यमातून फिरवण्यात आलेल्या पैशांसदर्भातील माहिती ईडीच्या हाती लागली आहे. बुधवारी आणि शुक्रवारी ईडीने केलेल्या या कारवाईमध्ये गायत्री प्रजापतींबरोबरच त्यांची मुले आणि जवळच्या नातेवाईकांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर छापे मारले. या छाप्यांमध्ये बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणामधील काही धक्कादायक कागदपत्र ईडीच्या हाती लागली आहे.माजी खाण मंत्री असणाऱ्या प्रजापती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असणाऱ्या ४४ हून अधिक ठिकाणच्या संपत्ती आणि जमिनींसंदर्भातील माहिती समोर आली आहे. या सर्व संपत्तीची किंमत तीन हजार ७९० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही संपत्ती बेकायदेशीररित्या कमावली असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्तीचे कागदपत्र सापडल्याने या प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढवण्यात आला असून अनेक ठिकाणी छापेमारी सुरु करण्यात आली आहे. सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार ११ लाख रुपयांच्या जुन्या चलनी नोटा, पाच लाख किंमतीचे स्टॅम्प पेपर आणि इतरही बरीच संपत्तीची माहिती ईडीला मिळाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रजापती यांनी आपल्या नोकऱ्यांच्या नावाने संपत्ती जमा केल्याचे उघड झाले आहे. प्रजापती यांच्या ड्रायव्हरच्या नावावर २०० कोटींची संपत्ती असल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागण्याचे वृत्त आहे.

३० डिसेंबर रोजी ईडीच्या काही तुकड्यांनी लखनऊमध्ये प्रजापती यांच्या मुलाच्या कार्यालयाबरोबरच, कानपूरमधील प्रजापती कुटुंबियांचे चार्टड अकाउटंट, अमेठीमध्ये राहणारा प्रजापती यांच्या चालकाच्या घरी एकाचवेळी छापा मारला. या छापेमारीमध्ये ईडीला खूप महत्वाचे कागदपत्र हाती लागले आहेत. या सर्व कागदपत्रांमध्ये बेकायदेशीर पद्धतीने कमावलेल्या संपत्तीची माहिती आहे. लखनऊमध्ये ईडीच्या तुकडीला काही वर्षांपूर्वीच चलनामधून हद्दपार झालेल्या ११ लाख रुपये मुल्य असणाऱ्या जुन्या चलनी नोटा, पाच लाख रुपये किंमतीचे स्टॅम्प पेपर, पुण्यामध्ये कोट्यावधींची संपत्ती, चालकाच्या नावे २०० कोटींच्या संपत्तीचे पुरावे सापडले आहेत.छापेमारी करणाऱ्या तुकड्यांना असे अनेक पुरावे सापडलेत ज्यामधून प्रजापती कुटुंबाने बेकायदेशीररित्या संपत्ती जमा केल्याचं सिद्ध होत आहे. प्रजापती कुटुंबाने काळा पैसा हा अधिकृत कमाई असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचेही या कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे. लखनऊमध्ये प्रजापती कुटुंबाने ११० एकर जमीन खरेदी केल्याचेही या कागदपत्रांमधून उघड झालं आहे. आता ईडीने मिळालेल्या माहितीच्या आधारे पुण्यामधील नोंदणी विभागाकडून येथील संपत्तीसंदर्भातील माहिती मागवली आहे. २०१९ साली ऑगस्टमध्ये गायत्री यांच्याविरोधात हवाला कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या गायत्री प्रजापती हे सामुहिक बलात्कार प्रकरणासाठी तुरुंगात आहेत तर त्यांचा मुलगा आर्थिक घोटाळ्यांच्या गुन्ह्यांसाठी तुरुंगामध्ये आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटाखाली २०२० हे वर्ष काढल्यानंतर आज देशवासियांनी नवा संकल्प घेत, नवीन वर्षाचं स्वागत केले. काँग्रेस नेते राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी टि्वट्च्या माध्यमातून देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावरून भाजपा खासदार गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.'जोपर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तोपर्यंत तुम्ही निश्चित होऊन आरामात फिरू शकता आणि आनंद घेऊ शकता. पार्टी हार्ड', असे टि्वट गिरिराज सिंह यांनी केले आहे. त्यांनी राहुल गांधींना मोदी पंतप्रधान आहेत. तोपर्यंत निश्चित होऊन फिरावं आणि भरपूर मजा करावी, असा खोचक टोला लगावला आहे. राहुल गांधी भारतात नसून परदेश दौऱ्यावर गेले आहेत. राहुल गांधी ईटलीला गेल्याची माहिती आहे. राहुल गांधींनी कधीपर्यंत भारतात परत येणार हे सांगितले नसले तरी राहुल गांधी आठवडाभरात भारतात परतण्याची शक्यता आहे.

नवीन वर्ष सुरूवातील आपण ज्यांना गमावले त्यांचे स्मरण करूया आणि जे आपले रक्षण आणि त्याग करतात त्यांचे आभार मानूया. प्रतिष्ठा आणि सन्मानाने अन्यायाविरोधात लढणाऱ्या शेतकरी आणि कामगारांसोबत मी आहे, असे टि्वट त्यांनी केले. हे टि्वट रिटि्वट करत गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींवर टीका केली.

नववर्षाच्या दिवशी राहुल गांधी परदेश दौऱ्यावर जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा परदेशात नववर्षाचे स्वागत केले आहे. मात्र, यंदा त्यांच्या परदेश दौऱ्यावर विरोधकांकडून जोरदार टिका झाली आहे. देशात शेतकरी आंदोलन सुरू असताना ते परदेश दौऱ्यावर गेल्याने शेतकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस नेते राजीव सातव यांनी राहुल गांधीच्या इटली दौऱ्यामागचे कारण सांगितले. राहुल गांधी यांच्या आजींची प्रकृती फार खराब आहे. त्यांना भेटण्यासाठी ते गेले आहेत, असे त्यांनी सांगितले होते. 

मुंबई - नवीन वर्षात महिलांसाठी राज्य सरकारकडून एक चांगली बातमी आहे. संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत पुरवण्यासाठी सुरू केलेल्या १८१ हेल्पलाइन नव्या वर्षात पुन्हा स्वतंत्रपणे महिलांसाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलांना आता चोवीस तास मदतीचा हात मिळणार आहे. महिला आणि बाल विकास विभागाने ऑगस्ट २०१४ मध्ये १८१ हेल्पलाइन सुरू केली असून हेल्पलाइनचे कॉल सेंटर मुंबईत आहे. 

आजपासून बदलणाऱ्या कॅलेंडरसोबत तुमच्या दैनंदिन आयुष्यात देखील महत्वाचे बदल होणार आहेत. नव्या वर्षापासून काही नियमांत बदल होणार आहे. याचा परिणाम तुम्हाला दैनंदिन आयुष्यात जाणवायला लागेल.८ तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्यांना ओव्हरटाईम द्याला लागणार आहे. डेली वर्क ऑवर्स ८ तास ठेवण्यावर विचार केला जात आहे. याला मंजुरी मिळाल्यास ओव्हरटाईम सुरु होईल आणि ८ तासांची ड्युटी करण्यात येईल.१ जानेवारीपासून चेकने पैसे देण्याच्या नियमात बदल होईल. चेकचा व्यवहार ५० हजार रुपयांहून अधिक असेल तर पॉझिटिव्ह पेमेंट सीस्टिम लागू होणार आहे. दोन्ही पार्टीकडून याची खात्री केली जाईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे बदल करण्यात आले आहेत.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget