मध्य रेल्वेतील उद्घोषकांचे काम बंद आंदोलन

मुंबई - तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने बुधवारी रात्रीपासून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील २०० कंत्राटी उद्घोषकांनी काम बंद आंदोलन सुरू केले, त्यामुळे उद्घोषणा ठप्पच झाली. तर सीएसएमटी स्थानकात गुरुवारी धरणे आंदोलन केल्याने गोंधळ उडाला. कंत्राटदाराला वेतनाचे बिल रेल्वेकडे जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर वेतन लवकरच मिळेल, या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

रेल्वे स्थानकातील उद्घोषणांसाठी पूर्वी रेल्वेच्या विविध विभागातूनच उद्घोषकांची निवड होत होती. यामध्ये बढती किंवा वेतन वाढीचीही शक्यता नसल्याने रेल्वे कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे उद्घोषकांची कमतरता जाणवू लागल्याने मध्य रेल्वेने २०१६ पासून कंत्राटी पद्धतीने त्यांची भरती करण्यास सुरुवात केली. यासाठी एका कंपनीला कंत्राटही दिले. उद्घोषकांची कंत्राटी पद्धतीने दोन वर्षांकरिता भरती केली जाऊ लागली. सध्या २०० उद्घोषक काम करतात. त्यांना गेल्या तीन महिन्यांपासूनचे वेतनच देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासू लागली. बुधवारपासून उद्घोषकांनी काम बंद आंदोलन केले. यासंदर्भात कंत्राटदाराशी रेल्वे प्रशासनाने चर्चा केली असून त्याला वेतनाची बिले सादर करण्यास सांगितले असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले. लवकरच त्यांचे वेतन दिले जाईल, असेही ते म्हणाले.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget