जेलमध्ये आसारामची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल

जोधपूर - राजस्थानच्या जोधपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची तब्येत अचानक खालावली आहे. त्यामुळे आसारामला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लैंगिक शोषणाच्या प्रकरणात दोषी ठरल्यामुळे सध्या आसाराम बापू तुरुंगवास भोगत आहे. प्राथमिक माहितीनुसार, आसारामला मंगळवारी रात्री अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा तुरुंगातील दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, एक तास उलटूनही फरक न पडल्यामुळे आसारामला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आसारामने डॉक्टरांना आपल्याला त्रास होत असल्याचे सांगितले. माझ्या पायाचे गुडघे काम करत नाहीत. तसेच मला रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याचे त्याने सांगितले. याशिवाय, आसारामला अन्य व्याधीही आहेत.आसारामला रुग्णालयात आणल्यानंतर काही वेळातच त्याचे भक्त रुग्णालयात येऊन पोहोचले. या भक्तांना पोलिसांनी रुग्णालयाबाहेर काढले. आसारामला रुग्णालयाच्या एक्स-रे रूममध्ये ठेवण्यात आले होते. त्याठिकाणीच आसारामची ब्लड टेस्ट झाली. याशिवाय, त्याची कार्डिऑलॉजी आणि सीटी स्कॅनही करण्यात आले. हे सर्व रिपोर्टस नॉर्मल आले आहेत.महात्मा गांधी रुग्णालयात तपासणी झाल्यानंतर आसारामला मथुरादास माथुर रुग्णालयातील सीसीयू वॉर्डमध्ये भरती करण्यात आले. या रुग्णालयाच्या बाहेरही आसारामच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने २०१८ मध्ये दोषी ठरवले होते. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget