ओबीसी आरक्षणाच्या केंद्रीय यादीचे चार गट होणार ; न्या.रोहिणी आयोगाची शिफारस

नवी दिल्ली - न्यायमूर्ती रोहिणी आयोगाने दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार ओबीसी प्रवर्गामध्ये चार गट निर्माण करण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्ग म्हणजेत इतर मागास प्रवर्गाचा २७ % टक्के कोटा विभागला जाणार आहे. याविषयी पुढील महिन्यापासून प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. सरकारने नेमलेल्या न्या. जी.रोहिणींच्या आयोगाने हा फॉर्म्युला दिला. ओबीसीतल्या काही जातींना २७% आरक्षणाचा अधिक लाभ मिळत असल्याचे निदर्शनास आल्याने हा अभ्यास झाला. इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसींचा २७% कोटा विभागला जाणार आहे. केंद्रीय यादीतील २ हजार ६३३ ओबीसी जातींची १, २, ३, ४ अशी वर्गवारी करण्यात येईल.इतर मागास प्रवर्गाला मिळणाऱ्या २७ टक्के आरक्षणात ४ वर्ग तयार करण्यात येतील. त्यामध्ये अनुक्रमे २%, ६%, ९% आणि १०% आरक्षण मिळणार आहे. रोहिणी आयोगाची स्थापना २ ऑक्टोबर २०१७ ला झाली होती. ओबीसीच्या केंद्रीय यादीतील २६३३ जातींपैकी पहिल्या वर्गात १६७४ जाती असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या वर्गात ५३४ जाती, तिसऱ्या वर्गात ३२८ आणि चौथ्या वर्गात ९७ जातींचा समावेश असू शकतो. पुढल्या महिन्यापासून हा आयोग या फॉर्म्युल्यावर राज्य सरकारांसोबत चर्चा करणार आहे.

ओबीसी प्रवर्गाच्या केंद्रीय यादीमध्ये २६३३ जातींचा समावेश आहे. तर, ओबीसी प्रवर्गाला एकूण २७ टक्के आरक्षण दिले जाते. शिक्षण आणि नोकरीमध्ये २७ टक्के आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. मात्र, न्यायमूर्ती रोहिणी आयोगानं केलेल्या अभ्यासानुसार काही जाती ओबीसी आरक्षणाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत.रोहिणी आयोगाच्या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यापासून ते विविध राज्यांचा दौरा करणार आहेत. तर, देशातील ११ राज्यांमध्ये ओबीसी आरक्षणात वर्गवारी करण्यात आली आहे. आयोगाला मिळालेल्या माहितीनुसार फक्त १० जातींना २७% पैकी एक चतुर्थांश लाभ मिळत आला. ३७ जातींना दोन तृतीयांश लाभ मिळत आला.१०० जाती २७% पैकी तीन चतुर्थांश आरक्षणाचा लाभ उठवत आहेत. २,६३३ जातींपैकी २,४८६ जातींना २७% पैकी ५.४% जागाही मिळत नाहीत.१ हजारांहून अधिक जातींना तर आरक्षणाचा अजिबातच लाभ मिळत नसल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget