किरण बेदींना पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल पदावरुन हटवले

पुद्दुचेरी - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल पदावरुन किरण बेदी यांना हटवण्यात आलं आहे. किरण बेदी यांच्या जागी तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. १० फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपती कोविंद यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राद्वारे उपराज्यपालांना परत बोलवण्याची विनंती केली होती. किरण बेदी यांचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप व्ही. नारायणसामी यांनी केला होता.मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्या पत्रानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी किरण बेदी यांना पुद्दुचेरीच्या राज्यपालपदावरुन हटवले आहे. त्यांच्या जागेवर आता पुद्दुचेरीच्या उपराज्यपालपदाचा कारभार तेलंगणाच्या राज्यपालांकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान पुद्दुचेरीमधील काँग्रेस सरकार अल्पमतात आले आहे. तसेच अजून एका आमदाराने आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत १४ आमदार राहिले आहेत. त्यामुळे पुद्दुचेरी विधानसभेत आता काँग्रेसचे बहुमत नाही.असे असले तरी सरकार बहुमतात असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. एप्रिल-मे महिन्यात पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक होत आहे. त्यापूर्वी तिथे मोठ्या राजकीय हालचाली होताना पाहायला मिळत आहेत. पुद्दुचेरी विधानसभेत काँग्रेसचे १०, DMK ३, ऑल इंडिया एन आर काँग्रेस ७, AIDMK ४, भाजप ३ तर १ अपक्ष आमदार आहे. काँग्रेसच्या ४ आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर एक आमदार अयोग्य ठरले आहेत. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा १५ आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget