मुंबईला कोरोनाचा विळखा ; चेंबूरमधील ४ इमारती सील

मुंबई - राजधानी मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पालिका प्रशासनाने येथे मिशन झिरो सुरु केले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. शुक्रवारी शहरात तब्बल ८२३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच चेंबूरमधील चार इमारती सील करण्यात आल्या आहेत. आगामी १४ दिवसांसाठी या इमारती सील असतील. बऱ्याच महिण्यांच्या विश्रांतीनंतर राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) कोरोनाचे नवे ८२३ रुग्ण आढळले असून चेंबूरमधील चार इमारती सील करण्यात आल्या आहेत. हा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आगामी १४ दिवसांसाठी या इमारती बंद असतील. तसेच या काळात इमारतीतील नागरिकांना वर्क फ्रॉम होम करावे लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.एकीकडे मुंबईतील ४ वॉर्ड कोव्हिड हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करत असताना मुंबईत सुरुवातीला कोरोनाचे सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी माहीम येथेही प्रशासनाने नियमांच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. नियंत्रणात आलेल्या धारावीत कोरोनानं पुन्हा हातपाय पसरु नये, या करिता प्रशासन सतर्क झाले आहे. दादर, धारावी, माहीम क्षेत्रातील व्यापारी आस्थापनांमधील मालक, चालक, तसेच इतर कर्मचारी वर्गाची तपासणी करण्यात येत आहे. दादर रेल्वे स्थानकावर गुजरात तसेच इतर राज्यांमधून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रेल्वे स्थानकावर स्क्रिनिंग आणि कोव्हिडसदृश लक्षणं असणाऱ्या प्रवाशांची मोफत चाचणी करुन कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्यांना विलगीकरणासाठी विलगीकरण कक्षात पाठविण्यात येते. माहीममध्ये रुग्ण संख्या वाढल्या पालिकेने टेस्टिंग वाढवल्या आहेत.


 


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget