एटीएम क्लोनिंग व फसवणुक प्रकरण ; एचडीएफसी बँकेच्या माजी उप व्यवस्थापकासह तिघांना अटक

मुंबई - बनावट डेबिट व क्रेडिट कार्ड तयार करून लाखों रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट-९ ने अटक केली आहे. या टोळीमध्ये एचडीएफसी बँकेच्या एका माजी उपव्यवस्थापकाचाही समावेश आहे. काही नागरिकांनी पोलिसांकडे याबाबत तक्रारी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

एका ग्राहकाच्या खात्यातून आपोआप रक्कम काढली जात होती. आपल्या बँक खात्याची माहिती त्याने कुणालाही दिलेली नव्हती, असे असूनही हा प्रकार घडत होता. ग्राहकाने बँकेकडे याबाबत तक्रार दिली असता बँकेने उपव्यवस्थापकाला कामावरून काढून टाकले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेचा तपास सुरूच होता.दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिटने एका हॉटेलमध्ये छापेमारी केली असता, तीन संशयित त्यांच्या हाती आले. यशवंत गुप्ता उर्फ ​​सोनू (वय 23), अझरुद्दीन अन्सारी (वय 22), इस्तिक अहमद खान (वय 27), अशी या तिघांची नावे आहेत. यातील यशवंत गुप्ता हा एचडीएफसी बँकेत उपव्यवस्थापकपदी होता, अशी माहिती तपासात समोर आली. गुप्ता ग्राहकांची खाती क्लोन करून त्याच्या साथीदारांना देत असे. ते नाशिक आणि पुण्यातून पैसे काढत असत. पैसे काढल्यानंतर एटीएम क्लोन करणाऱ्या व्यक्तीला ५ टक्के रक्कम देऊन बाकीचे पैसे स्वत:कडे ठेवत, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली.अटक केलेल्या तीन आरोपींकडून स्किमर मशीन, चुंबकीय पट्टी कार्ड, डेबिट कार्ड, मोबाइल फोन आणि २७ हजार रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. या टोळीने गेल्या सहा महिन्यांपासून अनेकांची फसवणूक केली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारम्बा, अपर पोलीस आयुक्त एस वीरेश प्रभु, पोलीस उपायुक्त (गुन्हे प्रकटीकरण -१), गुन्हे शाखेचे उपायुक्त अकबर पठाण, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget