पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला ; राज्यमंत्री गंभीर जखमी

मुर्शीदाबाद - पश्चिम बंगालमध्ये राज्यमंत्र्यांवर बॉम्बहल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यमंत्री झाकीर हुसेन यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे डझनभर कार्यकर्ते हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मुर्शीदाबाद जिल्ह्यातील निमतिया रेल्वे स्टेशनवर हा हल्ला करण्यात आला. अज्ञातांनी झाकीर हुसेन आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने बॉम्ब फेकले.हल्ल्यात झाकीर हुसेन यांच्या पायाला मोठी जखम झाली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी यासंबंधी कोणतीही माहिती दिली नव्हती. टीएमसीच्या मुर्शीदाबादमधील जिल्हाध्यक्ष अबु ताहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.बंगालमध्ये मंत्र्यावर हल्ला होण्याचा गेल्या काही वर्षातील ही पहिलीच घटना आहे. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती. हुसेन आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि २०१६ विधानसभा निवडणुकीत जांगीपूरमधून निवडून आले.मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून डॉक्टर हुसेन यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती खान यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी हल्ल्यामागे भाजपा असल्याचा आरोप केला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget