रिपाईच्या माजी शहराध्यक्षाची तहसीलदाराला गोळ्या घालण्याची धमकी

अंबरनाथ - अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीचे पडघाम वाजले आहेत. निवडणुकीतील सर्वात महत्वाचे काम म्हणजे मतदार यादी अद्यावत करणे. मात्र, मतदार यादी तयार करताना यामध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप सर्वच राजकीय पक्ष करीत आहे. त्यातच रिपाईच्या माजी शहराध्यक्षाने थेट तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याने तहसील कार्यालयात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी तहसीलदारांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मतदार यादी तयार करण्यासाठी अंबरनाथ विधानसभेच्या भाग क्रमांकाप्रमाणे मतदारांचा प्रभाग निहाय समावेश करण्यात आला आहे. मात्र, हे करताना संबंधित पालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत आणि यादी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदारांना एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतर केल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. तसेच विधानसभेच्या यादींमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांचा समावेश करण्यात आल्याने, त्याचाही त्रास राजकीय पक्षांना होत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, बोगस नावे पालिका निवडणुकीत काढणे शक्य नसल्याने त्याच आधारावर निवडणुका घेतल्या जाणार आहे. यावरून सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करत बोगस मतदारांसंदर्भात आपला आक्षेप नोंदवत आहेत. एवढेच नव्हे, तर अनेक मतदार याद्या तयार करताना एका प्रभागातील नावे थेट दुसऱ्या प्रभागात टाकून संबंधित कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे.

मतदार यादी तयार करताना कर्मचाऱ्यांच्या चुकीचा भुर्दंड थेट निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना बसणार असल्याने आता इच्छुक उमेदवार आपापल्या स्तरावर संताप व्यक्त करत आहे. रिपाईचे माजी अध्यक्ष अजय जाधव यांनी तर थेट तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे. तर याबाबत अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता, अजय जाधव यांच्या व्हिडिओवरून त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget