आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन ; काँग्रेस-भाजपचे आमदार आमनेसामने

मुंबई - आजपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला मांडला जाणार असून १० मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, संजय राठोड यासारख्या अनेक मुद्द्यांनी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांचे मुद्दे त्यांनी शांतपणे मांडावेत, गोंधळ करु नये. विरोधकांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होईल, गोंधळाने काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घेतली आहे. सरकार अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचे नाटक करत आहे. वाढीव वीज बिल प्रश्नी आणि संजय राठोडप्रश्नी उघडे पडण्याची भीती असल्याने सरकारला अधिवेशनातून पळ काढायचा आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंमत असेल, तर अविश्वास ठराव आणून दाखवा, असे खुले आव्हान दिले होते. पेट्रोल-डिझेल दरवाढी आंदोलनावर काँग्रेस आणि भाजपचे आमदार आमने-सामने आले होते आणि विधिमंडळात एकमेकांच्या समोर घोषणाबाजी दिली. केंद्र सरकारचे लोक लपून बसले, आधी थोडे दर वाढले तरीही आंदोलन करायचे, बाळासाहेब थोरातांचा टोला, तर वीज बिल प्रश्नी भाजप नेत्यांची राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. 


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget