भाजपच्या हिंदुत्वाच्या कार्डला ममता बॅनर्जींचे प्रत्युत्तर ; कोणीही माझ्याविरोधात ‘हिंदू कार्ड’ वापरायची हिंमत करु नये

कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकाता येथील विराट सभेनंतर पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढला आहे. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आव्हान दिले आहे. मी हिंदू कुटुंबातील मुलगी आहे. कोणीही माझ्याविरोधात ‘हिंदू कार्ड’ वापरायची हिंमत करु नये. मी रोज सकाळी घरातून निघताना चंडी पाठाचे स्मरण करते, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.मंगळवारी नंदीग्राम येथील प्रचारसभेत त्या बोलत होत्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी सर्वांदेखत चंडी पाठातील काही श्लोक म्हणून दाखवले. तसेच भाजपच्या नेत्यांनी माझ्यासोबत चंडीपाठ म्हणण्याची स्पर्धा करावी, असे आव्हानही ममता बॅनर्जी यांनी दिले.

ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी नंदीग्राम मतदारसंघातील प्रचाराचा शुभारंभ केला. या मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्यासमोर तृणमूल काँग्रेसमधील माजी सहकारी आणि भाजप नेते सुवेन्दू अधिकारी यांचे कडवे आव्हान आहे. मात्र, नंदीग्रामची जनता १ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानावेळी भाजपचा एप्रिल फूल करेल, असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.नंदीग्राममधील या प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी उपस्थितांना भावनिक आवाहन केले. नंदीग्राममध्ये काहीजण मला उपरी (बाहेरची) म्हणतात. मात्र, माझे बालपण हे शेजारच्या बीरभूम जिल्ह्यात गेले आहे. आज मी तुमच्यासाठी उपरी झाली आहे आणि गुजरातमधून आलेले लोक तुम्हाला अधिक जवळचे वाटत आहेत का? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.तुमची इच्छा नसेल तर मी नंदीग्रामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. तुम्ही मला तुमची मुलगी मानले तरच मी नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरेन, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून २७ मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान होईल. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिलला पार पडेल. यानंतर २ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget